मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर पदे| भाग १० विविधविषयपर पदे नरदेह कलिवर्णन निंदक ब्राह्मण यत्न षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ वैराग्य भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ उपदेशपर पदे - भाग १० श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे Tags : gathasamarthaगाथासमर्थ भाग १० Translation - भाषांतर १५२१( राग-काफी; ताल-दीपचंदी )काया काया हें कळाया । काळें काळचि टाळाया । जावें अचंचळाच्या ठायां । रे सुटाया ॥१॥एक एक एक एक । एकीं नाहीं रे अनेक । एकानेक ज्ञाते लोक । धांडोळिती ॥२॥गाया गाया गाया गाया । गाया गाया गगनीं जाया । जाया जाया रे निजाया । निरंजनीं ॥३॥गाण सांगे सांडा कोका । काका काका लोका वोका । अखंड धुंडितां त्या एका । तुटे धोका ॥४॥१५२२ ( चाल-नामामध्यें उ० )डोल डोलों आनंदरूप गावें रे ॥ तोल तोलों तें वाजऊं लागावें रे ॥ बोल बोलों भजन चिमागावें रे ॥ झोल झोलों देवापासी जागावें रे ॥ध्रु०॥नको नको आलस्य खोटा नको रे ॥ लकोअ लको देवासीं मन लको रे ॥ बको बको पवाड जाड बको रे ॥ शको शको संदेह तोडूं शको रे ॥१॥करा करा संसार सार्थक करा रे ॥ घरा घरा विचार कांहींयेक रे ॥ बरा बरा प्रत्ययाचा विवेक रे ॥ तरा तरा उतरावें भजकें रें ॥२॥घाला घाला श्रवणीं मन घाला रे ॥ जाला जाला निश्चयो मोठा जाला रे ॥ चाला चाला भजनपंथें चाला रे ॥ ढाला ढाला कीर्तीच्या मोठया ढाला रे ॥३॥वाचा वाचा महिमा देवाचा रे ॥ काचा काचा नेणता लोक काचा रे ॥ जाचा जाचा यातना दुष्ट जाचा रे ॥ नाचा नाचा आनंदें मग नाचा रे ॥४॥कुटा कुटा अंतरीं कोप फुटा रे ॥ लुटा लुटा साजण वैरी लुटा रे ॥ सुटा सुटा संसारामध्यें सुटा रे ॥ फुटा फुटा सज्जनसंगें फुटा रे ॥५॥साजे साजे भजन बरें साजे रे ॥ माजे माजे तुंबळ रंग माजे रे ॥ गाजे गाजे देवाची कीर्ति गाजे रे ॥ वाजे वाजे दुंदुभीघोष वाजे रे ॥६॥सेवा सेवा आपुलें करा देवा रे ॥ हेवा हेवा उदंड भक्त हेवा रे ॥ ठेवा ठेवा सांपडे निज ठेवा रे ॥ केवा केवा आपुला किती केवा रे ॥७॥१५२३( राग-परज; ताल-दादरा ) शीव उदास त्यास आस कां सुटेना ॥आ०॥स्वामी न घे ज्यास त्यास मन कां विटेना ॥१॥स्वामी व्हावा रे तरी गुण घ्यावा रे । ज्ञान बोल सकळ फोल मोक्ष लुटावा रे ॥२॥रामीरामदास त्यास होतां वनवास । सांडुनी उदास फिरे रामीरामदासा ॥३॥१५२४( चाल-कैवारी हनुमान० ) मिश्रित सारासार । अरे निवडी तोचि चतुर ॥ध्रु०॥ब्रह्म निरंजन अद्वाय सत्य । माया जनपर दैव अनित्य ॥१॥मेळविलें जळ अमृत दोनी । हंस जसा पय घे निवडोनी ॥२॥पारखीविण खरें निवडेना । मूढ कसे जनहित कळेना ॥३॥दास म्हणे निजकौतुक मोठें । अनुभव बोलती शाब्दिका खोटें ॥४॥१५२५( चाल-प्रगट निरंजन प्रगट० )मिरासीचा ठाव मिरासीचा ठाव मिरासीचा ठाव घरा रे । जेथुनि आले तेथेंचि जाउनि मागुती वास करा रे ॥ध्रु०॥अज्ञानदारिद्र निरसलें ज्ञाना लक्षूनी ते कोण पुसे । आपणचि सर्वही अहंकारगोत्नज घातघेणा तेथ नेतसे । एक पद तेथें विपट नाहीं सर्वही सिद्धी विलसे । ऐसी हे मिरासी ठाकियेली थोर मत्त कीं अमिमानपिसें ॥१॥संतसनकादिक नारद तुंबर वृत्ती तेंहीं लक्षिली । नागवे उघडे आपदा भोगुनि जिवेंसी सद्दढ धरिली । वडिलांची जन्ममृत्यूमूमी तेही सर्वकाळ यत्न केली । धिगीधिगी तें जिणें पूर्वजांची वृत्ती असोनि हातींची गेली ॥२॥एकला एकला मी रामदास वृत्तीलागीं होय पिसा । तनु मनु धनु सर्वही अर्पुनि सोडिली जिवित्वआशा । निःकामता कोणी पाठीसी नाडले येकचि थोर कोंवसा । हे वृत्ती रक्षील माझा राम त्याचा मज भरंवसा ॥३॥१५२६( राग-मैरव; ताल-धुमाळी. )रामावांचुनि सुख कांहीं संसारीं नाहीं । गेलें आयुष्य दिशा दाहीं । विचारें पाहीं॥ध्रु०॥मायाजाळप्रवाहीं ॥ नाना उद्वेग देहीं ॥१॥वाटा लाविलें जेहीं । सर्व मायिक ते ही ॥२॥आतां सावध होईं । दास होउनी राहीं ॥३॥१५२७( राग-खमाज; ताल-धुमाळी )वेडिया स्वामीच होउनि राहें । हे उपाधी तुज्न साहे ॥धु०॥अरे तुझाचि तं सकळ । तरी वायांचि कां तळमळ ॥१॥स्वामिसेवकपण हें वाव । अमिमानासी कैंचा ठाव ॥२॥अमंगळें जाणसी साचें । काय भूषण सांगसी त्याचें ॥३॥मीपणाचें मूळ तुटावें । आनंदाचें सुख लुटावें ॥४॥रामदासचि नांव हें फोल । तेथें कायासें लागती बोल ॥५॥१५२८( राग-काफी; ताल-धुमाळी )आलिया अंगेंचि होइजे देव । कोंदाटला ब्रह्मकटाव ॥ध्रु०॥नवसिंधूचें जळ आटलें । संसाराचें मूळ तुटलें ॥१॥निजघनाची लाघली ठेवी । रंक पावलें राजपदवी ॥२॥अरे काळाची वेळ चुकली । आनंदाची लुटी फांवली ॥३॥जे मायेनें जन्म दाविला । ते मायेचा ठाव पुसिला ॥४॥रामदासासी राम भेटला । थोर संदेह हा तूटला ॥५॥१५२९( राग-कल्याण; ताल-धुमाळी. ) माझें तनुमन चालवी । हित बोलवी । कवी शिकविताहे ॥ बंद चिप्रबंद साजिरें । शब्द गोजिरे । वरिच्यावरि पाहे ॥ध्रु०॥बहुत दिवस होतों मुकलों । होतों चुकलों । देव अंतरवासी । बुद्धियोग प्रयोजिला । मग योजिला हरी योगविळासी ॥१॥चंचळ जातें अचंचळीं । शुद्ध निश्चळीं । मग निश्वळ होतें ॥ दास म्हणे भवपाश हि । भ्रमभास हि । शून्य होउनि जातें ॥२॥१५३०( राग-कौशिक किंव कानडा; ताल-धुमाळी. )राजकारणाचीं द्वारें । तीं काय जाणती गव्हारें । समरंगणीं रांडापोरें । काय करिती ॥१॥उड्डाण सिंहाचा चपेटा । काय सोशिल हत्ती मोठा । विवेकानें बारा वाटा । भवसिंधूच्या ॥२॥सुटे वेदांतकडका । सृष्टि संहारे भडका । अनंत ब्रह्मांडें धडका । होती जाती ॥३॥दास बोलतो बोमाटें । विवेक सोडा कडकडाटें । बंड पाषांड फलकटें । उडोनि जाती ॥४॥ N/A References : N/A Last Updated : May 20, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP