मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निवडक अभंग संग्रह| निवडक अभंग संग्रह ४ निवडक अभंग संग्रह निवडक अभंग संग्रह १ निवडक अभंग संग्रह २ निवडक अभंग संग्रह ३ निवडक अभंग संग्रह ४ निवडक अभंग संग्रह ५ निवडक अभंग संग्रह ६ निवडक अभंग संग्रह ७ निवडक अभंग संग्रह ८ निवडक अभंग संग्रह ९ निवडक अभंग संग्रह १० निवडक अभंग संग्रह ११ निवडक अभंग संग्रह १२ निवडक अभंग संग्रह १३ निवडक अभंग संग्रह १४ निवडक अभंग संग्रह १५ निवडक अभंग संग्रह १६ निवडक अभंग संग्रह १७ निवडक अभंग संग्रह १८ निवडक अभंग संग्रह १९ निवडक अभंग संग्रह २० निवडक अभंग संग्रह २१ निवडक अभंग संग्रह २२ श्री हनुमानजन्माचे अभंग श्रीरामजन्माचे अभंग श्रीकृष्ण जन्माचे अभंग मंगलाचरण पहिले काकड आरतीचे अभंग श्रीसदगुरु महिमा संतसंगमहिमा गौळण दळण विनंतीचे अभंग उपसंहार व वरप्रसाद श्रीसंत सदन महिमा क्षीरापतीचे अभंग प्रारब्धपर अभंग नक्र उद्धार नामधारकाची अधिकारश्रेष्ठता मुका काल्याचे अभंग जोहार जातें एडका दत्तस्तुती दान महात्म्य (महिमा) भजन ज्ञानेश्वर माउली बहिरा आरत्या मदालसा एकादशीचे अभंग द्वादशीचे अभंग चांगदेव पासष्टी निवडक अभंग संग्रह ४ निवडक अभंग संग्रह ४ Tags : abhangअभंग निवडक अभंग संग्रह ४ Translation - भाषांतर * जोडोनियां जोडी जेणें हुंडारिली दुरी । भिकेची आवडी तया नावडे पंढरी ॥१॥ करंटे कपाळ ज्याचें नाम नये वाचे । सदैव साभाग्य तोचि हरिरंगी नाचे ॥२॥ आपण न करी यात्रा दुजियासि जावो नेदी । विषयाचा लंपट शिकवी कुविद्या कुबुद्धी ॥३॥ ऎसें जे जन्मोनी नर भोगिती अधोर । न करिती तीर्थयात्रा तया नरकी बिढार ॥४॥ पुंडलीकें भक्तें तारिलें विश्र्वजनां । वैकुंठीची मूर्ति आणिली पंढरपूर पाटणा ॥५॥ काया वाचा मनें जीवें सर्वस्वें उदार । बापरखुमादेविवरा विठ्ठलाचा वारिकर ॥६॥ * वाजतसे बोंब कोणी नायकती कानीं । हरि हरि न म्हणती तया थोर झाली हानी ॥१॥ उठा उठा जागा पाठीं भय आलें मोठें । पंढरीवांचुनि दुजा ठाव नाहीं कोठें ॥२॥ तापत्रय अग्नीचा लागला वोणवा । कवण रिघे आड कवण करी सावाधावा ॥३॥ देखोनि ऎकोनि एक अंध बहिर झाले । विषयाचे लंपट बांधोनि यमपुरीस नेले ॥४॥ आजा मेला पणजा मेला बाप मसणा नेला । देखत देखत नातु पणतु तोही तैसा झाला ॥५॥ व्याघ्र लासी भूतें हीं लागताती पाठीं । हरि भजन न करितां सकळें घालूं पाहे पोटीं ॥६॥ संतसंग धरा तुम्ही हरिभजन करा । पाठी लागलासे काळ दांत खातो करकरां ॥७॥ बापरखुमादेविवरा विठ्ठला शरण । भावें न रिघतां न चुके जन्ममरण ॥८॥ * हे नव्हे आजिकालिचें । युगें अठ्ठाविसांचें । मज निर्धारितां साचें । हा मृत्युलोकुचि नव्हे । हाचि मानी रे निर्धारु । येर सांडि रे विचारु । जरी तुं पाहासी पराप्तरु । तरी तुं जाये पंढरीये ॥१॥ बाप तीर्थ पंढरी । भूवैकुंठ महीवरी । भक्त पुंडलिकाचें द्वारीं । कर कटावरी राहिला ॥२॥ कशी अयोध्या अवंती । कांची मथुरा माया गोमती । ऎसीं तीर्थे इत्यादिके आहेती । परि सरी न पवती ये पंढरी ॥३॥ हाचि मानि रे विश्र्वासु । येर सांडी रे हव्यासु । जरि तूं पाहासी वैकुंठवासु । तरि तूं जाये पंढरिये ॥४॥ आड वाहे भीमा । तारावया देह आत्मा । पैलथडीये परमात्मा । मध्यें राहिला पुंडलीक ॥५॥ या तिहींचे दरुशन । प्राण्या नाहीं जन्ममरण । पुनरपि आगमन । येथें बोलिलेंचि नाही ॥६॥ पंढरी म्हणजे भूवैकुंठ । ब्रह्म तंव उभेचि दिसताहे नीट । या हरिदासांसी वाळवंट । जागरणासी दिधलें ॥७॥ म्हणोनि करा करा रे क्षीरापति । नटा नटा कीर्तनवृत्ति । ते नर मोक्षातें पावती । ऎसें बोलती सुरनर ॥८॥ हें चोविसा मूर्तीचें उद्धरण । शिवसहस्त्रनामासी गहन । हेंचि हरिहराचें चिंतन । विश्र्ववंद्य हे मूर्तीतें ॥९॥ तो हा देवाधिदेव बरवा । पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा । बापरखुमादेविवरु पंचविसावा । चोविसा मूर्ति वेगळा ॥१०॥ * तुज सगुण म्हणों कीं निर्गुण रे । सगुण निर्गुण एकु गोविंदुरे ॥१॥ अनमाने ना अनुमाने ना । श्रृति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥२॥ तुज स्थुळ म्हणों कीं सुक्ष्म रे । स्थूळ सूक्ष्म एकु गोविंदु रे ॥३॥ तुज आकारु म्हणों कीं निराकारु रे । आकारु निराकारु एकु गोविंदु रे ॥४॥ तुज दृश्य म्हणों कीं अदृश्य रे । दृश्य अदृश्य एकु गोविंदु रे ॥५॥ निवृत्ति प्रसादे ज्ञानदेव बोले । बापरखुमादेविवरु विठ्ठलु रे ॥६॥ * सत्यज्ञानानंत गगनाचें प्रावर्ण । नाहीं रुप वर्ण गुण जेथें ॥१॥ तो हा रें श्रीहरि पाहिला डोळेभरी । पाहते पाहणें दुरी सारोनियां ॥२॥ ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती । ती हे उभी मूर्ति विटेवरी ॥३॥ * तुझी आण वाहीन गा देवराया । बहु आवडसि जिवांपासुनियां ॥१॥ कानडिया विठोबा कानडिया । बहु आवडसि जीवापासूनियां ॥२॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलु राया । बहु आवडसि जीवांपासूनियां ॥३॥ * तृप्ती भुकेली काय करूं माये । जीवनीं जीवन कैसे तान्हेजत आहे ॥१॥ मन धालें परी न धाये । पुढत पुढती राजा विठ्ठलु पाहे ॥२॥ निरंजनीं अंजन लेइजेत आहे । आपुलें निधान कैसें आपणचि पाहे ॥३॥ निवृत्ति गार्हस्थ मांडलें आहे । निष्काम अपत्य प्रसवत जाये ॥