पैलमेरुच्या शिखरीं । एक योगी निराकारी । मुद्रा लावुनि खेंचरी । तो ब्रह्मपदीं बैसल ॥१॥
तेणें सांडियेली माया । त्याजिलेली कथा काया । मन गेलें विलया । ब्रह्मानंदा माझारी ॥२॥
अनुहत ध्वनि नाद । तो पावला परमपद । उन्मनी तुर्याविनोदें । छंदे छंदे डोलतुसे ॥३॥
ज्ञानगोदावरीच्या तीरीं । स्नान केलें पांचाळेश्वरीं । ज्ञानदेवाच्या अंतरी । दत्तात्रेय योगिया ॥४॥
N/A
N/A
Last Updated : January 23, 2008
TOP