मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर पदे| भाग ११ विविधविषयपर पदे नरदेह कलिवर्णन निंदक ब्राह्मण यत्न षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ वैराग्य भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ उपदेशपर पदे - भाग ११ श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे Tags : gathasamarthaगाथासमर्थ भाग ११ Translation - भाषांतर १५३१( राग-मांड; ताल-दीपचंदी. )जना जन पाळिताहे ॥ध्रु०॥वृद्धा बाळपण बाळा वृद्धपण । अंतर शोधुनि पाहें ॥१॥श्रेष्ठ कनिष्ठां कनिष्ठ श्रेष्ठां । उसिणें फिटत जाय ॥२॥जग जगाचें जीवन साचें । कर्ता तो करिताहे ॥३॥एका पाळितो पाळुनि घेतो । दोंहिकडे फिरताहे ॥४॥अंतरवासी देव विलासी । दास समजता राहे ॥५॥१५३२( चाल-साधुसंतां मागणेम० )जाणोनि कासया नेणतोसी रे । वायां माझें माझें म्हणतोसी रे ॥ध्रु०॥माझें माझें म्हणतां सर्व गेलें रे नाहीं ठेलें रे । असंख्यात जन्मले आणि मेले रे काळें नेले रे ॥१॥मन हें चंचळ आवरेना रे सावरेना रे । दुःख त्या देहाचें सरेना रे विसरेना रे ॥२॥विद्या वैमव जाईजणें रे दैन्यवाणें रे । येणें चुकेना येणें जाणें रे साधुविणें रे ॥३॥बोलासारिखें चालावें रे निजमावें रे । हित आपुलें आपण करावें रे उद्धरावें रे ॥४॥किती सांगणें वारंवार रे भक्तिसार रे । करितां पावे पैलपार रे निरंतर रे ॥५॥संतसंगें होतसे उपाय रे घरीं सोय रे । दुर्लभ आयुष्य शब्द रे शब्द काय रे ॥६॥रामदास म्हणे सावधान रे करीं मन रे । बृत्ति राहतां उदासीन रे करीं समाधान रे ॥७॥१५३३( रग-बरवा; ताल-दादरा. )नका नका नका चुकों नका रे नका रे । चुकतां बैसेल काळधका रे ॥ध्रु०॥साधा साधा साधा काळ साधा रे साधा रे । साधितां चुकेल भवबाघा रे ॥१॥सोडा सोडा सोडा संग सोडा रे संग सोडा रे । दुश्चितपणाचें मूळ तोडा रे ॥२॥रामदास म्हणे ज्ञान वाड रे वाड रे वाड रे । सावधासीं सांपडे घबाड रे ॥३॥१५३४( चाल-ज्या ज्या वेळीं जें जें० )सार्थक होतें सार्थक होतें दुरित सरत जातें । पुण्यपावन ज्ञानमार्ग हा देवदर्शन होतें ॥ध्रु०॥शिकली कळा बाहेर मुद्रा अंतर्कळा समजावी । जेणेंकरितां देव पाविजे तेचि द्दढ घरावी ॥१॥ज्ञानविना ते पशु जाणावे वचन भगवंताचें । अध्यात्मविद्या शोघिलियाविण व्यर्थचि माणुस काचें ॥२॥दास म्हणे तो आत्मघातकी स्वहित करीना तो । मायाजाळें भ्रमोनि गेला व्यर्थचि मरोन जातो ॥३॥१५३६( राग-भीमपलास; ताल-दादरा. )समजलें पाहिजे ऐसें समाजलें पाहिजे । संगतिचे जन तरीच सज्जन होउनि राहिजे ॥ध्रु०॥देव व्यापक तैसा चि सेवक तरीच सार्थंक होतें । संगति आहे गुण न लाहे सकळ व्यर्थचि जातें ॥१॥देव साक्षपी भक्त आळसी तरीच खायासी मिळेना । कैसें भजावें काय त्यजावें ऐसेंहि कळेना ॥२॥दास म्हणे संसार जिणें तरि कांहीं कळत नाहीं । सारासार विचारुनि पाहीं निश्चाळ होउनि राहीं ॥३॥१५३७( राग-बागेश्री; ताल-धुमाळी. ) जीवाचें जीवन जगज्जीवन हरी । सकळीक जनांचें पाळण करी । पाहतां तयेची अमृत लहरी । तयेसी न पवे देतां दुसरी सरी ॥ध्रु०॥ मनाचें मोहन मनमोहन लीळा । सकळ अंतरीं जाण सकळ कळा । तयाविण आणिक न दिसे जिव्हाळा । सकळीं असोन रे सकळ कळा । तयाविण आणिक न दिसे जिव्हाळा । सकळीं असोन रे सकळां वेगळां ॥१॥नटकत नाटक नाना वेषधारी । परम सुंदर नाना कळा कुसरी । अनेक चालवी येक बहुतांपरी । येक तनु त्यजी येक सवेंचि घरी ॥२॥चालत सकळ जन नवल मोठें । तयास नेणतां त्याचें सकळ खोटें । देवास चुकलें तें माणुस चोरटें । मायबोपेंविणें पोर पोरटें ॥३॥अमिनव नवल नवला । लटकी च कासया करिसी वळवळ । तुझी च करणी तुजलागीं फळेल । आपदा पावसी तेव्हां मग कळेल ॥४॥रामदास म्हणे तुम्ही शाहाणे कसे । सकळ चळतें देखतां वळसे । शरीरसंपत्तीचे कोण भर्वसे । धन्य ते भजक देव ह्र्दईं वसे ॥५॥१५३८( राग-काफी; ताल-दीपचंदी; चाल-राजी राखो रे० )अरे मना घ्यायीं हरी रे किती भरसी भरीं रे ॥ध्रु०॥लालुच हे जन चंचळ लोचन । व्यर्थ अमिलाष करी रे ॥१॥पर अभिलाष विलास मानसीं । हेंचि बरें विवरीं रे ॥२॥दैन्य वृद्धपण येईल मरण । दास म्हणे विवरीं रें ॥३॥१५३९( राग-गौड सारंग; ताल-धुमाळी )चाल रे मना भेटों जाऊं । सज्जना । तेथें आहे आमुचा रामराणा ॥ध्रु०॥ऊठ लवकरीं चाल जाऊं झडकरीं । जाऊन रामपायीं सुख घेऊं धणीवरी ॥१॥भाव दाविला तोहि असे गोंविला । सोडीं काम जावों राम पाहों आपुला ॥२॥मन चालिलें तेणें मूळ शोधिलें । संत रामदास त्याला सकळ भेटले ॥३॥१५४०( राग-बिलावल; ताल-दादरा )मना सोडीं सोडीं सोडीं नाना खोडी रे । करीं भजन राम जोडी ॥ध्रु०॥जाणत जाणत नेणतोसी रे । वायां माझें माझें म्हणतोसी रे ॥१॥गेला रे जन्म गेला रे । अमावें आपुला घात केला रे ॥२॥शरीरसंपत्ति जाईजणें रे । सावघान होईं दास म्हणे रे ॥३॥१५४१( राग-सोहोनी; ताल-धुमाळी चाल-हित गेलें रे० )न झांकीं डोळे मना न झांकीं डोळे । सत्य रामेंवीण सुख न मिळे ॥ध्रु०॥काळव्याळ विषाळवाणा । वदनीं घालून आम्हां गिळित आहे । सावघ पाहे । आक्रंदोनी बाहे ॥१॥स्वयें नेणसी नायकसी ऐसें करणें काय । सुखाकारणें विषय सेविसी । परि तेथें सुख नोहे ॥२॥कामनिरयडोहीं बुडिजे आणि । जन धिग धिग म्हणे । रामीरामदासी मिनलियां । तरोनि ध्यन्य होणें ॥३॥१५४२( राग-मैरवी; ताल-दादरा. )सज्जना सज्जन मानी मना । अगणीत गुणगणना ॥ध्रु०॥गुणीं गुणालय आलय लीळा पाळक जो भजना ॥१॥दास हरिजन भ्रमित उदासीन । गळीत येना स्वघना ॥२॥१५४३( राग-जिल्हा; ताल-धुमाळी. ) किती आले येऊनि गेले । मले कीर्तिच ठेऊनि गेले । येक अपकीतींनें ज्याले । रे रे रे रे। सेखीं अवघेंचि मरोनि गेले रे ॥ध्रु०॥जनीं संसार जाईलणा । जगीं देखतां तरि कां नेणा । अंतकाळीं होइला दैन्यवाणा । रे०। हित आपुलें आपण जाणा रे ॥१॥वैमवाचे डोंगर केले । किती येक ते सांडुनि गेले । एक आधींच सावध जाले । रे०। संतसंगतीनें निवाले रे ॥२॥इहलोकीं संसार करावाअ । परलोक तोही साघावा । हळूहळूं ऊगवावा । रे०। नित्यकाळ तो आठवावा रे ॥३॥दास म्हणे सावधान । पुढें कळेन व्यवधान । द्यावें निरूपणीं अवधान । रे०। येर तें नाहीं सावधान रे ॥४॥१५४४ ( चाल-नामामध्यें उत्तम० )तनना तनना म्हणतां जन्म गेला । तन हें आपुलेंचि मानूनि राहिला । अंतकाळीं अवचिता आला घाला । सर्व सांडून एकलाचि निघाला ॥ध्रु०॥जन्मवरी म्हणतो माझें माझें । वेडें हिंपुटी जालें घेतें ओझें । वेडया मानवा रे काय आहे तूझें । पाहे अंतरीं समजे बरें बूझें ॥१॥जन्मवरी उदंड स्वार्थ केला । कितीएक जनीं अनथीं घातला । मायाजाळीं बहुत सुखावला । पुढें विचारितां दुःखचि पावला ॥२॥दास म्हणे विचारीं कांहीं हित । देह चालतें तों करावें स्वहित । देव असतां कां जालासी पतित । ज्ञानें पावन राहावें सर्वातीत ॥३॥१५४५( राग-कल्याण; ताल-धुमाळी. )मज मानत नाहीं तनाना । अर्थप्रबंध कां हो म्हणाना । अभ्यंतर बरें ओळखाना ॥ध्रु०॥अर्थ घन स्वर पोंचट । अर्थेंवीण शब्द फळकट । विवरतां चुके खटपट ॥१॥अर्थाकरितां खलित्या मिळती । खलितीनें द्रव्यप्राप्ती । समजतां कळे सप्रचीती ॥२॥धान्याकरितां भूसचि होतें । भूस पेरितां काय पिकतें । सार घेऊनि असार सांडिजेतें ॥३॥दास म्हणे हें न कळे जयासी । किती म्हणोनि सांगों तयासीं । समजतां कळे सकळांसी रे ॥४॥ N/A References : N/A Last Updated : May 20, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP