मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर पदे| षड्रिपु विविधविषयपर पदे नरदेह कलिवर्णन निंदक ब्राह्मण यत्न षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ वैराग्य भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ विविधविषयपर पदे - षड्रिपु श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथासमर्थ षड्रिपु Translation - भाषांतर १२०१.( राग-जैमिनी कल्याण; ताल-दीपचंदी )गुरुध्यान करावे । तेणेंचि तरावे ॥ध्रु०॥नित्य निर्विकार ज्याचेनि बोधे । व्हावे स्वतःसिद्ध ॥१॥आकार विकार मां त्यासि कोठे । वस्तु घनदाट ॥२॥दृश्यभासातीत आत्मा अविनाश । होती ज्याचे दास ॥३॥१२०२.( राग-काफी; ताल-धुमाळी )देखोदेखी गुरु करिती । शिष्य शिणती । गुरुची परीक्षा नेणती । झकोनि जाती ॥ध्रु०॥भसेसी पडिले बापुडे । कळेना वेडे । फिटेना जन्माचे सांकडे । शिणती मूढे ॥१॥मंत्र देऊनियां गोंविती । देखणी किती ।मुद्रा लाऊनियां बैसती । नाही प्रचीती ॥२॥शाक्तमार्गकवळ घेती । ऐसे हे किती । जळो जळो रे महंती । नाही की गती ॥३॥एक ते सांगती आगम । अघोरकर्म ।परि हे जाणावे कुकर्म । सर्वही ब्रह्म ॥४॥प्रचीती नसतां विपत्ती । सांगणे किती ।रामदास म्हणे शिणती । ज्ञान नेणती ॥५॥१२०३( राग व ताल-वरीलप्रमाणे )एक तो गुरु दुसरा एक सद्गुरु । सद्गुरुकृपेवांचुनि न कळे ज्ञानविचारु ॥ध्रु०॥पारखी नेणती ज्ञानी ओळखती । गुरु केला परि ते नाही आत्मप्रचीति ॥१॥म्हणोनि वेगळा सद्गुरु निराळा । लक्षामध्ये कोणीएक साधु विरळा ॥२॥सद्यःप्रचीति नसतां विपत्ति । रामदास म्हणे कैसी होईल रे गति ॥३॥१२०४( राग-खमाज; ताल-दादरा )सद्गुरु सेवी रे मना । चुकती जन्ममृत्यु संसारयातना ॥ध्रु०॥सज्जनसंगति धरा । धरोनी बरे तत्त्वज्ञान विवरा ॥१॥सद्गुरुवेगळी गती । कदापि नाही भले सज्जन सांगती ॥२॥पिंड ब्रह्मांड रचना । सद्गुरुविण कांही च उमजेना ॥३॥दास म्हणे रे कवी । सज्जनसंग जन्ममृत्यु चुकवी ॥४॥१२०५.( राग-कल्याण; ताल-त्रिताल )सद्गुरु लवकर नेती पार ॥ध्रु०॥ थोर भयंकर दुस्तर जो अति । हा भवसिंधु पार ॥१॥षड्वैर्यादिक क्रूर महा मिन । त्रासक हे अनिवार ॥२॥घाबरला मनि तीव्र मुमुक्षु । प्रार्थिति वारंवार ॥३॥अनन्य शरण दास दयाघन । दीन जनां आधार ॥४॥१२०६आवडतो प्रिय परि गवसेना ॥ध्रु०॥स्वजनाहुनि प्रिय देह आपुला ।तोहि विटे परि आपण विटेना ॥१॥ज्यावरी धांवती इंद्रिय मन ही ।सर्वहि दाउनि आपण दिसेना ॥२॥श्रीगुरुदास्य अनन्य घडे जरि । अनुभवतंतु कधी तुटेना ॥३॥१२०७( राग-मारु; ताल-दादरा )छपन्न कोटि वसुंधरा महिमा कोण जाणे । तीर्थे क्षेत्रे गिरिकपाटे काय आहे उणे ॥१॥वाया शिणतोसी । आहे तुझे तुजचिपाशी ॥२॥नाना कर्मे आचरितां देव कैसेनि भेटे ।दास म्हणे सद्गुरुविण संशय न तुटे ॥३॥१२०८( चाल-श्रीगुरुचे चरणकंज० )तुजविण गुरुराज आज कोण प्रतीपाळी । माय बाप कामा नये कोणी अंतकाळी ॥ध्रु०॥जळाविण तळमळित जसा मीन शुष्क डोही । तुजविण मज वाटे तसे धांव लवलाही ॥१॥चकोरचंद्रन्याय जसा गाय माय बाळा ।पाडसासी हरिणी जसी तेंवि तूं कृपाळा ॥२॥रामदास धरुनि आस पाहे वास दिवसरात ।खास करिल काळ ग्रास ध्यास हा मनासी ॥३॥१२०९अपराधी आहे मोठा । मारणे कृपेचा सोटा ॥ध्रु०॥गुरुराज सुखाचे कंद । नेणुनि केला हा निज छंद ।तेणे पावलो मी बंध । जालो निंद्य सर्वस्वी ॥१॥तारी तारी सद्गुरुराया । वारी माझे तापत्रया ।तुझे पायी काशी गया । आहे मजला सर्वस्वी ॥२॥आतां अंत पहासी काय । तूंचि माझा बाप माय ।रामदास तुझे पाय । वारंवार वंदीतो ॥३॥१२१०( राग-वसंत भैरव; ताल-त्रिताल )गुरुदातारे दातारे । अभिनव कैसे केले ॥ध्रु०॥एकचि वचन न बोलत बोलुनि । मानस विलया नेले ॥१॥भूतसंगकृत नश्वर ओझे । निजबोधे उतरीले ॥२॥दास म्हणे मज मीपणविरहित । निजपदी नांदविले ॥३॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP