Dictionaries | References

डोंगरास दुखणें व शिंपलीत

   
Script: Devanagari
See also:  डोंगरास दुखणें व शिंपीत औषध

डोंगरास दुखणें व शिंपलीत     

जसे दुखणें मोठे तसे औषधहि फार मोठे पाहिजे. फार मोठ्या संकटावर उपाय करण्याचे साधन अगदी किरकोळ
ते कसें चालणार? रोगाप्रमाणें त्‍याचे निवारण करण्याचे साधनहि मोठे व समर्थ पाहिजे. जेथे अतिशय मोठ्‌या वस्‍तूची गरज असेल तेथे अतिशय अल्‍पात काम करूं पाहणें. ‘‘बीदरच्या नुकसानीला निजाम सरकारने पन्नास हजार रुपयांची मदत केली आहे
त्‍यांतून जाळण्यात आलेला बाजार बांधावयाचा आहे व दुकानदारांना आपला धंदा सुरू करण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची देणगी देण्यात आली आहे. हा प्रकार म्‍हणजे ’डोंगराला दुखणें व शिंपलीत औषध’ अशातला आहे.’’ -केसरी ३१-५-४०
२८-३-४१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP