करूणापर पदे - भाग ५

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे


१२८१
( चाल-धन्य हे प्रदक्षिणा० )
कां गे निष्ठुर रघुवीरे वाड वेळ न बोलसी । आतां केव्हां येइल कृपा सांग केव्हां सांभाळिसी ॥ध्रु०॥
तुझे कृपेची पोसणी सुखशब्दाची सुखवासी । जेचि क्षणीं न बोलसी तेव्हांच परदेश आम्हांसी ॥१॥
रामीरामदास म्हणे तुजविण विदेश वाटला । आतां झडकरिं सांभाळीं माझा प्राण हा फुटला ॥२॥

१२८२
( चाल-वरील )
येईं रामराया नेईं भवतम विलया । तुझे चरण ध्यातों शरण तुजचि सखया ॥ध्रु०॥
हरिकथेचे मिसें तुझीं पाउलें पावावीं । पोटींची आरत रामा झडकरिं पुरवावी ॥१॥
तुजवीण बैभव आम्हां काय रे करावें । तूं जरि न येसी तरि म्यां कवणा शरण जावें ॥२॥
चंचळ मानस हरिकथेसी उभा मी राहें । निढळावरि बाहे रामदास वाट पाहे ॥३॥

१२८३
( चाल-धर्म जागो० )
राजीवनयना रामा योगीजनमन विश्रामा । साधुजनपूर्णकामा चाल दयाळा रामा ॥ध्रु०॥
धीर उदार सुंदर सगुणा गुणगंभीरा । चाल रे करुणाकरा वाट पाह्तों दातारा ॥१॥
देव सोडविले त्निदश मजलागीं कां उदास । नको कठिण मानस वाट पाहे रामदास ॥१॥

१२८४
( राग खमाज; ताल-धुमाळी; चाल-रे मानवा उगीच० )
रामा निदान पाहसी किती रे । धांव धांव गा सीतापती । तुजवेगळी न घडे गती ।
नाम तारक वेद बोलती रे ॥ध्रु०॥
जळीं पाषाण तारिले वाड । काय त्याहुनी तुज मी जड । माझे जीविंचे पुरवीं कोड ।
मनें घेतला विषयीं मोड रे ॥१॥
तुझे भेटीचें आरत मोठें । तुजवेगळें न गमे कोठें । तुजवांचुनि सर्वहि खोटें ।
तुझें बालक दीन धाकुटें ॥२॥
वृत्ति गुंतली तुजपाशीं । जैशी गुळासि जडली माशी । देहीं असोनि गुप्त कां होसी ।
दास उदास देहभावासी रे ॥३॥

१२८५
( चाल-नामामध्यें उ० )
संसारसासुरां तूं टाकोनि गेलासी । मायबापा कां निष्ठुर जालासी ।
देवराया मागुता कैं येसी । आजि अवस्था लागली रे मानसीं ॥ध्रु०॥
पराधीन न चले कांहीं केलें । देहपांगें मज बहु रे गांजिलें ।
निजधाम शांतीचें क्रोधें नेलें । मायबापा त्वांही कां अव्हेरिलें ॥१॥
सर्व दुर्जन लागला यांचा संग । क्षणक्षणां होतसे मनोभंग ।
घडी एक रंग घडी विकल्पें वोरंग । पुरे संग आतां करावें निःसंग ॥२॥
दास म्हणे रे राघवा निजभावें । संग दुर्जनांचा सांभाळित जावें ।
किती म्हणोनियां धारिष्ट धरावें । मायबापा सर्वथा नुपेक्षावें ॥३॥

१२८६
( राग-गौड, ताल-दादर )
अहो जी मुनिमानसधामा । परम सुखदायका रे । तुजवीण सीण वाटतो रे । जानकीनायका रे ॥ध्रु०॥
मायामोहपुरीं वाहवलों दुरीं । तूं धांव धांव देवराया । कामक्रोधमदमत्सरामगरें । विभांडिली सर्व काया ॥१॥
नको लावूं वेळु तूं दीनदयाळू । तुझी मन वास पाहे । येथून सोडवी ऐसा । मज तुजविण कोण आहे ॥२॥
नको धरूं दुरी नाहीं देहा उरी । किती सत्व पाह्सी रे । रामदास म्हणे झडकरी धांवणें । राहें मज मानसीं रे ॥३॥

१२८७
( राग-कल्याण; ताल-धुमाळी )
ये रे यादवा ये रे माधवा । ह्रदयनिवासा देवा रे ॥ध्रु०॥
काम विराम अंतरीं राम । सर्वकाळ आठवावा ॥१॥
उमा राह्तो वाट पाहतो । दास पराकृत गातो ॥२॥

१२८८
( राग-मैरव; ताल-धुमाळी )
तरि त्वां अंतर जाणोनि यावें झडकरी । तुझ्या वियोगें न कंठे क्षणभरी रे रामा ।
तुजवांचुन अंतीं कोण आहे । ऐसी अवस्था लागली अभ्यंतरीं रे रामा ॥ध्रु०॥
संसारसासुरां तुवां बोळवीलें येथें बहुत दिवस कां टाकिलें रे रामा ।
रात्रिं दिवस तुझी वाट पाहे मज अत्यंत या संसारें गांजिलें रे रामा ॥१॥
या लौकिकापासुनी मज सोडवावें । जरी तूं न येसी तरि म्यां काय करावे रे रामा ॥
नाहीं कोणीच मज जिवलग येथें कोणाचे आधारें म्यां कंठावें रे रामा ॥२॥
सुलभ सांडुनी धांव घेतली रे । या लौकिकाची लाजा सांडिली रे रामा ।
आलों टाकुनी सर्व अमिमाना तुझ्या पायीं माझी वृत्ति गुंतली रे रामा ॥३॥
एकला एकट जालों रानभरी तुजकारणें उदास सर्वांपरी रे रामा ।
चित्त चंचळ जालें राहवेना भांबावलों हिंडतां वनांतरीं रे रामा ॥४॥
पिसाट रामदास तेणें आस केली ते तों आपणचि होउनी पुरवीली रे रामा ।
दुःख संसारींचें फार जालें तैसी आम्हां संकटीं धांव घालीं रे रामा ॥५॥

१२८९
( राग-खमाज; ताल-दादरा; चाल-धन्य हरीजन० )
राम माझें जीवींचें जीवन । राम माझें मनींचे मोहन । येक वेळ भेटवा वो ।
तनमनधन सर्वही अर्पीन राघव दाखवा हो ॥ध्रु०॥
घाळूनि आसन लावूनि नयन चित्तासी चिंतवेना । मीपणें मी मज पाहतां निज परम गुज तर्कवेना ॥१॥
जवळी आहे संग न साहे । कोणा न चोजवेतो । रामदास म्हणे आत्मनिवेदनें राघवा पाविजेतो ॥२॥

१२९०
( चाल-धर्म जागो० )
श्रीहरि नारायणा । तुज कां नये करुणा । वेळोवेळां जन्मवीसि । आतां सांगावें कोणा ॥ध्रु०॥
कैसा तरि तुझा अंश । तरि कां करिसी उदास । करुणाघन कैसा । किती आतां पहावा वास ॥१॥
बहुतांमुखें ऐकलासी । भक्तवत्सल होसी । तरि कां उदासीन होसी । किती सत्व पाह्सी ॥२॥
पावला दीनानाथ । भक्तां केलें सनाथ । त्नैलोक्य वर्तवितो । धन्य होय सम्रर्थ ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 16, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP