वैशाख शुद्ध १२
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
शहाजीविरुध्द तहनामा !
शके १५५४ च्या वैशाख शु. १२ रोजीं शहाजहान बादशहा व अदिलशहा यांच्यामध्यें शहाजीला पराभूत करण्याबद्दल तह झाला.
सोळाव्या शतकांत शहाजीचें सामर्थ्य वाढीस लागलें होतें. मोंगल सत्तेचा पराभव होत चाललेला पाहून शहाजहानाला बिलकुल चैन पडत नव्हतें. त्यानें आपला मोहरा दक्षिणेकडे वळवला. दौलताबादेस आल्याबरोबर आजूबाजूचे लोक त्यास शरण गेले. त्याचेबरोबर औरंगजेब, जयसिंह, शाहिस्तेखान, वगैरे मंडळी होतीच. पहिल्याप्रथम शहाजीचा पाडाव करण्याच्या मार्गास बादशहा लागला. शाहिस्तेखानानें जुन्नर व संगमनेर हीं स्थळें काबीज केलीं. शिवनेरीवर शहाजीचीं बायकामुलें होतीं. तींहि मोंगलांच्या हातांत सांपडलीं. परंतु, धीर खचूं न देतां शहाजीनें मोठया शौर्यानें शत्रूंस तोंड दिलें. पुणें, चाकण, जुन्नर, इत्यादि स्थळें काबीज करुन त्यानें बायकामुलांना सोडाविलें आणि तो कोंकणांत माहुली किल्ल्यावर गेला. तेव्हां शहाजहाननें शहाजीचा नाद तूर्त सोडून दिला व शहाजीस विजापूरचा पाठिंबा मिळतो तो मिळूं नये या खटपटीस तो लागला. त्यानें आदिलशहास कळविलें, “आम्हांस तुमच्या वाटेस जावयाचें नाहीं. निजामशाही जिंकण्याचें काम पूर्ण केल्यावर आम्ही परत जाणार तुम्हीं शहाजीचे साह्यास फौज पाठवली आहे ती एकदम परत बोलवा. शहाजीस तुम्हीं सोडल्यास तुम्हांला भीमेच्या पलीकडचा व कोंकणांतील निजामशाहीचा प्रदेश देऊं. शहाजीशीं लढणें आम्हांस प्राप्त आहे.त्या कामीं तुम्हीं आपली फौजा आमचे मदतीस पाठवली पाहिजे”, आदिलशाहास हें बोलणे पसंत पडण्यासारखेंच होतें. त्यानें ताबडतोब रणदुल्लाखानास बोलावून घेऊन बादशहाच्या अटीस मान्यता लिहून दिली. आणि त्याप्रमाणें वैशाख शु. १२ रोजीं तह कायम झाला. त्यांतील दोन कलमें फार महत्त्वाचीं आहेत. अदिलशहानें नजराणा म्हणून बादशहाला वीस लाख रुपये द्यावेत., शहाजीनें जुन्नर वगैरे स्थळें व किल्ले सोडून दिल्यास त्यास अदिलशहानें आपल्या नोकरीस घ्यावें पण त्यानें हीं ठिकाणें न सोडल्यास तीं जिकण्यासाठीं अदिलशहानें आपली आपल्या नोकरीस घ्यावे पण त्यानें हीं ठिकाएं न सोडल्यास ती जिंकण्यासाठीं अदिलशहानें आपली फौज मोंगलांच्या साह्यास पाठवावी.
- ६ मे १६३२
N/A
References : N/A
Last Updated : September 19, 2018
TOP