मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निवडक अभंग संग्रह| निवडक अभंग संग्रह २१ निवडक अभंग संग्रह निवडक अभंग संग्रह १ निवडक अभंग संग्रह २ निवडक अभंग संग्रह ३ निवडक अभंग संग्रह ४ निवडक अभंग संग्रह ५ निवडक अभंग संग्रह ६ निवडक अभंग संग्रह ७ निवडक अभंग संग्रह ८ निवडक अभंग संग्रह ९ निवडक अभंग संग्रह १० निवडक अभंग संग्रह ११ निवडक अभंग संग्रह १२ निवडक अभंग संग्रह १३ निवडक अभंग संग्रह १४ निवडक अभंग संग्रह १५ निवडक अभंग संग्रह १६ निवडक अभंग संग्रह १७ निवडक अभंग संग्रह १८ निवडक अभंग संग्रह १९ निवडक अभंग संग्रह २० निवडक अभंग संग्रह २१ निवडक अभंग संग्रह २२ श्री हनुमानजन्माचे अभंग श्रीरामजन्माचे अभंग श्रीकृष्ण जन्माचे अभंग मंगलाचरण पहिले काकड आरतीचे अभंग श्रीसदगुरु महिमा संतसंगमहिमा गौळण दळण विनंतीचे अभंग उपसंहार व वरप्रसाद श्रीसंत सदन महिमा क्षीरापतीचे अभंग प्रारब्धपर अभंग नक्र उद्धार नामधारकाची अधिकारश्रेष्ठता मुका काल्याचे अभंग जोहार जातें एडका दत्तस्तुती दान महात्म्य (महिमा) भजन ज्ञानेश्वर माउली बहिरा आरत्या मदालसा एकादशीचे अभंग द्वादशीचे अभंग चांगदेव पासष्टी निवडक अभंग संग्रह २१ निवडक अभंग संग्रह २१ Tags : abhangअभंग निवडक अभंग संग्रह २१ Translation - भाषांतर * उदार तूं हरी । ऎसी कीर्ति चराचरीं । अनंत हे थोरी । गर्जताती पवाडे ॥१॥ तुझे पायीं माझा भाव । पुसी जन्ममरण ठाव । देवाचा तूं देव । स्वामी सकळां ब्रह्मांडा ॥२॥मागणें तें तुज मागों । जीवभाव तुज सांगो । लागों तरी लागों । पायां तुमच्या दातारा ॥३॥दिसों देसी कीविलवाणें । तरी तुजचि हे उणें । तुका म्हणे जिणें माझे तुज अधीन ॥४॥ * नव्हे गुरुदास्य संसारिया । वैराग्य तरी भेणें कापें विषयां । तैसें नाम नव्हे पंढरीराया । जया सायास न लगती ॥१॥ म्हणोनि गोड सर्वभावें । आंघोळी न लगे तोंडे धुवावें । आर्तचाड जीवें । नलगे भ्यावें संसारा ॥२॥ कर्म तंव न पुरे संसारिक । धर्म तव फ़ळदायक । नाम विठ्ठलाचें एक । नाशी दु :ख भवाचें ॥३॥न लगे सांडणे मांडणें । आगमनिगमाचें देखणें । अवघे तुका म्हणे । विठ्ठल नामें आटलें ॥४॥*कळे ना कळे ज्या धर्म । ऎका सांगतों रे वर्म । माझ्या विठोबाचें नाम । अट्टाहासें उच्चारा ॥१॥तो या दाखवील वाटा । जया पाहिजे त्या निटा । कृपावंत मोठा । पाहिजे तो कळवळा ॥२॥पुसतां चुका होतो वाटा । सवें बोळावा गोमटा । मोडों नेदी कांटा । घेऊं सांटा चोरासी ॥३॥तुका म्हणे मोल । नलगे द्यावें वेचा बोल । विठ्ठल विठ्ठल । ऎसा छंद मनासी ॥४॥*कै वाहावे जीवन । कै पलंगीं शयन ॥१॥जैसी जैसी वेळ पडे । तैसें तैसें होणें घडे ॥२॥कै भोज्य नानापरी । कै कोरड्या भाकरी ॥३॥कैं बैसावें वहनीं । कै पायीं अनवाणी ॥४॥कैं उत्तम प्रावणें ।कैं वसनें तीं जीणें ॥५॥कैं सकळ संपत्ती । कैं भोगणें विपत्ती ॥६॥कैं सज्जनाशीं संग । कैं दुर्जनाशीं योग ॥७॥तुका म्हणे जाण । सुख दु:ख तें समान ॥८॥*कथा त्रिवेणीसंगम । देव भक्त आणि नाम । तेथींचें उत्तम । चरणरज वंदिता ॥१॥जळती दोषांचे डोंगर । शुद्ध होती नारी नर । गाती ऎकती सादर । जे पवित्र हरिकथा ॥२॥तीर्थें तया ठाया । येती पुनीत व्हावया । पर्वकाळ पायां । तळीं वसे वैष्णवां ॥३॥अनुपम्य हा महिमा । नाही द्यावया उपमा । तुका म्हणॆ ब्रह्मा । नेणें वर्णू या सुखा ॥४॥*यमधर्म सांगे दूतां । तुम्हां नाहीं तेथें सत्ता । जेथें होय हरिकथा । सदा घोष नामाचा ॥१॥नका जाऊं तया गावां । नामधारकाच्या शिवां । सुदर्शन यावा । घरटी फ़िरे भोंवतीं ॥२॥चक्र गदा घेउनि हरि । उभा असे त्याचें व्दारी । लक्ष्मी कामारी । रिद्धिसिद्धिसहित ॥३॥ते बळिया शिरोमणी । हरिभक्त ये मेदिनी । तुका म्हणे कानीं । यम सांगे दुतांचे ॥४॥*परमअमृतें रसना ओलावली । मनाची राहिली वृत्ति पायीं ॥१॥सकळहीं तेथें वोळलीं मंगळें । वृष्टि केली जळें आनंदाच्या ॥२॥सकळ इंद्रिये झालीं ब्रह्मरुप । ओतलें स्वरुप माजी तया ॥३॥तुका म्हणे जेथें वसे भक्तराव । तेथें नांदे देव संदेह नाहीं ॥४॥*तेचि संत तेचि संत । ज्यांचा हेत विठ्ठलीं ॥१॥नेणती कांहीं टाणेटोणे । नामस्मरणावांचुनी ॥२॥काया वाचा आणि मनें । धालें चिंतनें डुल्लती ॥३॥निळा म्हणे विरक्त देहीं। आठवचि नाहीं विषयांचा॥४॥*मार्ग दाउनि गेले आधीं । दयानिधी संत पुढें ॥१॥तेणेंचि पंथे चालों जातां । न पडे गुंता कोठेंकांही ॥२॥मोडोनियां नाना मतें देती सिद्धांतें सौरसु ॥३॥निळा म्हणे ऎसे संत । कृपावंत सुखसिंधु ॥४॥*मुख्य महाविष्णु चैतन्याचें मूळ । सांप्रदाय फ़ळ तेथोनियां ॥१॥हंसरुपी ब्रह्मा उपदेशीं श्रीहरी । चतु:श्लोकीं चारी भागवत ॥२॥तें गुज विधाता सांगें नारदासी । नारदें व्यासासी उपदेशिलें ॥३॥राघव चैतन्य केलें अनुष्ठान । त्यासी द्वैपायनें कृपा केली ॥४॥कृपा करुनि हस्त ठेवियेला शिरीं । बोध तो अंतरीं ठसावला ॥५॥राघवां चरणीं केशव शरण । बाबाजीशीं पूर्ण कृपा त्याची ॥६॥बाबजीनें स्वप्नीं येऊनि तुकयाला । अनुग्रह दिला निज प्रीति ॥७॥जगद्गुरु तुका अवतार नामयाचा । संप्रदाय सकळांचा येथुनियां ॥८॥निळा म्हणे मज उपदेश केला । संप्रदाय दिला सकळ जना ॥९॥*पूर्ण केला पूर्ण केला । पूर्ण केला मनोरथ ॥१॥घरा आले घरा आले । घरा आले कृपाळू ॥२॥सांभाळिले सांभाळिले । सांभाळीले अनाथा ॥३॥केला निळा केला निळा । केला निळा पावन ॥४॥*इस तन धनकी कौन बढाई । देखत नयनोंमे मिट्टी मिलाई ॥धृ॥अपने खातिर महल बनाया । आपही जाकर जंगल सोया ॥१॥हड्डी जले जैसे लकडीकी मोली । बाल जले जैसी घासकी पोली ॥२॥कहत कबीरा सुन मेरे गुनिया । आप मुवे पिछे डुब गई दुनिया ॥३॥*हरिसे कोई नहीं बडा । दिवाने क्यों गफ़लतमें पडा ॥धृ॥प्रल्हाद बेटा हरिसे लपटा । जभी खंभ कडकडा ॥१॥गोपीचंद बचन सुनकर । महल मुलुख सब छोडा ॥२॥हनुमानने सेवा कीन्ही । ले द्रोणागिरी उडा ॥३॥पुंडलिकने सेवा कीन्ही । विठ्ठल बिटपर खडा ॥४॥कहत कबीरा सुन भाई साधु । हरीचरण चित जडा ॥५॥* N/A N/A Last Updated : January 23, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP