विविधविषयपर पदे - नरदेह

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


११७४
( चाल-धर्म जागो० )
खरे खोटे परिक्षावे । खोटे जाणोनि त्यागावे ।
खरे ते शुद्ध घ्यावे । समाधान पावावे ॥ध्रु०॥
असत्याचा संग खोटा । घात होतसे मोठा ।
म्हणोनि ते त्यजावे । जावे सत्याच्या वाटा ॥१॥
सारासार विचारणा । तेथे धरावी धारणा ।
कार्य ते सांडूनीयां । आधी धुंडावे कारणा ॥२॥
दास म्हणे नरदेह । बहु दुर्लभ आहे ।
लागवेग करुनियां । हित आपुले पाहे ॥३॥

११७५.
( राग-मारु; ताल-धुमाळी )
जाले रे वय जाले रे । बाल तारुण्य वृद्धाप्य गेले रे ॥ध्रु०॥
आपुले आपण देखिले रे । सद्य प्रचीतीस आले रे ॥१॥
पाहो जातां शरीर खंगले रे । वैभव सकळ भंगले रे ॥२॥
दास म्हणे ऐसे काय जाले रे । अकस्मात मरण आले रे ॥३॥

११७६.
( चाल-धर्म जागो० )
आधारे लालुची केली । हानी आयुष्या जाली ।
देहांत समयो येतां  । बुद्धि फिरोनी पडिली ॥ध्रु०॥
इंद्रिये गळाली आतां । सर्व राहिली सत्ता ।
शरीर विसंच जाले । श्रुत नव्हे बोलतां ॥१॥
एक खाती एक पाहती । वैर साधिले दांती ।
तोंडाची खबाडी जाली । नाका हनुवटी लागली ॥२॥
सूत्रे सांधे ढळोनि गेले । केश पांढरे जाले ।
नव्हे नव्हे म्हणोनियां । मान लकलक लागले ॥३॥
वैभव निघोनी गेले । रंकपाद पावले ।
दिवसेंदिवस नव्हे । डोळे सरक्या जाले ॥४॥
ऐसे स्थूळ क्षीण जाल्यां । शक्ति राहिल्या ।
आंगाची काचरी जाली । साजवेना कांही केल्यां ॥५॥
आपण निर्माण केली । तें चि पारखी जाली ।
मळमूत्री आवर नाही । देखुनि थुंको लागली ॥६॥
इतुके दिवस आर्त होते । आतां मरेना कां परते ।
लागलो याच्या आम्हां भोंवते सरते ॥७॥
देवे हा अमर केला । खाइल आम्हां ।
तरी याला मृत्यु नाही । जरी कल्पांत आला ॥८॥
पहिले गांजिले होती । तेंचि उसणे घेती ।
देखोनियां लहान थोर । पोरे मारोनि पळती ॥९॥
ऐसे वाखे पुढिलांसी । देखोनियां रामदासी ।
लालुची मुक्त केली । एकतार रामेसी ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP