बहिरा झालों या जगीं ॥धृ॥
नाहीं ऎकिलें हरिकीर्तन । नाहीं केलें पुराणश्रवण । नाहीं वेदशास्त्रपठण । गर्भी बहिरा झालों त्यागुणे ॥१॥
नाहीं सन्तकीर्ति श्रवणीं आलीं । नाही साधुसेवा घडियेली पितृवचनासी पाठ दिधली । तीर्थ व्रतें असोनि त्यागिलीं ॥२॥
माता माउली पाचारितां । शब्द नाहीं दिला मागुता । बहिरा झालों नरदेहीं येता । एका जनर्दनीं स्मरेन आतां ॥३॥
N/A
N/A
Last Updated : January 23, 2008
TOP