मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर पदे| षड्रिपु विविधविषयपर पदे नरदेह कलिवर्णन निंदक ब्राह्मण यत्न षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ वैराग्य भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ विविधविषयपर पदे - षड्रिपु श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथासमर्थ षड्रिपु Translation - भाषांतर ११९६.( राग-कौशिया; ताल-धुमाळी )हरि हरि ध्यान रे । वरि वरि ध्यान रे ॥ध्रु०॥सगळा आगळा बगळा मासा गट्ट करि गिळतो कैसा ।हालेना ना चालेना ध्यानी कोण तमासा ॥१॥मांजर उंदीर लक्षी तेव्हां तटस्थ होउनि राहे ।तैसा कपटी लोचन लावुनि विषये वास पाहे ॥२॥रुद्राक्षाच्या माळा सोळा आणि वीस तीस । कांही स्फटिक कांही तुळसी म्हणवी शंकर उदास ॥३॥उगीच अवघी खटपट केली परि हो वेषधारी ।रामदास होसील तरी तो राम रौरव वारी ॥४॥११९७( राग-कमोद; ताल-दादरा )अंतरी अभिमान । कापट्य शब्दज्ञान । जैसे वृंदावन । शोभिवंत रे ॥ध्रु०॥क्रियेवीण वाचाळ । वायांची खळखळ । पोटी तळमळ । स्वार्थबुद्धि रे ॥१॥अंतरी नाही धाले । शब्दज्ञान बोलिले । दिवाळे निघाले । आपें आप ॥२॥दंभ केला लोकाचारी । लोलंगता अंतरी । देवापासी चोरी । कामा नये रे ॥३॥१९९८( राग-धनाश्री; ताल-धुमाळी )प्राणी मीपणे व्यर्थ चि मेला । नेणतां काळ सर्व ही गेला ॥ध्रु०॥दुसर्याला सांगतो आपण चुकतो । बोलतां चालतां राग येतो ।नाना प्रकारी ठेकणे लावितो । विवेकी जनाला कंटाळतो ॥१॥नसतां उत्तम गुण । आणितो थोरपण । तेणे होत असे भंड पुराण ।पाहो जातां तेथे कैचे रे प्रमाण । प्रत्यये पाहतां अप्रमाण ॥२॥आपणा माने तो थोर । कामा नये इतर । पाहो जातां तेथे कैंचा रे विचार ।जन्मादारभ्य नावडे सारासार । सत्य नव्हे कृत्रिम व्यवहार ॥३॥दया रघुनाथाची । चुकवी सकळ ची ची । खोडी काढितो कोण रे अंतरीची ।हरीहर हो कां इंद्रादि विरंची । दास म्हणे नाही मीपणचि ॥४॥१९९९.( राग-काफी; ताल-दादरा )घात करा घात करा घात करा ममतेचा ॥ध्रु०॥ममतागुणे खवळे दुणे । राग-सुणे आवरेना ॥१॥ममता मनी लागतां झणी । संतजनी दुरावली ॥२॥दास म्हणे बुद्धि हरि । ममता करी देशधडी ॥३॥१२००( राग-कामोद; ताल-द्रुत एकताल )एका देखतां एक । मरती सकळ लोक । जाणोनि विवेक । काय जाले रे ॥ध्रु०॥आतांची घडी कळेना । मनाची वृत्ति वळेना । ममता गळेना ।कोण्या गुणे रे ॥१॥जाणता चुकोनि गेला । पोहणार बुडाला । ज्ञानिया दडाला । मायाजाळी रे ॥२॥रामीरामदास म्हणे । अविद्येचे करणे । उमजोनि भुलणे । सर्वकाळ रे ॥३॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP