मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर पदे| भाग २ विविधविषयपर पदे नरदेह कलिवर्णन निंदक ब्राह्मण यत्न षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ वैराग्य भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ भक्तिपर पदे - भाग २ श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे Tags : gathasamarthaगाथासमर्थ भाग २ Translation - भाषांतर १३४१( राग-अहेरी; ताल-धुमाळी; चाल-देव पावला रे० )फांवलें रे हरिसुख फांवलें रे ॥ध्रु०॥राया दशरथा नृपासी । माते कौसल्ये जननीसी । नगरवासियां लोकांसी । हरिसुख फावलें रे ॥१॥जें सुख फांवलें त्निंबका । जें सुख फांवलें वाल्मीका । तें रामदास रंका ॥२॥१३४२( राग-असावरी; ताल-धुमाळीं. )रघुनाथ अनाथ सनाथ करितो । मुक्त सदाशिव काशी । दोष विशेष निःशेष नासती । नाम स्वर्गपदवासी ॥ध्रु०॥नर वान्नर जळचर शरणांगत दीन अनाथ । खेचर भूचर जीव निशाचर तारिले भुवननाथें ॥१॥रघुराज विराज विराजित ब्रीद दैत्यकाळमद राहे । वाजत गाजत साजत वांकी काय कोण महिमा हे ॥२॥दास उदास सदा समबुद्धि विषमबुद्धि असेना । राम आराम विराम तेणेंविण वसेना ॥३॥१३४३( राग-मैरवी; ताल-धुमाळी; चाल-कैवारी हनुमान० )राम करी सांभाळ । दिनांचा ॥ध्रु०॥सुरवर मुनिवर योगि विद्याधर । रीस हरी प्रतिपाळ ॥१॥सुरपतिनरपति अवनिसुतापती । रामदासीं दयाळ॥२॥१३४४( चाल-झाली संध्या संदेह माझा० )सगुणीं सगुण गुणीं गुंतलें रे । चित्त हें चंचळ विगुंतलें रे ॥ध्रु०॥भक्तीचें लक्षण भक्त जाणती रे । प्रेमें अंतरीं खूण बाणती रे ॥१॥प्रीतीचें लक्षण नये सांगतां रे । अंतर गुंतलें नये मागतां रे ॥२॥राम हा सगुणीं गुणें आगळा रे । रामदासीं नव्हे जिवावेगळा रे ॥३॥१३४५( चाल-चौचरणी अमंगाप्रमाणें ) भजन दे देवराया । निरसीं सकळ माया । तुजलागीं पावावया । तुझिये द्येची छाया ॥ध्रु०॥रघुनाथा तुजवीण । होतसे सकळ शीण । लौकिक परम हीन । मज नको रे कठीण ॥१॥मज नाहीं रे आधार । तुजवीण निराधार । निववीं माझें अंतर । सांभाळावें निरंतर ॥२॥सत्यवादी रघुराज । माझी नव्हे तुझी लाज । दूरिं धरूं नको मज । रामदास पदरज ॥३॥१३४६( राग-कफी; ताल-दीपचंदी; चाल-कशि रे तुज कृष्णा लाज नसे )करुणाकर अंतर जाणतसे ॥ध्रु०॥न बोलतां जनीं भाविक भजनी । संकट वारितसे ॥१॥भक्तवेळाहतु सगुण अनंत । भाविका रक्षितसे ॥२॥दास जनीं वनिं चिंतित चिंतनीं । अंतरिं जो विलसे ॥३॥१३४७( राग-कल्याण; ताल-धुमाळी ) माझी चिंता मज नाहीं रे ॥ध्रु॥भक्तजनाचा भारचि वाहे । मज हें न कळे काई ॥१॥ पापविनाशन संकटनाशन । पावतसे लवलाहीं ॥२॥ दास म्हणे भवपाशा तुटाया । संशय नलगे कांहीं ॥३॥१३४८( राग-मैरव; ताल-धुमाळी ) रे मानवा उगीच आमुचीं जिणीं । आम्हां ध्यानीं भेटीची शिराणी ॥ध्रु०॥नरापरिस वान्नर भले । जिहीं डोळां राम देखियेले । ज्यासी रघुराज हितगुज बोले । कोण्या भाग्यें भगवंत भेटलें ॥१॥रामीं मिनले ते असो नीच याती । त्यांच्या चरणांची वंदीन माती । नित्य नव्हाळी गाउनि करुं किती । तेणें रघुनाथीं उपजेल प्रीती ॥२॥रामीरामदास म्हणे ऐका करूं । या रे आम्ही तैसाचि भावा धरूं । भक्तिप्रेमाचा दाऊं निर्धारू । तेणें आम्हां भेटेल रघुवीरू ॥३॥१३४९( ताल-दादरा; चाल-हे दयाळुवा ) मम जननी रे मम जनकू रे । मम स्वामी हा रे मत्सखा हा रे ॥ध्रु०॥सुखकारकु रे दुःखहारकु रे । भवतारकु रे उद्धारकु रे ॥१॥करुणाकरु रे गुणसागरु रे । पूर्वापरु रे दासा वरू रे ॥२॥१३५० ( चाल-अर्जुना तूं जाण० )पूर्ण ब्रह्म होय गे । वर्णू मी आतां काय गे ॥ नंदा ज्याचा बाप त्याची । यशोदा ती माय गे ॥ध्रु०॥क्षीरसागरावासी गे । लक्ष्मी त्याची दासी गे ॥ अर्जुनाचे घोडे धुतां । लाज नाही त्यासी गे ॥१॥अनाथाचा नाथ गे । त्याला कैसी जात गे ॥ चोखामेळ्यासंगें जेवी । दहीं दूध भात गे ॥२॥नंदाचा जो नंद गे । सर्व सुखाचा कंद गे ॥ रामदास प्रेमें गाय । नित्य ज्याचा छंद गे ॥३॥ N/A References : N/A Last Updated : May 16, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP