मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर पदे| भाग ४ विविधविषयपर पदे नरदेह कलिवर्णन निंदक ब्राह्मण यत्न षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ वैराग्य भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ करूणापर पदे - भाग ४ श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे Tags : gathasamarthaगाथासमर्थ भाग ४ Translation - भाषांतर १२७१( राग-ताल व चाल वरील )स्वामी तुझ्या वियोगें । घटका जाताती युगें । धांवें तूं लागवेगें हो रामा ॥ध्रु०॥बहु दीस जाले भेटि । धीर न धरवे पोटीं । चिंता वाटते मोठी रे रामा ॥१॥नको करूं उदासीन । चरणीं लागलें मन । जिणें पराधेन हो रामा ॥२॥धीर न घरे मना । उतावेळ हें जाणा । येईं हो प्राणमोहना हो रामा ॥३॥नेम होता केला । तोहि टळोनी गेला । काय अन्याय म्यां केला हो रामा ॥४॥तप्त जाली काया । तुज रामा भेटावया । येईं रे तूं प्राणसखया रे रामा ॥५॥अंतर जाणावें । दासा सांभाळावें । आतां निष्ठुर न व्हावें हो रामा ॥६॥१२७२( चाल-हे दयाळुवा० )झडकरिं यावें आजि राघवें । आळी घेतली माझिया जीवें ॥ध्रु०॥विषय खंगला रंग मंगला । मानस उतावेळ रामा तुझे भेटीला ॥१॥दीनवत्सला हृदयकोमळा । तुजविणें सकळ कळा तेचि अवकळा ॥२॥चरणपंकजीं वृत्ति गुंतलीं । रामदास म्हणे माझी सांडी कां केली ॥३॥१२७३( राग-सारंग; ताल-धुमाळी )द्याळा राघवा हो ॥ध्रु०॥तनु घननीळ सलिल लोचन । मोचनदेव नमो । कुंडलमंडित दंडितदानव । मानवदेव नमो ॥१॥विधिहर सुंदर बंदिति सुल्लभ । दल्लभदेव नमो । पालय दासिलासविभूषण । भूषणदेव नमो ॥२॥१२७४वियोग नको रे रामा, वियोग० ॥ध्रु०॥मज उपाय तुजविण काय । आहे हें तूं पाहें ॥१॥वाटे उदास खंती जिवास ॥ ये रे भेटि दे रे ॥२॥तुझी वास रामदास ॥ पाहे उभा राहे ॥३॥१२७५( राग-मैरवी; चाल-हे दयाळु० )मांबुजाननं मांबुजाननं मांबुजाननं मांबुदोहि मे ॥ध्रु०॥योगिरंजनं चापभंजनं । जनकजपाते विश्वमोहनं ॥१॥विबुधकारणं शोकहारणं । अरिकुलांतकं भयनिवारणं ॥२॥जयकृपालयं दासपालयं । चरणपंकजे देहि मे लयं ॥३॥१२७६( चाल-नामामध्यें उत्तम० )काय करणें सखया रामराया । मज संसारीं घातलें त्वां कासया । धांवें धांवें संकटें ने विलाय । वाट पाह्तो माझया कुडावया ॥ध्रु०॥निर्गुणस्वरुप पाहतां आकळेना । वृत्ति वैमवीं गुंतली हे वळेना ॥१॥सगुणभाव मोडला ब्रह्मज्ञानें भक्ति । नावडे लटक्या स्वाभिमानें । वेढां लाविलें चेटकी या मायेनें । मायाजाळीं गुंतलों आम्ही दीनें ॥२॥बोले करुणावचनीं रामदासा । चित्त चंचळ मन जालें उदास । दीनानाथ देखोनि केली आस । रामें बंधन तोडिलें भवपाश ॥३॥१२७७ ( राग-बिहाग; ताल-दादरा; चाल-रामीं रंगलें० )परम कठिण शीण वाटतो रे । रामाकारणें कंठ दाटतो रे ॥ध्रु०॥अंतर गुंतलें काय करणें रे । संसारीं धारिष्ट किती धरणें रे ॥१॥वियोग विषम काळ पातला रे । जीव हा दुःखानळीं घातला रे ॥२॥अंतरीं आणिक कांहीं नावडे रे । रामदासीं रामकथा आवडे रे ॥३॥१२७८( राग-कानडा; ताल-दादारा; चाल-सद्गुरु सेवीं०)तनमनधन रे राघवा । मी शरण अनन्य रे ॥ध्रु०॥निवळ निवळ रे राघवा । तूं निर्मळ निश्चळ रे ॥१॥चंचळ चपळ रे राघवा । दास म्हणे त्यासी तूं अकल रे ॥२॥१२७९( राग-कल्याण; ताल-धुमाळी; चाला-संसारीं संतोष०)प्रारब्ध पडिलें उणें । तें काय करिल शाहणे। लौकिक राखिला नवजाय होय लाजिरखाणें ॥ध्रु०॥काय करावें तें कळेन । केला प्रयत्न फळेना । होणार तेंही पालटेना । कर्मरेखा टळेना ॥१॥अंतरीं विवेक आठवे । परी कांहीं न फांवे । पराधेन नाहीं सुटिका । तेणें शोक दुणावे ॥२॥केलिया नव्हे पाठांतर । पडे सर्व विसर । निरूपण सदा ऐकिजे । परि नाहीं विचार ॥३॥अभ्यास तो सर्व मोडला । प्रबोध बुडाला । मनाऐसें कांहीं न घडे । तेणें संताप आला ॥४॥दास म्हणे रघुनायका । आतां काय करावें । भक्त म्हणें परि नेणता । मज हातीं धरावें ॥५॥१२८०( राग-जयजयवंती; ताल-धुमाळी )काय गा करावें रामा । नुलंघे प्रपंचप्रेमा । सवळ मायेची सीमा । उलंघवी रे स्वामिया ॥ध्रु०॥मायिक शब्दांचे ठसे । देहीं देहबुद्धि वरो । मन हें वासनामिसें । विषयीं गुंतलें आहे ॥१॥वासनेचा थारा मोडे । तरीच स्वहित घडे । परि हें मज न घडे । स्वजनांचिनि संगें ॥२॥रामीरामदास म्हणे । ठकिलें या मीपणें । संगदोषें येणें जाणें । न चुके चि आयागमन ॥३॥ N/A References : N/A Last Updated : May 16, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP