नानाविध भक्ति - भाग ३
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे
१४०१
( राग-कानडयाची बहार; ताल-दादरा )
धरीं धीर राहें स्थिर अरे तूं मना । अरे० । क्षणभरि तरी आठवीं रघुनंदना ॥ध्रु०॥
चंचळ चपळ मन हें नाटोपे कोणा । सृष्टिकर्ता ब्रह्मा तोही नाडला जाणा ॥१॥
हाचि समय टळल्यां मग कैंचा श्रीराम । स्मरणीं सावध होईं माझा फिटेल भ्रम ॥२॥
सांवळा सुंदर राम कोदंडधारी । परेहूनि परता रामदासा अंतरीं ॥३॥
१४०२
( राग-देस्कार; ताल-धुमाळी )
आरंभी नाम तुझें, देवाधिदेवा ॥ आरंभी० ॥ध्रु०॥
नाम मंगलदायक । नाम त्रैलोक्यदायक ॥१॥
नामें होते कार्यसिद्धि । नामें तुटे उपाधि व्याधि ॥२॥
रामीरामदास म्हणे । सर्व सिद्धि होय जेणें ॥३॥
१४०३
( राग-वसंत; ताल-धुमाळी )
नाम तुझें कल्याण माझें ॥ध्रु०॥
संकट वारी भय निवारी । सारीं भयें अपहारी ॥१॥
दासा म्हणे परंपार पाववी । उतरवी जीव बद्ध भवार्णवीं ॥२॥
१४०४
( राग-ललित; ताल-धुमाळी )
पतितपावन रे नाम तुझें ॥ध्रु०॥
नाना पंथ नाना मतें । भूमंडळीं असंख्यातें ॥१॥
नाना भाषा देशाचार । वृद्धाचार कुळाचार ॥२॥
रामदास ध्यातो मनीं । नाम सार त्रिमुवनीं ॥३॥
१४०५
( राअग-विमास; ताल-धुमाळी )
गावें रे । नाम गावें रे ॥ध्रु०॥
त्निलोकीं हें पावन आहे । जीविं धरावें भावें ॥१॥
दोषदहन हें गहन पुराणीं । सुचित्त व्हावें घ्यावें ॥२॥
दास म्हणे हें सार फुकाचें । नलगे यावें जावें ॥३॥
१४०६
( राग-प्रमाती; ताल-धुमाळी )
सांधन हें बरवें । सकळ जनीं ॥ध्रु०॥
नामें महादोष जाती । पुढें संतांची संगति ॥१॥
नामें होय चित्तशुद्धि । नामें होय द्दढबुद्धि ॥२॥
रामदास सांगे खूण । नाम सिद्धांचें साधन ॥३॥
१४०७
( राग-परज: ताल-धुमाळी० )
रे राघवा नाम तुझें बरवें ॥ध्रु०॥
ज्ञानें गर्व चढे । अहंभाव वाढे । स्थिति मोडे वैभवें ॥१॥
कर्म आटाआटी । प्रायश्चितांच्या कोटी । संशय घेतला जीवें ॥२॥
दास म्हणे आतां । नाना पंथीं जातां । काय किती पाहावें ॥३॥
१४०८
( राग-मैरव; ताल-धुमाळी )
हरिचें नाम सुखधाम दाखवी । नामरूप आनंदा चाखवी ॥ध्रु०॥
नाम चि ऐसें तें रूप कैसें । ओळखतां मग होइल तैसें ॥१॥
दासा म्हणे जगदीश वोळगा । तेणें करूनि नव्हेल दगा ॥२॥
१४०९
( चाल-साधुसंतां० )
नामामध्यें उत्तम रामनाम । रामनामे तुटतो भवभ्रम । नासे तम सर्वदा सुखसंभ्रम । मोक्षपंथा जावया अनुक्रम ॥ध्रु०॥
विष घेतां शंकरा श्रम जाला । बहुविध उपाय तेणें केला । केला परी सर्वही व्यर्थ गेला । रामनामें प्रचितीनें निवाला ॥१॥
वाल्हा कोळी पातकी भूमंडळीं । अपसव्य नामानें लावी टाळी । तत्काळेंचि पातका जाली होळी । रामकथा विख्यात तिहीं ताळीं ॥२॥
शुकासाठीं कुंटिणी रामवाणी । उदंडचि महिमा तो पुराणीं । रामनाम उत्तम पुण्यखाणी । अंतकाळीं चुकवी ताणाताणी ॥३॥
रामदास सांगतो उदास । रात्नंदिवस धरावा निजध्यास । कोणीएकें करावा हा अभ्यास । फलद्र्प होताहे विश्वास ॥४॥
१४१०
( रागा-असावारी; ताल-धुमाळी )
हरि नाम तुझें अमृतसंजीवनी ॥ध्रु॥
सकळ मंगलनिधि सर्वाहि कार्यसिद्धि । तरणोपाय जनीं ॥१॥
आगमनिगम संतसमागम । वेधले देवमुनी ॥२॥
दास म्हणे करुणाघन पावन । तारक त्रिभुवनीं ॥३॥
१४११
( चाल-कैवारी हनुमान० )
नाम हरीचें गोड । सखया ॥ध्रु०॥
घेउनि रुचि त्या नामरसाची । भवबेडी हे तोड ॥१॥
बैसुनियां गृहीं वेळ नको गमूं । भलती बडबड सोड ॥२॥
रामदास म्हणे आवरुनि मन हें । सद्गुरु चरणां जोड ॥३॥
१४१२
( चाल-वरील )
नामचि कारण रे । महामय नामें निवारण रे ॥ध्रु०॥
नाना संकटीं निर्वाणीं । युद्धकाळसमरंगणीं ॥१॥
दुःख संसारींचें जना । अथवा यमाची यातना ॥२॥
रामीरामदास म्हणे । गर्भवास येणें जाणें ॥३॥
१४१३
( राग-मुलतानी; ताल-दादरा )
परतरपावना हरी । सरी न दिसे दुसरी ॥ध्रु०॥
साधक बोधक योगी मुनिजन । स्मरणें तरले उदंड ॥१॥
नारद तुंबर गाती पूर्वापर । फणिवर विधि हर देव ॥२॥
आगम निगम भजन सुगम । भगत तरले अपार ॥३॥
दास म्हणे मज स्मरणें हें निज । साधन थोर उपाय ॥४॥
१४१४
( चाल-कैवारी हनुमान )
आठवला श्रीराम । ह्रदयीं ॥ध्रु०॥
आठव नाठव शोधुनि पाहतां । मन जालें विश्राम ॥१॥
फळलें भाग्य बहु जन्माचें । नामीं जडला प्रेम ॥२॥
रामाविण अनुन दिसे कांहीं । दासाचा हा नेम ॥३॥
१४१५
( राग-काफी; ताल-दीपचंदी; चाल-आवडतो प्रिय० )
हरि कल्याणकारी । भवमय अपहारी ॥ध्रु०॥
पतितपावन नाम जयाचें । दुःख शोक निवारी ॥१॥
दास म्हणे हरिभजन करावें । सारासार विचारीं ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : May 16, 2011
TOP