मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निवडक अभंग संग्रह| निवडक अभंग संग्रह १४ निवडक अभंग संग्रह निवडक अभंग संग्रह १ निवडक अभंग संग्रह २ निवडक अभंग संग्रह ३ निवडक अभंग संग्रह ४ निवडक अभंग संग्रह ५ निवडक अभंग संग्रह ६ निवडक अभंग संग्रह ७ निवडक अभंग संग्रह ८ निवडक अभंग संग्रह ९ निवडक अभंग संग्रह १० निवडक अभंग संग्रह ११ निवडक अभंग संग्रह १२ निवडक अभंग संग्रह १३ निवडक अभंग संग्रह १४ निवडक अभंग संग्रह १५ निवडक अभंग संग्रह १६ निवडक अभंग संग्रह १७ निवडक अभंग संग्रह १८ निवडक अभंग संग्रह १९ निवडक अभंग संग्रह २० निवडक अभंग संग्रह २१ निवडक अभंग संग्रह २२ श्री हनुमानजन्माचे अभंग श्रीरामजन्माचे अभंग श्रीकृष्ण जन्माचे अभंग मंगलाचरण पहिले काकड आरतीचे अभंग श्रीसदगुरु महिमा संतसंगमहिमा गौळण दळण विनंतीचे अभंग उपसंहार व वरप्रसाद श्रीसंत सदन महिमा क्षीरापतीचे अभंग प्रारब्धपर अभंग नक्र उद्धार नामधारकाची अधिकारश्रेष्ठता मुका काल्याचे अभंग जोहार जातें एडका दत्तस्तुती दान महात्म्य (महिमा) भजन ज्ञानेश्वर माउली बहिरा आरत्या मदालसा एकादशीचे अभंग द्वादशीचे अभंग चांगदेव पासष्टी निवडक अभंग संग्रह १४ निवडक अभंग संग्रह १४ Tags : abhangअभंग निवडक अभंग संग्रह १४ Translation - भाषांतर * मायबापें जरी सर्पीण की बोका । त्यांचे संगे सुखा न पवे बाळ ॥१॥ चंदनाचा शुळ सोनियाची बेडी । सुख नेदी फ़ोडी प्राण नाशी ॥२॥ तुका म्हणे नरकीं घाली अभिमान । जरी होय ज्ञान गर्व ताठा ॥३॥ * एका बीजा केला नाश । मग भोगीलें कणीस ॥१॥ कळे सकळां हा भाव । लहान थोरांवरी जीवा ॥२॥ लाभ नाहीं फ़ुकासाठी । केल्यावीण जीवा साठी ॥३॥ तुका म्हणे रणीं । जीव देतां लाभ दुणी ॥४॥ * सेवितों हा रस वाटितों आणिकां । घ्यारे होऊं नका रानभरी ॥१॥ विटेवरी ज्याची पाऊलें समान । तोचि एक दानशुर दाता ॥२॥ मनाचे संकल्प पाववील सिद्धी । जरी राहे बुद्धी याचे पायीं ॥३॥ तुका म्हणे मज धाडिलें निरोपा । मारग हा सोपा सुखरुप ॥४॥ * रंगी रंगे रे श्रीरंगे । काय भुललासी पतंगे ॥१॥ शरीर जायाचें ठेवणें । धरिसी अभिलास झणें ॥२॥ नव्हे तुझा हा परिवार । द्रव्य दारा क्षणभंगुर ॥३॥ अंतकाळींचा सोईरा । तुका म्हणॆ विठो धरा ॥४॥ * आधळ्यासी जन अवघेचि आंधळे । आपणासी डोळे दृष्टी नाहीं ॥१॥ रोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न । तोंडासी कारण चवी नाहीं ॥२॥ तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण । तया त्रिभुवन अवघें खोटें ॥३॥ * कांहीं नित्यनेमावीण । अन्न खाय तोचि श्र्वान । वाया मनुष्यपण । भार वाहे तो वृषभ ॥१॥ त्याचा होय भुमीभार । नेणें यातीचा आचार । झाला दावेदार । भोगवी अघोर पितरांसी ॥२॥ अखंड अशुभ वाणी । खरें न बोलेचि स्वप्नीं । पापी तयाहूनि । आणिक नाहीं दुसरा ॥३॥ पोट पोसी एकला भुतीं दया नाहीं ज्याला । पाठीं लागे आल्या । अतीताचें दारासीं ॥४॥ नांही संतांचे पूजन । न घडे तीर्थांचें भ्रमण । यमाचा आंदण । सीण थोर पावेल ॥५॥ तुका म्हणे त्यांनीं । मनुष्यपणा केली हानी । देवा विसरुनी । गेलीं म्हणतां मी माझें ॥६॥ * गाढवाचें तानें । पालटतें क्षणक्षणें ॥१॥ तैसें अधमाचे गुण । एकविध नाहीं मन ॥२॥ उपजतां बरें दिसे । रुप वाढतां तें नासे ॥३॥ तुका म्हणे भुकंतेवेळें । वेळ अवेळ न कळे ॥४॥ * सत्य संकल्पाचा दाता नारायण । सर्व करी पूर्ण मनोरथ ॥१॥ येथें अळंकार शोभती सकळ । भावबळें फ़ळ इच्छेचें तें ॥२॥ अंतरीचें बीज जाणॆं कळवळा । व्यापक सकळां ब्रह्यांडाचा ॥३॥ तुका म्हणे नाहीं चालत तांतडी । प्राप्त काळघडी आल्यावीण ॥४॥ * घेऊनियां चक्र गदा । हाचि धंदा करितो ॥१॥ भक्तां राखे पायांपासीं । दुर्जनासी संहारी ॥२॥ अव्यक्त ते आकारलें । रुपा आलें गुणवंत ॥३॥ तुका म्हणे पुरवी इच्छा । जया तैसा विठ्ठल ॥४॥ * साठविला हरि । जिहीं ह्रुदयमंदिरीं ॥१॥ त्यांची सरली येरझार । झाला सफ़ळ व्यापार ॥२॥ हरि आला हाता । मग कैची भय चिंता ॥३॥ तुका म्हणे हरि । कांहीं उरों नेदी उरी ॥४॥ * म्हणऊनि शरण जावें । सर्वभावें देवासी ॥१॥ तो हा उतरील पार । भव दुस्तर नदीचा ॥२॥ बहु आहे करुणावंत । अनंत हें नाम ज्या ॥३॥ तुका म्हणे साक्षी आले । तरी केलें प्रगट ॥४॥ * क्षणाक्षणा हाचि करावा विचार । तरावया पार भवसिधु ॥१॥ नाशिवंत देह जाणार सकळ । आयुष्य खातो काळ सावधान ॥२॥ संतसमागमीं धरावी आवडी । करावी तांतडी परमार्थी ॥३॥ तुका म्हणे इहलोकींच्या वेव्हारें । नये डोळे धुरें भरुनि राहो ॥४॥ * शांतीपरतें नाही सुख । येर अवघेंचि दु :ख ॥१॥म्हणऊनि शांति धरा । उतराल पैलतीरा ॥२॥खवळलिया कामक्रोधी । अंगी भरतीं आधि व्याधि ॥३॥तुका म्हणे त्रिविध ताप । जाती मग आपेआप ॥४॥*भावें गावें गीत । शुद्ध करुनियां चित्त ॥१॥तुज व्हावा आहे देव । तरि हा सुलभ उपाव ॥२॥आणिकांचे कानीं । गुण दोष मना नाणीं ॥३॥मस्तक ठेंगणा । करी संतांच्या चरणा ॥४॥वेचीं तें वचन । जेणें राहे समाधान ॥५॥तुका म्हणे फ़ार । थोडा तरी परउपकार ॥६॥*आलिया भोगासी असावे सादर । देवावरी भार घालुनिया ॥१॥मग तो कृपासिंधु निवारी साकडें । येर ते बापुडे काय रंक ॥२॥भयाचिये पोटीं दु:खाचिया राशी । शरण देवासी जातां भलें ॥३॥तुका म्हणे नव्हे काय त्या करितां । चिंतावा तो आतां विश्र्वंभर ॥४॥*तरीच जन्मा यावें । दास विठ्ठलाचे व्हावे ॥१॥नाही तरी काय थोडीं । श्वान शुकरें बापुडीं ॥२॥ज्याल्याचें तें फ़ळ । अंगीं लागों नेदी मळ ॥३॥तुका म्हणॆ भले । ज्याच्या नांवें मानवलें ॥४॥ N/A N/A Last Updated : January 23, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP