|
स्त्री. १ घासण्याची , जोरानें पुसण्याची , घासटण्याची , उटण्याची , उजळा देण्याची क्रिया ; घासण्याचा व्यापार . २ ज्यानें घासावयाचें , उजळा द्यावयाचा , तो पदार्थ ; घासण्याचा पदार्थ . उ० अंगघासणी ; दांतघासणी . ३ ( भांडीं इ० घासण्यास केलेला ) गवत , पानें , काथ्या इ० कांचा चोंथा . ४ ( ल . ) कचाकची ; घासाघास ; जिगजीग ; कटकट ; भांडाभांडी ; चकमक . ५ गांजणूक ; जाच ; छळ . [ घासणें ]
|