४॥ त्रिभुवनी आनंदु न माये गे माये । आपे आपु परमानंदु वोसंडतु आहे ॥५॥ बापरखुमादेविवरु विठ्ठल गे माये । देहभाव सांडुनि भोगिजत आहे ॥६॥ * बरवा वो हरि बरवा वो। गोविंद गोपाळ गुण गरुवा वो ॥१॥ सांवळा वो हरि सांवळा वो । मदनमोहन कान्हो गोवळा वो ॥२॥ पाहतां वो परि पाहतां वो । ध्यान लागलें या चित्तां वो ॥३॥ पढिये वो हरि पढिये वो । बापरखुमादेविवरु घडिये वो ॥४॥ * राम बरवा कृष्ण बरवा । सुंदर बरवा बाईयांनो॥१॥ केशव बरवा माधव बरवा । गोपाळ बरवा बाईयानों ॥२॥ बापररुमादेविवरु त्रिभुवनीं गरुवा । विठ्ठलु बरवा बाईयांनो ॥३॥ * अष्टांगयोगें न सिणिजे । यम नेम विरोध न कीजे रया ॥१॥ वाचा गीत गाईजे वाचा गीत गाइजे । गातां गातां श्रीवणीं ऎकिजे रया ॥२॥ गीताछंदे अंग डोलिजे । लीला विनोदें संसार तरिजे रया ॥३॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलु नामें । जोडे हा उपावो किजे रया ॥४॥ * रसने वो रसु मातृके वो माये ॥धृ॥ रमणिये माये रमणिये । राम नामामृत रस पी जिव्हे ॥१॥ निवृत्तिदासाप्रिय । माय रमणिये माय रमणिये ॥२॥ * सकळ धर्मांचें कारण । नामस्मरण हरिकीर्तन । दया क्षमा समाधान संतजन साधिती ॥१॥ निजधर्म हा -चोखडा । नाम उच्चारु घडघडां । भुक्ति मुक्तिचा संवगडा । हा भवसिंधुतारक ॥२॥लावण्य मान्यता विद्यावंत । सखे स्वजन पुत्र कलत्र । विषयभोग वयसा व्यर्थ । देहासहित मरणांतीं ॥३॥जें जें देखणें सकळ । तें हें स्वप्नींचें मृगजळ । म्हणोनि चिंती चरणकमळ । रखुमादेविवरा विठ्ठलाचें ॥४॥*माझ्या कान्हाचें तुम्ही नाव भरी घ्यावो । ह्रुदयीं धरोनि यासी खेळावया न्यावो ॥१॥भक्तांकारणे येणें घेतलीसे आळी । दहा गर्भवास सोशी वनमाळी ॥२॥कल्पनेविरहित भलतया मागे । अभिमान सांडूनि दीनापाठीं लागे ॥३॥शोषिली पुतना येणें मोडियेले तरु । आळी न संडी बापरखुमादेविवरु ॥४॥*आपुलेनि रंगे येती होती ये साजणी । तवं एके वनवासीं आलंगिलें गे माये ॥१॥बोलेना बोलों देईना । तेथें पाहणें तें अवघें पारुषलें गे माये ॥२॥आपुलें केले कांहीं नचले वो आतां । बापरखुमादेविवरा विठ्ठलां देखतां ॥३॥*कानीं घालुनियां बोटें नाद जे पाहावे । न दिसतां जाणावें नऊ दिवस ॥१॥भोंवया पाहतां न दिसे जाणा । आयुष्यासी गणना सात दिवस ॥२॥डोळां घालुनियां बोटचक्र जें पाहवें । न दिसतां जाणावें पाच दिवस ॥३॥नासाग्रीचें अग्र न दिसे नयनीं । तरी तेचि दिनीं म्हणा रामकृष्ण ॥४॥ज्ञानदेव म्हणे हें साधूंचें लक्षण । अंतकाळीं आपण वेंगीं पाहा ॥५॥ N/A N/A Last Updated : January 23, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP