मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निवडक अभंग संग्रह| निवडक अभंग संग्रह १ निवडक अभंग संग्रह निवडक अभंग संग्रह १ निवडक अभंग संग्रह २ निवडक अभंग संग्रह ३ निवडक अभंग संग्रह ४ निवडक अभंग संग्रह ५ निवडक अभंग संग्रह ६ निवडक अभंग संग्रह ७ निवडक अभंग संग्रह ८ निवडक अभंग संग्रह ९ निवडक अभंग संग्रह १० निवडक अभंग संग्रह ११ निवडक अभंग संग्रह १२ निवडक अभंग संग्रह १३ निवडक अभंग संग्रह १४ निवडक अभंग संग्रह १५ निवडक अभंग संग्रह १६ निवडक अभंग संग्रह १७ निवडक अभंग संग्रह १८ निवडक अभंग संग्रह १९ निवडक अभंग संग्रह २० निवडक अभंग संग्रह २१ निवडक अभंग संग्रह २२ श्री हनुमानजन्माचे अभंग श्रीरामजन्माचे अभंग श्रीकृष्ण जन्माचे अभंग मंगलाचरण पहिले काकड आरतीचे अभंग श्रीसदगुरु महिमा संतसंगमहिमा गौळण दळण विनंतीचे अभंग उपसंहार व वरप्रसाद श्रीसंत सदन महिमा क्षीरापतीचे अभंग प्रारब्धपर अभंग नक्र उद्धार नामधारकाची अधिकारश्रेष्ठता मुका काल्याचे अभंग जोहार जातें एडका दत्तस्तुती दान महात्म्य (महिमा) भजन ज्ञानेश्वर माउली बहिरा आरत्या मदालसा एकादशीचे अभंग द्वादशीचे अभंग चांगदेव पासष्टी निवडक अभंग संग्रह १ निवडक अभंग संग्रह १ Tags : abhangअभंग निवडक अभंग संग्रह १ Translation - भाषांतर सकळ मंगळनिधी । श्रीविठ्ठलाचें नाम आधीं ॥१॥ म्हण कां रे म्हण कां रे जना । श्रीविठ्ठलाचें नाम वाचे ॥२॥ पतीत पावन सांचे । श्रीविठ्ठलाचें नाम वाचे ॥३॥ बापरखुमादेविवरु साचें । श्रीविठ्ठलाचें नाम वाचे ॥४॥ ----------------------- आरंभी आवडी आदरें आलें नाम । तेणें सकळ सिध्दि जगीं झाले पुर्णकाम ॥१॥ रामकृष्ण गोविंद गोपाळा। तूं मायमाउली जीविंचा जिव्हाळा ॥२॥ तुझियेनि नामें सकळ संदेह फ़िटला । बापरखुमादेविवरु श्रीविठ्ठला ॥३॥ ----------------------- दोही बाहीं संतांची सभा । सिंहासनीं उभा श्रीविठ्ठल ॥१॥ गाती नारद तुंबर प्रेमे । हरीचीं नामें गर्जती ॥२॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलु उभा । त्रैलाक्याची शोभा शोभतसे ॥३॥ ----------------------- पन्नास अक्षरीं करिसी भरोवरी । शेखीं तुझें तोंड तुज वैरी रया ॥१॥ यापरी नामाची वोळ मांडुनी । संसार दवडुनी घालीं परता ॥२॥ रकारापुढें एक मकार मांडीं कां । उतरसी सम तुका शंभूचिया॥३॥ बापरखुमादेविवरा विठ्ठलु ह्रुदयीं । आपुली आण वाही त्रिभुवनीं रया॥४॥ ----------------------- गाते श्रोते आणि पाहाते । चतुर विनोदी दुश्र्चिते । सोहं भावी पूर्ण ज्ञाते । या सकळांते विनवणी ॥१॥ करा विठ्ठलस्मरण । नामरुपी अनुसंधान । जाणोनि भक्तां भवलक्षण । जघनप्रमाण दावितो ॥२॥ पुंडलीकाच्या भावार्था । गोकुळींहूनि झाला येता । निजप्रेमभक्ति भक्तां । घ्या घ्या आतां म्हणतसे ॥३॥ मी माझें आणि तुझें । न धरीं टाकीं परतें ओझें । भावबळें फ़ळतीं बीजें । बापरखुमादेविवरु विठ्ठलीं ॥४॥ ----------------------- परिमळाची धांव भ्रमर ओढी । तैसी तुझी गोडी लागो मज ॥१॥ अविट गे माय विटेना। जवळींच आहे परि भेटेना ॥२॥ तृषा लागलिया जीवनातें ओढी । तैसी तुझी गोडी लागे या जीवा ॥३॥ बापरखुमादेविवरा विठ्ठलीं आवडी । गोडियेसी गोडी मिळोनि गेली ॥४॥ ----------------------- दिप दिपिका शशी तारा होतुका कोटीवरी रे । परि न सरे निशि नुगवे दिवसु दिनकरनाथें जयापरी रे ॥१॥ नुद्धरिजे नुद्धरिजे नद्धरिजे गोपाळेंविण नुद्धरिजे॥२॥ नगर भ्रमतां जन्म जावो परि प्रवेशु एक्या द्वारे रे । तैसें यजिजो भजिजो पूजिजो परि उकलु नंदकुमरु रे ॥३॥ सर्वावयवीं शरीर सांग परि विरहित एका जीवें रे । तैसा धिकू तो श्रोता धिकू तो वक्ता जो वाळिला विठ्ठलदेवें रे ॥४॥ गळित शिर हें कलेवर रे उद्केंविण सरिता भयंकर रे । रविशशिवीण अंबर तैसें हरिविण जिणें तें असार रे ॥५॥ अंत:करणीं रुख्मिणीरमणु परि त्या श्र्वपचाहि बंधन न घडे न घडे न घडे रे । येरु यति हो कां भलतैसा परि तो भवाग्निहूनि न सुटे न सुटे न सुटे रे ॥६॥ शिखिपक्षी पत्रीं डोळे जेविं अकाळ जळद पटल रे । तैसीं गोकुळपाळकबाळेंविण कर्में सकळ विफ़ळ रे ॥७॥ यम नियम प्राणायम प्रत्याहार हे सकळ उपाय परि अपाय रे। जंव तमालनील घन:सांवळा ह्रुदयीं ठाण मांडुनि न राहे रे ॥८॥ मी उत्तम पैल हीनु भुत द्वेषाद्वेष ठेले रे । केलेनि कर्में उफ़खां निपजे सुख तें दुरी ठेलें रे ॥९॥ आतां असोत हे भेदाभेद आम्ही असों एक्या बोधें रे । बापरखुमादेविवरु विठ्ठल निवृत्ती मुनिराया प्रसादें रे ॥१०॥ ----------------------- आंनदले वैष्णव गर्जती नामें । चौदाही भुवनें भरली परब्रम्हे ॥१॥ नरहरि नरहरि नारायणा । सनकसनंदन मुनिजनवंदना ॥२॥ गातां वातां वाचता प्रेमें उल्हासें । चराचरींचे दोष नाशियले अनायासें ॥३॥ हरि मनीं हरि चित्तीं हरि अंकु शरीरीं । तयातें देखोनि हरि चार्ही बाह्या पसरीं ॥४॥ अंध्रिरेणु ज्याचा उद्धरिते पतिता । प्राकृतवाणी केवि वानुं हरिंभक्ता ॥५॥ तीर्थें पावन जिहीं धर्म केला धडौती । कैवल्यकल्पद्रुम ते त्रिजगतीं ॥६॥ मत्स्यकूर्मादिक ज्याचे महिमेसी आले । धन्य वैष्णव तेज रविशशिसीं पाहाले॥७॥ बापरखुमादेविवरा पढयंती जिया तनु । तया संतचरणीं स्थिर हो कां मनु ॥८॥ ----------------------- संत भेटती आजि मज । तेणें मी झालों चतुर्भुज । दोन्ही भुजा स्थूळीं सहज । दोन्ही सूक्ष्मीं वाढल्या ॥१॥ आलिंगनें सुख वाटें । प्रेम चिदानंदीं घोटें । हर्षें ब्रम्हांड उतटे । समूळ उठे मीपण ॥२॥ या संतासी भेटतां । हरे संसाराची व्यथा । पुढतां पुढती माथां । अखंडित ठेवीन ॥३॥ या संतांचें देणें । कल्पतरुहूनि दुणें । परिसा परीस अगाध देणें । चितामणी ठेंगणा ॥४॥ या संतांपरीस उदार । त्रिभुवनीं नाहीं थोर । मायबाप सहोदर । इष्टमित्र सोईरे ॥५॥ कृपाकटाक्षें न्याहाळिलें । आपुलें पदीं बैसविलें । बापरखुमादेविवरें विठ्ठलें । भक्तां दिधलें वरदान ॥६॥ ----------------------- अकार उकार मकार करिती हा विचार । परि विठ्ठल अपरंपार न कळे रया ॥१॥ संताचे संगतीं प्रेमाचा कल्लोळ । आनंदें गोपाळ माजी खेळे ॥२॥ भाळे भाळे भक्त गाताती साबडे । त्यांचें प्रेम आवडे विठोबासी ॥३॥ बापरखुमादेविवरु परब्रम्ह पुतळा । तेथील हे कळा निवृत्ति जाणे ॥४॥ ----------------------- पूर्वजन्मीं सुकृतें थोर केलीं । तीं मज आजि फ़ळासि आलीं ॥१॥ परमानंदु आजि मानसीं । भेटी झाली या संतासी ॥२॥ मायबाप बंधु सखे सोयरे । यांतें भेटावया मन न धरे ॥ ३॥ एकएका तीर्थहूनी आगळें । तयामाजी परब्रह्म सांवळे ॥४॥ निर्धनासी धनलाभु झाला । जैसा अचेतनीं प्राण प्रगटला ॥५॥ वत्स बिघडलिया धेनु भेटली । जैसी कुरंगिणी पाडसा मिनली ॥६॥ हें पियुषा परतें गोड वाटत । पंढरीयाचे भक्त भेटत ॥७॥ बापरखुमादेविवरु विठ्ठले । संत भेटतां भव दु:ख फ़िटलें ॥८॥ ----------------------- उंच पताका झळकती । टाळ मृदंग वाजंती । आनंदे प्रेमें गर्जती । भद्र जाती विठ्ठलाचे ॥१॥ आले हरिचे विनट । वीर विठ्ठलाचे सुभट । भेणें जाहले दिप्पट । पळती थाट दोषांचे ॥२॥ तुळसीमाळा शोभती कंठीं । गोपीचंदनाच्या उटी । सहस्त्र विघ्नें लक्ष कोटी ।बारा वाटा पळताती ॥३॥ सतत कृष्णमूर्ति सांवळी । खेळे ह्रुदयकमळीं । शांति क्षमा तया जवळीं । जीवें भावें अनुसरल्या ॥४॥ सहस्त्र नामाचें हतियार । शंखचक्राचे शृंगार । अति बळ वैराग्याचें थोर । केला मार षडूवर्गा ॥५॥ ऎसे एकांग वीर । विठ्ठल रायाचे डिंगर । बापरखुमादेविवर । तिहीं निर्धारीं जोडीला ॥६॥ N/A N/A Last Updated : January 10, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP