मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निवडक अभंग संग्रह| निवडक अभंग संग्रह ११ निवडक अभंग संग्रह निवडक अभंग संग्रह १ निवडक अभंग संग्रह २ निवडक अभंग संग्रह ३ निवडक अभंग संग्रह ४ निवडक अभंग संग्रह ५ निवडक अभंग संग्रह ६ निवडक अभंग संग्रह ७ निवडक अभंग संग्रह ८ निवडक अभंग संग्रह ९ निवडक अभंग संग्रह १० निवडक अभंग संग्रह ११ निवडक अभंग संग्रह १२ निवडक अभंग संग्रह १३ निवडक अभंग संग्रह १४ निवडक अभंग संग्रह १५ निवडक अभंग संग्रह १६ निवडक अभंग संग्रह १७ निवडक अभंग संग्रह १८ निवडक अभंग संग्रह १९ निवडक अभंग संग्रह २० निवडक अभंग संग्रह २१ निवडक अभंग संग्रह २२ श्री हनुमानजन्माचे अभंग श्रीरामजन्माचे अभंग श्रीकृष्ण जन्माचे अभंग मंगलाचरण पहिले काकड आरतीचे अभंग श्रीसदगुरु महिमा संतसंगमहिमा गौळण दळण विनंतीचे अभंग उपसंहार व वरप्रसाद श्रीसंत सदन महिमा क्षीरापतीचे अभंग प्रारब्धपर अभंग नक्र उद्धार नामधारकाची अधिकारश्रेष्ठता मुका काल्याचे अभंग जोहार जातें एडका दत्तस्तुती दान महात्म्य (महिमा) भजन ज्ञानेश्वर माउली बहिरा आरत्या मदालसा एकादशीचे अभंग द्वादशीचे अभंग चांगदेव पासष्टी निवडक अभंग संग्रह ११ निवडक अभंग संग्रह ११ Tags : abhangअभंग निवडक अभंग संग्रह ११ Translation - भाषांतर आलिंगन घडे । मोक्ष सायुज्यता जोडे ॥१॥ ऎसा संतांचा महिमा । झाली बोलायची सीमा ॥२॥ तीर्थे पर्वकाळ । अवघीं पायांणें सकळ ॥३॥ तुका म्हणॆ देवा । त्याची केली पावे सेवा ॥४॥ * ऎसा ज्याचा अनुभव । विश्वदेव सत्यत्वें ॥१॥ देव तयाजवळी असे । पाप नासे दर्शनें ॥२॥ काम क्रोधा नाहीं चाली । भूतीं झाली समाता ॥३॥ तुका म्हणॆ भेदा-भेद । गेला वाद खंडोनी ॥४॥ * उजळलें भाग्य आतां । अवघी चिंता वारली ॥१॥ संतदर्शनें हा लाभ । पाद्मनाभ जोडला ॥२॥ संपुष्ट हे ह्रुदयपेटीं । करुनि पोटीं सांठवूं ॥३॥ तुका म्हणे होता ठेवा । तो या भावा सांपडला ॥४॥ * काय वाणूं आतां न पुरे हे वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसे ॥१॥ थोरीव सांडिली आपुली परिसें । नेणे शिवों कैसें लोखंडासी ॥२॥ जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती । देह कष्टविती परउपकारें ॥३॥ भूतांची दया हे भांडवल संतां । आपुली ममता नाहीं देहीं ॥४॥ तुका म्हणे सुख पराविया सुखें । अमृत हें मुखें स्त्रवतसे ॥५॥ * काय सांगो आतां संतांचे उपकार । मज निरंतर जागविती ॥१॥ काय द्यावे त्यासी व्हावे उतराई । ठेवितां हा पायीं जीवा थोडा ॥२॥ सहज बोलणें हीत उपदेश । करुनि सायास शिकविती ॥३॥ तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्तीं । तैसे मज येती साभाळीत ॥४॥ * कोण पुण्यें यांचा होईन सेवक । जिहीं द्वंद्वंदिक दुराविलें ॥१॥ ऎसी वर्मे मज दावीं नारायणा । अंतरींच्या खुणा प्रकटोनी ॥२॥ बहु अवघड असे संत भेटी । तरी जगजेठी करुणा केली ॥३॥ तुका म्हणे मग नये वृत्तीवरीं । सुखाचे शेजारीं पहुडईन ॥४॥ * जे कां रंजले गांजलें । त्यासी म्हणे जो आपुले ॥१॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा ॥२॥ मृदु सबाह्य नवनीत । तैसें सज्जनाचें चित्त ॥३॥ ज्यासी आपंगिता नाही । त्यासी धरी जो ह्रुदयी ॥४॥ दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ॥५॥ तुका म्हणे सांगु किती । तोचि भगविंताची मूर्ती ॥६॥ * तुम्ही संत मायबाप कृपावंत । काय मी पतित कीर्ति वानूं ॥१॥ अवतार तुम्हां धराया कारण । उद्धराया जन जड जीव ॥२॥ वाढवया सुख भक्ति भाव धर्म । कुळाचार नाम विठोबाचें ॥३॥ तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी । तैसें तुम्ही जगीं संतजन ॥४॥ * पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वेद अच्युत सर्वकाळ ॥१॥ तयाच्या चिंतनें तरतील दोषी । जळतील रासी पातकांच्या ॥२॥ देव इच्छी रज चरणींची माती । धावत चालती मागें मागें ॥३॥ काय त्या उरलें वेगळें आणिक । वैकुंठनायक जया कंठीं ॥४॥ तुका म्हणे देव भक्तांचा संगम । तेथें ओघ नाम त्रिवेणीचा ॥५॥ * पाप ताप दैन्य जाय उठाउठी । झालिया भेटी हरिदासांची ॥१॥ ऎसें बळ नाही आणिकाचें अंगी । तपें तीर्थें जगी दानें व्रतें ॥२॥ चरणींचे रज वंदी शूळपाणी । नाचती कीर्तनीं त्याचें माथा ॥३॥ भव तरावया उत्तम हे नाव । भिजों नेदीं पाय हात कांही ॥४॥ तुका म्हणॆ मना झालें समाधान । देखिल्या चरण वैष्णावांचे ॥५॥ * भक्त ऎसे जाणां जे देहीं उदास । गेले आशापाश निवारुनि ॥१॥ विषय तो त्यांचा झाला नारायण । नावडे धन जन माता पिता ॥२॥ निर्वाणी गोविंद असे मागें पुढें । कांहींच सांकडें पडों नेदी ॥३॥ तुका म्हणे सत्य कर्मा व्हावें साह्य । घातलिया भय नरका जाणें ॥४॥ * शुद्ध बीजपोटीं । फ़ळें रसाळ गोमटीं ॥१॥ मुखीं अमृताची वाणी । देह देवाचे कारणीं ॥२॥ सर्वांगी निर्मळ । चित्त जैसें गंगाजळ ॥३॥ तुका म्हणे जाती । ताप दर्शनें विश्रांती ॥४॥ * संतचरणरज लागतां सहज । वासनेचें बीज जळोन जाय ॥१॥ मग रामनामीं उपजे आवडी । सुख घडोघडी वाढों लागे ॥२॥ कंठी प्रेम दाटे नयनीं नीर लोटे । ह्रुदयी प्रगटे नामरुप ॥३॥ तुका म्हणे साधन सुलभ गोमटें । परि उपतिष्ठे पूर्वपुण्यें ॥४॥ * संतांनी सरता केलों तैशापरी । चंदनाने बोरी व्यापियेली ॥१॥ गुण दोष याति न विचारी कांहीं । ठाव दिला पायीं आपुलिया ॥२॥ तुका म्हणॆ आलें समर्थांच्या मना। तरी होय राणा रंक त्याचा ॥३॥ * सर्व सुखें आजि येथेंचि वोळलीं । संतांची देखिलीं चरणांबुजें ॥१॥ सर्व काळ होतों आठवीत मनीं । फ़िटली ते धणी येणें काळें ॥२॥ तुका म्हणे वाचा राहिली कुंठित । पुढें झालें चित्त समाधान ॥३॥ * नव्हती ते संत करितां कवित्व । संतांचे ते आप्त नव्हती संत ॥१॥ येथें नाही वेश सरतें आडनांव । निवडे घावडाव व्हावा अंगी ॥२॥ नव्हती ते संत धरितां भोपाळा । पांघरती वाकाळा नव्हती संत ॥३॥ नव्हती ते संत करितां कीर्तन । सांगतां पुराण नव्हती संत ॥४॥ नव्हती ते संत वेदाच्या पठणॆं । कर्म आचरणें नव्हती संत ॥५॥ नव्हती संत करितां तप तीर्थाटण । सेविलिया वन नव्हती संत ॥६॥ नव्हती संत माळा मुद्रांच्या भुषणें । भस्म उधळणें नव्हती संत ॥७॥ तुका म्हणे नाहीं निरसला देह । तोंवरी अवघे हे सांसारिक ॥८॥ * जाणे भक्तीचा जिव्हाळा । तोचि दैवाचा पुतळा ॥१॥ आणिक नये माझ्या मना । हो कां पंडित शहाणा ॥२॥ नाम रुपीं जडलें चित्त । त्याचा दास मी अंकित ॥३॥ तुका म्हणे नवविध । भक्ति जाणे तोचि शुद्ध ॥४॥ N/A N/A Last Updated : January 23, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP