मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर पदे| भाग १ विविधविषयपर पदे नरदेह कलिवर्णन निंदक ब्राह्मण यत्न षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ वैराग्य भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ करूणापर पदे - भाग १ श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे Tags : gathasamarthaगाथासमर्थ भाग १ Translation - भाषांतर १२३७( राग-मांड; ताल-दादार )राजिवलोचना रामा रमारमणा राघवा । पतितपावना भवनबंध सोडवा ॥ध्रु०॥भवबंधनमोचना दीनोद्धरणा श्रीपाती । जननीजठरीं शय्या चुकवीं विपत्ति ॥१॥रामदास म्हणे रघुराजया अवघारीं । बहु हिंडतां श्रमलों भवबंधमुक्त करीं ॥२॥१२३८ चौपदी पावनमिक्षा दे रे राम । दीनदयाळा दे रे राम ॥१॥अभेद्भक्ति दे० । आत्मनिवेदन दे रे० ॥२॥तद्रापता मज दे रे० । अर्थारोहण दे० ॥३॥सज्जनसंगति दे० । अलिप्तपण मज दे० ॥४॥ब्रह्मानुभव दे० । अनन्य सेवा दे० ॥५॥मजविण तूं मज दे० । दास म्हणे मज दे० ॥६॥कोमळ वाचा दे० । विमळ करणी दे० ॥१॥प्रसंगओळखी दे० । घूर्त कळा मज दे० ॥२॥हितकारक दे० । जनसुखकारक दे रे० ॥३॥अंतरपारखी दे० । बहु जनमैत्नी दे० ॥४॥विद्यावैभव दे० । उदासीनता दे० ॥५॥मागों नेणे दे० । मज न कळे तें दे० ॥६॥तुझी आवडी दे० । दास म्हणे मज दे० ॥७॥सांगित गायन दे० । आलाप गोडी दे- ॥१॥धात माता दे० । अनेक धाटी दे० ॥२॥रसाळ मुद्रा दे० । जाड कथा मज दे रे० ॥३॥दस्ताक टाळी दे० । नृत्यकळा मज दे० ॥४॥प्रबंध सरळी दे० । शब्द मनोहर दे० ॥५॥सावधपण मज दे० । बहुत पाठांतर दे० ॥६॥दास म्हणे रे गुणधामा । उत्तम गुण मज दे रे राम ॥७॥१२३९ ( चाल-उत्तम जन्मा येउनि रामा० )अहंतेनें भुलविलों ज्ञानाचिनि द्वारें । घांव देवा नागविलो अभिमानाचोरें । उमस नाहीं येतें मीपणाचें काविरें । प्रकाश मोडला भ्रांति पडली अंघारें ॥ध्रु०॥बहु श्रवणें घटेल ज्ञाता होउनियां ठेलों । सिद्धपणाचा थाटा आंगीं घेउनि बैसलों । बोले तैसें चालवेना मीच लाजलोंज । शब्दज्ञान काबाडी ओझें वाहातचि मेलों ॥१॥शब्दज्ञान डफाचें गाणें आवडतें भारी । देहबुद्धीचें कुतरें मी दुसर्याचें निवारीं । ज्ञातेपणें फुंज भरला माझे अंतरीं । रामदास म्हणे आतां म्हणे आतां निःसंग करीं ॥२॥१२४०( राग-जोगी; ताल-दीपचंदी )अपराध माझा क्षमा करीं रे श्रीरामा ॥ध्रु०॥दुर्लभ देह दिधलें असतां नाहीं तुझिया प्रेमा । व्यर्थ आयुष्य वेंचुनि विषयीं जन्मुनि मेलों रिकामा ॥१॥नयनासारिखें दिव्य निधान पावुनियां श्रीरामा । विश्वप्रकाशक तुझें रूपडें न पाहें मेघःशामा ॥२॥श्रवणें सावध असतां तव गुणकीर्तनिं त्नास आरामा । षड्रसमोजनिं जिव्हे लंपट नेघे तुझिया नामा ॥३॥घ्राण सुगंध हरुषें नेघे निर्माल्य विश्रामा । करमूषणें तोषुनि नार्चिति तव स्वरूपा गुणग्रामा ॥४॥मस्तक श्रेष्ठ हें असतां तनुतें न वंदीं पदपद्मा । दास म्हणे तूं करुणार्णव हे सीतालंकृतवामा ॥५॥१२४१ ( राग-कल्याण; ताल-दादरा )शरण तुज रघुवीरा० । शरण तुज रघुवीरा । हो रामा, गुणगंभीरा । धन्य धन्य दातारा । कृपाळू खरा ॥ध्रु०॥जन्मदुःख सांगतां नये । सांगुं मी काय । दूरी करूनि अपाय । केले उपाय ॥१॥बाळपणापासुनि वेडें । तुज सांकडें । सांगूं मी कवणापुढें । जालें एवढें ॥२॥जीविचें मनींचे पुरविलें । गोमटें केलें । सर्व साहोनियां नेलें । नाहीं पाहिलें ॥३॥देवा तूं त्नैलोक्यनाथ । मी रे अनाथ । मज करूनि सनाथ । केलें समर्थ ॥४॥दास म्हणे तुझ्या अन्नाचा । वाढलों साचा । मज हा संसार कैंचा । सर्व देवाचा ॥५॥१२४२( राग-कल्याण; ताल-धुमाळी. )अरे तूं दीनदयाळा पाव वेगीं ॥ध्रु०॥अहंममता मम घातकी । जाते घालुनी घाला ॥१॥निर्जरमौळीविभूषणा । धीर बुडाला चाल वेगीं ॥२॥दास म्हणे करुणालया । जीव व्याकुळ जाला ॥३॥१२४३ ( राग-मैरव; ताल-घुमाळी )देवा भगवंता । पुरूषोत्तमा । भावार्थनामा । मनोजय इंद्रियादमा । उत्तमोत्तमा ॥ध्रु०॥जें जें संसारीं केलें । तें तें व्यर्थचि गेलें ॥१॥देवावेगळें होतें । तें तें व्यर्थचि जातें ॥२॥दास म्हणे आपण । सर्वही रामार्पण ॥३॥१२४४ ( राग-अहेरी; ताल-धुमाळी; चाल-मर्जी देवाची० )वेधु लागो रे छंदु लागो रे । भजन तुझें मन मागो रे ॥ध्रु०॥वय थोडें रे बहु झोडें रे । संसार सांकडें बहु कोडें रे ॥१॥तुझ्या गुणें रे काय उणें रे । भजन घडावें पूर्वपुण्यें रे ॥२॥भक्तिभावें रे उद्धरावें रे । संसाराचें दुःख विसरावें रे ॥३॥१२२४५( रागा-जोगी; ताल-दादरा ) दीनदयाळा रघुवीरा आजिं कठिण कां रे । काय करूं जगज्जीवना धरिलें दुरी कां रे ॥ध्रु०॥मायाजाळ न सोसवे खंती वाटत आहे । तळमळ तळमळ अंतरीं करुणाकर पाहे ॥१॥चातक सीणत राहिलें गेला मेघ सुखाचा । दास उदास न सावरे जीवनीं मरे कैंचा ॥२॥१२४६( राग-सारंग; ताल-दादरा; चाल-सामर्थ्याचा गामा. )पतितपावन रामा शिवमानसरामा । सुखदायक निजधामा ।पालय मुनिविश्रामा ॥ध्रु०॥करुणाकर सुरवरदा । पीयूषसामगुणहरदा । विलसत मणिमकरंदा । जयजय जगदानंदा ॥१॥दुर्जनदुरितविदारा । दानवबलिसंहारा । शरय़ूपुलिन विहारा । जयजय जगदाधारा ॥२॥निगमागमसारांशा । कुलभूषण रघुवंशा । जगदोद्भव चलितांशा । कमलोद्भवभवईशा ॥३॥कलितकलुषनिवारा ।गुणगणिता अनिवारा । सहजसमाधि उदारा । दासमनोरम सारा ॥४॥१२४७ ( राग-मैरव; ताल-भजनी ) रामा रामा रामा रामा रामा हो । तारीं तारीं तारीं तारीं आम्हां हो ॥१॥तोडीं तोडीं तोडीं तोडीं भवपाश । अनन्य शरण रामीरामदास ॥२॥१२४८ ( राग-मैरव; ताल-घुमाळी )रामा रामा रामा रामा रामा अहो जय रामा ॥ध्रु०॥पतितपावन दीनबंधु । अहो० । भक्तभूषण दयासिंधु ॥अहो० ॥१॥देवां मंडण देवराया ! अहो०॥अनाथबंधु कुडावया ॥अहो० ॥२॥रामदास म्हणे देवा । अहो०। तुझें भजन पूर्व ठेवा । अहो जय रामा ॥३॥१२४९( राग-शंकरभरण किंवा सारंग; ताल-दादरा; चाल-दृश्य पाहतां )जय जय रामा ॥ध्रु०॥वारिजदळनयाना । मुनिजनमनंरजना । तुजविणें कंठवेना । रे रामा ॥१॥सुरवरवरदायका । त्नैलोक्यनायका । भवबंधनछेदका । रे रामा ॥२॥दशरथनृपनंदना । अरिकुळमुळखंडणा । रामदासमंडणा । रे रामा ॥३॥१२५०( राग-मैरव; ताल-धुमाळी )अहो जयरामा हो जय-रामा ॥ध्रु०॥पतितपावन नाम साजिरें । ब्रिद साच दार्वी आम्हां हो ॥१॥दीनानाथ अनाथबंधु । तुजविण कोन आम्हां हो ॥२॥दास म्हणे नाम तारक तुझें । बहु प्रिय तुज्या नामा हो ॥३॥ N/A References : N/A Last Updated : May 14, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP