मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|
याज्ञवल्क्य संवाद

आख्यान मैत्रेयी - याज्ञवल्क्य संवाद

कीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.


आर्या --- पंचालीं द्विजवंशी झाला विख्यात याज्ञवल्क्यमुनी ॥ योगीद्रें जनकें जो ब्रम्हिष्ठ म्हणूनि पूजिला नमुनी ॥१॥
कुरुपांचालस्थद्विजमिथिलेशें मखसभेसि मिळविले ॥ करिती प्रश्न परोपरि ब्राम्हण नि:शंकमन तपां केले ॥२॥
ते जेणें परविद्या विवरुनि नि:शेष सकल डोलविले ॥ स्वर्णालंकृत गो दशशत धन पण जिंकुनी गृहा नेलें ॥३॥

श्लोक --- गार्हस्थ्यधर्में मुनि काळ कांही । राहे पुढें आदर-भाव नाहीं ॥ कीं वानप्रस्थाश्रम सेवुनियां ।सुखे त्यजावी भवमोहमाया ॥१॥
आर्या--- भार्या दोन मुनीला, होत्या कात्यायनी वडील सती ॥ मैत्रेयी धाकुटि परि सारासारज्ञ चतुर प्रौढमती ॥१॥
श्लोक --- वर्ते मुनी जरि समानपणे तयांसी । वाटे दुजी प्रियतरा पतिच्या मनाशी ॥ होती जरी सकळहि अनुकंप्य संतां ॥ येती तथापि समशील विशेष चित्ता ॥१॥
असो एका वेळीं मुनि निज मनिषा उभयतां । स्त्रियांलागी सांगे गृहधनजनीं नाही ममता । गमे माझ्या चित्ता विजनि वसुनि आयु उरलें । क्रमावे ज्यामागें सुजन सनकादीक तरले ॥२॥
असे माझ्यापाशी धन सकळ ते वाटुंनि पहा । तुम्हां देतो तेणे करुनि चरितार्थ गृहि रहा ॥ अशी वाणी कानीं श्रवण करुनि धाकुटि म्हणे । तुम्ही जातां आम्हां गृहजनधने कार करणें ॥३॥
दिंडी --- जरी भरली सर्वही क्षिती वित्तें । तरी जोडे अमृतत्व काय मातें । मुनी बोले चरितार्थ धने चाले । नसे कोणीं अमृतत्व जोडियेलें ॥१॥
म्हणे मैत्रेयी तरि मला नको वित्त ॥ नसे माझे नश्वरी लुब्ध चित्त ॥ मला सांगा अमृतत्व कसे जोडे ॥ कसे मनिंचे मृत्युभय कधी मोडे ॥२॥
साकी --- ऐकुनि मुनिवर म्हणे सतीतें तू माझी प्रिय जाया ॥ बोलसि तेंहि प्रिय मज वाटे बैस जवळिया ठाया ॥ कथिन उपाय तूतें ॥ जेणे जिकिशीं मृत्यूते ॥धृ.॥ वाटे परम प्रिय पतीस तिला परि तो प्रिय न तदर्थ ॥ वाटे तो प्रिय जोंवरि तेणे होय तिचा निज अर्थ ॥ विवरुनि पाहे मनीं । तरि हे येईल तव ध्यानी ॥२॥धृ.॥
वाटे जाया प्रिय बहु पतिला परि ती प्रिय न तदर्थ ॥ वाटे तोवरि प्रिय ती त्याला जोवरि त्याचा स्वार्थ ॥ विवरुनि पाही मनी । तरि येईल तव ध्यानी ॥३॥
देवावरि हे करिती भक्ति परि न करिति त्यासाठी ॥ आत्महितास्तव भजति सर्वही निजहित वांछा मोठी ॥ विवरुनि पाहि मनी । तरि हे येईल ध्यानी ॥४॥धृ.॥
पुत्र धनादि सकलहि ऐहिक आयुष्मिकही सारे ॥ होय प्रिय परित तें आत्मार्थचि जाणावे विचारें ॥ विवरुनी पाही मनी । तरि हे येईल ध्यानी ॥५॥धृ.॥
यास्तव प्रियतम सकला आत्मा निरपेक्ष जगीं एक ॥ सहज सिद्ध हें तत्व धरीं दृढ हृदयीं करुनि विवेक ॥ विवरुनी पाहि मनी । तरि हे येईल ध्यानी ॥६॥
आर्या --- कैसें स्वरुप त्याचें स्थिती मति कैशी कळे तदा ज्ञान ॥ निरसीं निजप्रकाश भवभय तम मृत्यूचे हरी भान ॥१॥
पाहति नेत्र तसे हे ऐकति कर्णहि वदे तशी रचना ॥ मिथ्या हें की न करिति निजकार्ये जरि सन्निधान मना ॥२॥
ते मनही प्रेरुनियां जो वर्तवितोचि जाण भूतात्मा ॥ चिन्मय अविनाश परी परतंत्र स्वतंत्र एक सर्वात्मा ॥३॥
होतां ज्ञान तयाचें हे सर्व ज्ञात होय तन्निष्ठ ॥ न मिळे अन्यत्र कुठें तद्रुपत्वें अनन्य हें स्पष्ट ॥४॥
श्लोक --- जसा दुंदुभी सोडुनि नाद त्याचा । मिळेना कुठें होय तेथेचि साचा ॥ जसा शंख वीणादिकांचा निनाद । तदन्यत्र लाभे वृथा हा विवाद ॥१॥
निघे धूम्र आर्द्रे नांतुनि जैसा । निघे वे शास्त्रादि शब्दौघ तैसा ॥ जयापासूनी ते महदभूत एक । असे मूळ सर्वांप्रती हो विवेक ॥२॥

आर्या --- उदकें सर्व समुद्रीं स्पर्श त्वचेमाजि रसहि रसनांत ॥ रंगतसे दृष्टिमध्ये ध्वनिहि श्रवणी विचारहि मनांत ॥१॥
ज्ञान हृदयीं कर्म करीं गती चरणी शब्द सर्व वाणींत । क्षारोदकीं लवणसें निज कारणि कार्य सर्वही विरत ॥२॥
दिंडी --- महद्‍भूतीं भावके विश्व जेव्हां । होय भूतात्मा तिथे लीन तेव्हां ॥ लीन भावे होरपे सर्व भाना । एकरुपी कोठूनी पृथग्ज्ञाना ॥१॥
उपसंहार
आरती समाप्त.


N/A

References : N/A
Last Updated : December 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP