Dictionaries | References

रगडणें

   
Script: Devanagari

रगडणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; to do generally (in a wild, hurried, tumultuous, reckless style; to drive on, to push along. Ex. भलत्याचें पागोटें रगडलें नीं चालला; त्यानें पंचवीस लाडू रगडले; त्यानें भल- ताच प्रयोग रगडला.

रगडणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Press and rub roughly and rudely; lay violent hands on.
Dirve on.

रगडणें     

क्रि.  
( कांहीं पदार्थ ) चेपणें ; दडपणें . कुरुबलनलिनवनांते भीमगज निकार आठवी रगडी । - मोभीष्म ६ . ४७ .
लाटणें ; मटकावणें ; बळकावणें . भलत्याचें पागोटें रगडलें नी चालला .
चेपणें ; दाबणें ; जोरानें चोळणें ; मालिश करणें . निजउनि निज शयनावरि , शयनावरि बंधुच्या पदा रगडी । - मोकृष्ण ८१ . २७ .
खाणें . त्यानें पंचवीस लाडू रगडले .
निष्काळजीपणानें करणें . त्यानें भलताच प्रयोग रगडला .
घासणें ; पीठ करणें ; चिरडणें .
दटावणें . सांगेल कोण दुसरा भीष्महि सांगेल ज्या न रगडूनी । - मोउद्योग १ . १९ .
नाश करणें ; मारुन टाकणें . त्या कुरुसेनेसि वासवी रगडी । - मोविरा ४ . ८९ . रगडणी - स्त्री . मागावर विणून झालेलें कापड गुंडाळण्याचा रुळ फिरविणारें लाकूड . [ रगडणें ] रगडपट्टी - स्त्री . दडपशाहीचें कसें तरी उरकलेलें , धसमुसळेपणाचें काम ; धडपड ; रगडमल्लाचें कर्म . नीट विचार करुन अर्थ लिहीत जा . उगीच रगडपट्टी करुं नका . [ रगडणें + पट्टी ] रगडमल्ल - वि .
ज्याचे अंगीं काम करण्याची युक्ति नाहीं व काम कोणत्या रीतीनें केलें असतां नीटनेटकें होईल इ० विचार न करितां केवळ अंगबळानें काम करण्याचा ज्याचा स्वभाव तो ; दांडगा ; रानवट ; ओबडधोबड .
ज्याचे अंगीं नाजुकपणा , सुरेखपणा नाहीं आणि सामान्य रीतीपेक्षां आकारानें जो मोठा आहे असा ( दागिना , पदार्थ , पात्र , वस्त्र इ० ). [ रगडणें + मल्ल ] रगडमल्ली - स्त्री .
ओबडधोबड बिगारी , आडदांडपणानें केलेलें काम ; रगडमल्लपणा .
धुडगूस ; धांगडधिंगा , बेफामपणा . रगडा - पु . ( कों . )
संकुचित स्थलामध्यें अनेक मनुष्यें जमलीं असतां होणारी दाटी ; चेंगराचेंगरी ; गर्दी ; दाटी . पाचशें दळव्याचा ज्याचा एकच रगडा झाला । - ऐपो ६९ .
रस काढावयाचा चरक .
कुचंबणा ; अव्यवस्थित कारभार .
नाश . वागूळाचा रगडा निजशस्त्रें कीजे । - एभा ३ . ३५ .
ढीग ; मोठें ओझें ; अतिशयपणा ; भार ; घाई वगैरे . आज कामाचा रगडा आहे .
( गो . ) उखळांतील उभा वरवंटा ; वाटण्याचा दगड . रगडो . रगडाझगडा - पु . रगडा पहा . [ रगडा + झगडा ] रगडून - क्रिवि .
खूप जोरानें ; पुष्कळणीं ; मनमुराद . तो रगडून जेवला .
आवेशानें ; घट्ट . त्याला चांगलें रगडून धर नाहीं तर तो पळून जाईल . रगडून , बांधणें - जोरानें बांधणें ; ओढून बांधणें . रगडून धरणें - घट्ट , दाबून धरणें . रगडून मारणें - सपाटून , खूप मारणें . रगडून जेवणें - पोटभरुन खाणें ; ओकारी येईपर्यंत खाणें . रगडून सांगणें , बोलणें - मनमुराद बोलणें , शिव्या देणें ; निर्भर्त्सना करणें ; रागें भरणें . रगड्या - वि . आडदांड ; दडप्या ; गर्दींतून , अडचणींतून वाट काढणारा ; कशाहि स्थितीस न डरतां मनांत असेल तें करणारा .
विचित्र ; चमत्कारिक ; बेफिकीर ; ओबडधोबड काम करणारा . [ रगडणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP