Dictionaries | References

खरडा

   
Script: Devanagari

खरडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To write: answering to To pen it; to scribble away &c.

खरडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Scrapings. A scrawl; a rough draught. Reduced state.

खरडा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : खरड

खरडा     

 पु. १ खरडून काढलेले अन्न , खरकटें ( स्वयंपाकाच्या भांड्यातुन ). २ भरडलेल्या भाजलेल्या , मिरीं , मेथ्या इ० कांचा चुरा . ( क .) तिखट ( ओल्या मिरच्यांचें ). ३ चिताड कागद . ( गिचमिड लिहिलेला , ओळीस ऒळ लागलेला ); डाग पडलेले , लिखाण ; अक्षर वळविण्याकरितां किंवा घटविण्याकरितां लिहिलेला बंद ; खरडें . ४ आराखडा ; कच्चें टांचण ; कच्चा मसुदा ; रोजनिशी ; टांचणवही ; टिपणवही ; चोपडी ; व्यापारी , धंदेवाले लोक हिशेबाच्या दोन वाह्या ठेवतात -( अ .) कच्चा खरडा व ( आ ) पक्का खरडा . कच्चा वरुन पक्का लिहितात . ५ ओबड . धोबड . खेंगडेंमेंगडें मोती ; गोलबंद नसणारें मोती ; हलक्या मोत्याचा दाणा ; असल्या मोत्यांचा खडबडीतपणा . ६ खरबुजाची एक जात . ७ देवी व गोंवर यांमुळें आलेली पोटांतील कडकी , उष्णता . ८ चिंत्ता ; बिव्या वाघ . ' होती कोंबडी ती खाल्ली खरड्यानें .' - मसाप १ . १ . २ . ९ ( कों .) भाताच्या लहान भरलेल्या ओंब्या , साळीच्या लहान , भरदार कणसांचा समुदाय . १० गुरांनी खरडून खावयाजोगें म्हणजे फक्त खुरपंतां येण्यासारखें आंखुड गवत . ११ तुपांत तळलेलें ( जायफळ , बडिशेप . मुरुडशेंग यांचें ) चूर्ण ; हें रेच बंद होण्याकरितां घेतात . १२ तुटवडा ; कमीपणा ; टंचाई ( खरडावें लागेल इतकी ). ( क्रि० लागणें ; पडणे ). ' पाण्याचा खरडा लागला अथवा पडला ' = विहिरींचे पाणी इतकें थोडें उरलें आहे कीं , तें ( नरोटीनें ) खरडलें पाहिजे , तसेंच धान्याला खरडा लागला .= पिकाचा तुटवडा पडला . १३ ( ना .) पुठ्ठा ; पुष्टिपत्र ( कार्डबोर्ड ). १४ ( सोनारी ) चांदीच्या सुताच्या एक टोंकास दिव्यावर धरुन रवा किंवा गोलाकार करतात ती काडी ( ही झुब्याच्या कामीं उपयोगी पडतें .) ( खरड ) खरडेघाशी - स्त्री . निव्वळ कारकुनी . खरडे घासणारा - वि . निव्वळ कारकुन . खरडघाशा पहा . खरडे घासणें - १ लिहिण्याचें कष्टदायक काम करणें . २ ( निष्काळजीपणानें ) लिहिणे ; खरडणें ; भरकटणें .

खरडा     

खरडघाशा
खरडेघाशा
१. केवळ लिहिण्याचे काम करणारा
निवळ कारकून
ज्‍यास धंद्याची माहिती नसून केवळ सांगितलेले लिहून ठेवण्याचे तेवढे कळते असा. २. कबाडकष्‍ट करणारा
त्रासाचे काम करणारा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP