मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर पदे| भाग १ विविधविषयपर पदे नरदेह कलिवर्णन निंदक ब्राह्मण यत्न षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ वैराग्य भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ भक्तिपर पदे - भाग १ श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे Tags : gathasamarthaगाथासमर्थ भाग १ Translation - भाषांतर १३२८( चाल-कैवारी हनुमान० )भावबळें तरले, रे मानव ॥ध्रु०॥सारासारविचार विचारुनि । भव हा निस्तरले रे ॥१॥रामनाम निरंतर वाचे । निजपदिं स्थिरले रे ॥२॥दास म्हणे सुखसागर डोहीं । ऐक्यपणें विरले ॥३॥१३२९( चाल-झाली संध्या संदेह० )भक्तिभावें पावन होति लोक रे । भक्तिभावें पाविजे परलोक रे । भक्तिभावें सांपडे देव एक रे । भक्तिभाव हा सर्वहि विवेक रे ॥धु०॥भक्तीविण आधार कोठें नाहीं रे । भक्ति भावें करावी लवलाहीं रे । नवविधाभजन बरें पाहीं रे । विभक्त नको भक्त होउनि राहीं रे ॥१॥अखंड ध्यानें राहावें समाधानें रे । नाहीं तरी श्रवणें मननें रे । अर्थांतरें मुळींच्या अनुसंधानें रे । अनन्याभावें त्या आत्मनिवेदनें रे ॥२॥सांडा सांडा परता देहभेद रे । देहभेदें होतसे नाना खेद रे । अंतरंगें सांपडे अभेदें रे । मुळीं नाहीं निश्चळीं भेदाभेद रे ॥३॥दास म्हणे भजन एका भावें रे । तनमन भक्तिस लावावें रे । देवाचेनि सकळ पावावें रे । देवीं भक्तीं निश्चळीं लीन व्हावें रे ॥४॥१३३०( चाल-जमका अजब त० )एक विश्वासें वांचोनी । देव पाविजे कैसेनी ॥ध्रु०॥सकळ सांडोनी उदासीन हिंडे देशविदेश । गिरिकपाटें तीर्थयात्ना तुटेना भवपाश ॥१॥वेदशास्त्र पाहिलें रे जाहलि स्फूर्ति अपार । स्फूर्तिरूपें आहे कां तुटेना संसार ॥२॥नाना युक्ति लाघवें रे बोलति देह विदेह । दास म्हणे हें सकळ मायिक फिटेना संदेह ॥३॥१३३१ ( राग-काफी, ताल-दीपचंदी; चाल-आपुला आपण वैरी० )भावचि द्दढ जाला । हरि सन्निध त्याला ॥ध्रु०॥वर्णावर्ण स्त्रीशूद्रादिक । धरितां नामरतीला ॥१॥प्रेममरें हरिकीर्तनिं नाचत । लाजविलें लाजेला ॥२॥रामीं दासपणाचा आठव । सहजीं सहज विराला ॥३॥१३३२ ( चाला-चौचरणी अभंगाप्रमाणें )साजणी सद्भाव आम्हां । पावावयालागीं राम । चढतवाढत प्रेमा । अभेदभक्ति ॥ध्रु०॥श्रीरामी पढियंते पूर्ण । तयांचे सेवावे चरण । रामरूपीं मीपण । अनायासें ॥१॥सत्यबुद्धीचेनि त्यास । न लावूं गुणदोष । लावितां न ये वाचेस । पतन आहे ॥२॥रामीरामदासीं साचे । अंतर सज्जनाचें । नामावळी नित्य वाचे । गात असे ॥३॥१३३३( चाल-चौचरणी अमंगाप्रमाणें )जैसें बेकारपण । जातसे कठिण । तैसा भजनाविण । परमार्थ जाण ॥१॥मोलमजुरी करी । कष्टें पोट भरी । तैसें भजन न करी । तयाचे परी ॥२॥कथानिरूपण । न करी आपण । दास म्हणे प्रमाण । मानितो कोण ॥३॥१३३४( राग-कल्याण; ताल-धुमाळी; चाल-सबसे रामभजन करवेना । एक० )भडस भजनें पुरवावी । ज्ञानें जन्म वोसरेना ॥१॥भजने सारा विवेकें पाहे । ज्ञानें संग हा न साहे ॥२॥देहबुद्धि तों भजन करावें । दास म्हणे विवरावें ॥३॥१३३५( चाल-कैवारी हनुमान० )भक्ति हे देवाची गजढाल ॥धु०॥कितेक लोकांपासुनि जाते । तोलत नाहिं आढाल ॥१॥उगेंचि कांहीं घडत नाहीं । पाहिजे संचित माल ॥२॥अनुमानें काम चि होत नाहीं । होईल निपट हाल ॥३॥तनमन अवघेंचि झिजावें । फुटक वाईट गाल ॥४॥दास म्हणे भडसा चि पुरतां । मग तुम्हीं समजला ॥५॥१३३६( चाल-चौचरणी अभंगाची )भक्तीनें जगजीवन । भक्तांसि देतो ज्ञान । आणिक साधन । नाहीं नाहीं रे ॥ध्रु०॥नलगे दानपुण्य । नातुडे तीर्थाटन । ज्ञान नव्हेंचि भजनाविण रे ॥१॥न होतां विमळ ज्ञान । साधन तें बंधन । नाहीं समाधान ज्ञानेंवीण रे ॥२॥रामीरामदास म्हणे । सज्जन बाणती खूण । येर ते शाहणे बोलोनियां रे ॥३॥१३३७( चाल-धांव रे रामराया ) काशामध्यें कांहीं नाहीं । एक निर्गुण पाहीं । सारासार सेवूनियाम । भक्त होउनी राहीं ॥ध्रु०॥तीथें व्रातें तपें दानें । गोरांजनें धुम्रपानें । स्नान संध्या दर्भासनें । नाना योगसाधने ॥१॥नाना देव उपासाना । नाना देव कामना । आपुलाल्या भावनेच्या । नानापरी कल्पना ॥२॥नाना पंथ नाना मतें । भूमंडळीं असंख्यातें । एकाहूनि एक थोर । दास म्हणे समस्तें ॥३॥१३३८ ( राग-कामोद; ताल-धुमाळी; चाल:-आकाश तुटोनि पडो । नाना )लावूनियां लोचन । कारवें श्रीरामाचें ध्यान । श्रवणमनन । गुण गावें रे ॥ध्रु०॥निर्गुणीं पाहसि काय । सगुणचि उपाय । वेगीं घरीं सोय । राघवाची रे ॥१॥द्दढ धरीं रे मना राघवउपासना । गोवीं हे वासना । रामपायीं रे ॥२॥रामाचें भजनीं मन । हेंचि हें समाधान । असावें अनन्य । दास म्हणे रे ॥३॥१३३९ ( राग, ताल व चाल-वरील )सांडुनि रामाची सोय । बोलतां शीणचि होय । वाउगें आयुष्य । जाय जाय रे ॥ध्रु०॥घडिघडी पळेंपळ । आयुष्य विघडी काळ । वाचा हे बरळ । सावरावी रे ॥१॥काया वाचा आणि मनें । रामचि उपासणें । वाउगीं वचनें वायांवीण रे ॥२॥रामदास म्हणे एका । रामावीण बोलूं नका । आणिक बोलतां शोका । मूळ रे ॥३॥१३४०( चाल-धन्य हे प्रदक्षिणा० )अनादि कुळस्वामिणी गंगाधरमानसभुलवणी वो । मीतूंपण सांडुनी साधू येती लोटांगणीं वो । वंदुनि पायवणी तन्मय होती श्रीचरणी वो । करुणाकल्लोळवणी पाह्तां न पुरे माझी धणी वो ॥धु०॥दिनमणी कुळभूषणी नाम शोभे जगतारणी वो । सघनांबारधारिणी कामादिक रिपुसंहारिणी वो । स्तवितां दशशतफणी जिव्हा चिरल्या तत्क्षणीं वो । भुवनत्नय पाटणी असोनी अलिप्त गुणावगुणी वो ॥१॥जिवींची जीवनकळा सहसा न घरी माइक माळा वो । नादबिंदु कळा त्याहीवरतीं जिची लीळा वो । तारी दीन जनांला शम विषम दुःखानळा वो । हरी निर्भ्रममंडळा दावी निजात्मसुखसोहळा वो ॥२॥योग्यांची माउली ऐक्यपणेंविण वेगळी वो । सर्वरूपीं संचली पाहतां देहबुद्धिवेगळी वो । नवचे हे वर्णिली परादि वाचा पारुषली वो । अभिन्नभाव मली दासें नयनेंविण देखिली वो ॥३॥ N/A References : N/A Last Updated : May 16, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP