मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर पदे| यत्न विविधविषयपर पदे नरदेह कलिवर्णन निंदक ब्राह्मण यत्न षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ वैराग्य भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ विविधविषयपर पदे - यत्न श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथासमर्थ यत्न तो देव जाणावा Translation - भाषांतर ११८५.( राग-सारंग, ताल-दीपचंदी )राम वोळे तयाला । यत्न बहुत जयाला ॥ध्रु०॥खटपट खटपट सांडुनि द्यावी । निश्चळ बुद्धि करावी ॥१॥तीक्षण तर्क धारणा हे । पावतसे वचनाला ॥२॥दास म्हणे जो परउपकारी । मानतसे बहुतांला ॥३॥११८६( राग-मारु; चाल-साजिरे हो० )आळस खोटा रे बापा ॥ध्रु०॥ धृष्ट पुष्ट मोठा धाटा । व्यर्थचि ताठा रे ॥१॥आळस मोठा तोचि करंटा । जाईल कोणे वाटा रे ॥२॥दास म्हणे रे यत्न आउचटा । वैभव लूटा रे ॥३॥११८७( राग-ललित; ताल-धुमाळी )जेणे आळस केला तो आळसे बुडाला । आला अवचिता घाला चर्फडीत निघाला ॥ध्रु०॥अंतर पडिले बहूत पुढे आली प्रचित । तप्त जाले चित्त तेणे अखंड दुश्चित ॥१॥पहिले आपण चुकला आतां म्हणेल कोणाला ।जन फिरोन पडिला ऐसा समयो घडला ॥२॥दास म्हणे या जना नाही दीर्घ सुचना ।बोला कठिण वचना लोक बोलती नाना ॥३॥११८८( राग-कानडा; ताल-त्रिताल )कष्ट करितो जन ते खाती । येर उगे चि पाहाती ॥ध्रु०॥शक्तीचे चारी दिवस जाती । पुढे थोर फजीती ॥१॥आपण केल ते जाले । आळसे जन बुडाले ॥२॥आळसे आळस ये सुस्ती । चढे उगीच मस्ती ॥३॥कळेना ऐकेना येना येना । आणि सिकेना ॥४॥तरतर केली उडोन गेली । अंती होय फजिती ॥५॥दास म्हणे या वाईट खोडी । पापे घडत जाती ॥६॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP