जोहार मायबाप जोहार । मी सकळ सन्ताचा महार । सांगतों दृढ विचार । तो ऎका की जी मायबाप ॥१॥
माझा विचार नारदें ऎकिला । तो पुन:रुपा नाहीं आला । भीष्म ध्रुव प्रल्हाद आगळा । या विचारें बोधिलें की जी मायबाप ॥२॥
उपमन्यु बिभीषण । सर्वांमाजीं अर्जुन । आणिकही ऋषी सांगेन । सावध ऎका की जी मायबाप ॥३॥
पराशर विश्वामित्रादि जाण । या विचारें पावलें समाधान । हरिश्र्चंद्र शिबी सुखसंपन्न । झाले की जी मायाबाप ॥४॥
ऎशा विचारें चालले । ते पुनरपि नाहीं आलें । एका जनार्दनीं भले ।ऎक्यपण कीं जी मायबाप ॥५॥
N/A
N/A
Last Updated : January 23, 2008
TOP