मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निवडक अभंग संग्रह|
मुका

मुका

मुका - अभंग
Tags :

मुका झालों वाचा गेली ॥धृ॥
होतो पंडित महाज्ञानी । दशग्रंथ षड्‍शास्त्र पुराणी । चारी वेद मुखोद्‍गत वाणी । गर्वामध्यें झाली सर्व हानी ॥१॥
जिव्हा लाचावली भोजना । दुग्ध घृत शर्करा पक्वान्ना । निंदिले उपान्ना । तेणें पातलों मुखबंधना ॥२॥
साधुसन्ताची निंदा केली । हरिभक्तांची स्तुति नाहीं केली । तेणॆं वाचा पंगु झाली । एका जनार्दनी कृपा लाधली ॥३॥

N/A

N/A
Last Updated : December 29, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP