मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर पदे| भाग ७ विविधविषयपर पदे नरदेह कलिवर्णन निंदक ब्राह्मण यत्न षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ वैराग्य भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ उपदेशपर पदे - भाग ७ श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे Tags : gathasamarthaगाथासमर्थ भाग ७ Translation - भाषांतर १४९१( राग-तिलककामोद; ताल-धुमाळी )आळस रे आळस रे । साधनांचा कीळस रे ॥ध्रु०॥माय आळस बाप आळस । आळसें कीळस वाढविला ॥१॥दीसां आळस रातीं आळस । आळसें आळस दुणावला ॥२॥रामदासीं आळस आला । वियोग गेला हारपोनी ॥३॥१४९२( रागा-कल्याण; ताला-धुमाळी )चित्त दुश्चित कामा नये । होतो अपाये । मोडतो सर्व उपाये । जीव वायां जाये ॥ध्रु०॥विद्याविहीण प्राणी हीण । होतसे सीण । जातसे संसार कठीण । पुढें मरण ॥१॥यत्न करावा बहुसाल । विचारें बोल । वैराग्यें होत आहे तोल । विवेक खोल ॥२॥तपें करावीं पुरश्चरणें । घरावीं वनें । उदंड करावीं जीवनें । इंद्र्भुवन ॥३॥अखंड करावें चिंतन । अंतरीं ध्यान । मनेंचि होतसे तल्लीन । मग समाधान ॥४॥रामदासाची संपत्ती । तो सीतापती । भक्तां देतो सायुज्यमुक्ती । हे प्रचिती ॥५॥१४९३( राग-सारंग; चाल-पाळण्याची )घडि घडि जातसे संसार । होतसे सवेंचि स्वार ॥ध्रु०॥दिवस उगवे आणि मावळे । ऊष्ण पुढें अंधाकार ॥१॥बाजार येतो सवेंचि जातो । येत जातो वारंवार ॥२॥दास म्हणे जन होतसे उणें । प्रचित ये पारंपार ॥३॥१४९४( चाल-धर्म जागो० )आपुलें हित बगा । नाहीं तरी पावाल दगा । आधीं च करणें लगा । तेणें सर्वत्न जगा ॥ध्रु०॥सावध होईं जना । करीं दीर्घ सूचना । सर्वही कळावें मना । तरि चुके यातना ॥१॥आळसें सुखावला । तो तो कष्ट पावला । नाहीं कीं पैसावला । नष्ट लोकीं घावला ॥२॥दुर्जनाचें हासें जालें । अन्न करितां मेले । निपटेंचि वायां गेले । त्याचें कोणें काय केलें ॥३॥धूतपर्ण तूर्त करीं । हित आपुलें विवरीं । दास म्हणे नाहीं परी । तरि तारी उतरी ॥४॥१४९५( राग-काफी; ताल-दादरा )अरे अरे अरे अरे माणुसा । तूं शाहणा कैसा । विचार नेणसी आमासा । बहुविध तमासा ॥ध्रु०॥क्षणयेक येकांतीं बैसावेम । कांहीं तरि पुसावें । उगोंचि कासया रुसावें । सदानंदीं वसावें ॥१॥आले गेले लोक देखिले । सांगती हि गेले । भाग्यचे लोक मले मले । कितियेक बुडाले ॥२॥जाणत जाणत नेणसी । वाऊगाच सिणसी । बुद्धि धरिली ते हिणसी । स्वप्रापरि सर्व संसार । त्याचा व्यर्थ चि खेद ॥४॥१४९६( राग-कल्याण; ताल-त्रिताल )अरे नर सारविचार करीं । मन बरें विवरीं ॥ध्रु०॥सारासार विचार न होतां । वाहासी भवपुरीं ॥१॥सकळ चराचर कोठुनि जालें । कोठें निमालें तरी ॥२॥दास म्हणे जरि समजसि अंतरिं । मुळींची सोय घरीं ॥३॥१४९७ ( राग-भूप; ताल-धुमाळी; चाल-द्दश्य पाह० )प्रपंच दुःखाचा द्रुम । वाढल चुंबित व्योम । तेथें पाहती संभ्रम । सुखाचीं फळें ॥ध्रु०॥सदा फळा आमासे । पाड लागला दिसे । परि तो निष्फळ मासे । पाह्तां देठीं ॥१॥तयावरी दोनी पक्षी । एक उदास उपेक्षी । येर तो सर्वत्न मक्षी । परि न धाये ॥२॥सेवितां तयाची छाया । तापली परम काया । तरी ही बैसती निवाया । आत्मरूप प्राणी ॥३॥रामीं रामदासी लक्ष। तोचि जाला कल्पवृक्ष । सेवी सज्जन दक्ष । स्वलामें पूर्ण ॥४॥१४९८( राग-बिहागल; ताल-धुमाळी; चाल-कोणाचे हत्ती० )माया लाविली दों दिसांची । शाश्वत कैंची । भक्ति अंतरली देवाची । सेवटीं ची ची ॥ध्रु०॥धांवती कैंची कैंची । चिंता संसाराची ॥१॥लाज लौकिकाची । बुद्धि पाहतां कांची ॥२॥दास म्हणे रे साची । भक्ति राघवाची ॥३॥१४९९( राग-कल्याण; ताल-धुमाळी )काळ विक्राळ विक्राळ भक्षी अभक्तासी ॥ देव रक्षितो रक्षितो रक्षितो भक्तासी ॥ दया जाली रे जाली रे विवेकशक्तासी ॥ नाहीं बंधन बंधन ज्ञानें त्या भुक्तासी ॥ध्रु०॥ज्ञान पवाड पवाड गगनाहुनि वाड । भुक्ति जाड रे जाड रे अत्यंतचि जाड । भक्ति गोड रे गोड रे भुक्तिहुनी गोड ॥ पुरे कोड रे कोड रे नाहीं अवघड ॥१॥आगम निगम निगम होतसे सुगम ॥ साधूसंगम संगम दावितो उगम ॥ सर्व भ्रम रे भ्रम रे गेलिया निभ्रम ॥ अवघा संभम संभ्रम कर्म चि निःकर्म ॥२॥दास म्हणे रे म्हणे रे ज्ञानी त शहाणे ॥ लोक वेडे रे वेडे रे वेडे दैन्यवाणे ॥ मले जाणती जाणती विवेकाची खूण ॥ पुढें पाहतां पाहतां निघताती घुणे ॥३॥१५००( राग-गारा; ताल-धुमाळी० )मायाजाळें कोंडितीताळ ॥ रुतलें गाळें बाधे विशाळें ॥ बुद्धि भाळें भरलें ईसाळें ॥ध्रु०॥नाहीं नाहीं कांहींच नाहीं ॥ पाहीं पाहीं विवेक पाहीं ॥ साहीं साहीं सुखदुःख साहीं ॥१॥आशाबद्धी सांडिली शुद्धि ॥ नाहीं बुद्धि दिसे कुबुद्धि ॥ निरावधि नाहीं अवधी ॥२॥पडदा येथें येक जन्माच ॥ मागें पुढें आठऊ कैंचा ॥ जन्म जातो दों दिवसांचा ॥३॥दास म्हणे सावध होणें ॥ कोण्या गुणें येथें भुलणें ॥ येणें जाणें दुःख भोगणें ॥४॥ N/A References : N/A Last Updated : May 20, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP