Dictionaries | References

विकणें

   
Script: Devanagari

विकणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.
To pass off at a price, to sell. Pr. पिकेल तसें विकेल. 2 fig. To pass; to be appreciated; to pass as good and worthy of price; to sell. Ex. एथें तुमचें शाहणपण विकणार नाहीं.

विकणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Sell.
v i   Fig. Pass; be appreciated.

विकणें     

स.क्रि.  मोल घेऊन देणें ; विक्रय करणें ; किंमत घेऊन देऊन टाकणें . पिता विकी कन्यासुता । हें अपूर्व काय गा ताता । - कथा १ . ५ . १७१ . - अक्रि . १ कांहीं किंमतीस दिला जाणें ; विनिमय होणें . २ ( ल . ) पटणें ; मान्य होणें ; चांगला व योग्य म्हणून चालणें . एथें तुमचें शाहणपण विकणार नाहीं . [ सं . वि + क्री ; प्रा . विक्कणय ] म्ह० पिकेल तसें विकेल . विकणाऊ - वि . विकावयास ठेवलेला , मांडलेला , पुढें केलेला ; विकाऊ . विकणी - स्त्री . विक्रय ; विक्री . युदु म्हणे तिसां पासौनि विकणी । करितों गुरुथें । - ख्रिपु २ . ४५ . ३३ . विकलेला असणें - १ एखाद्याच्या आधीन असणें ; त्याचा गुलाम असणें . २ ( प्रेम किंवा कृपा यानीं ) खुषीचा गुलाम बनणें , असणें . विकत , विकता - क्रिवि . मोलानें ; विक्रींत ; पैसा देऊन ( क्रि० घेणें ; मिळणें ; देणें . ) [ विकणें ] ( वाप्र ) विकत घेणें - १ खरेदी करणें ; मोलानें घेणें . २ ( ल . ) प्रेमानें किंवा उपकारानें एखाद्यास गुलाम करणें . राम म्हणे साधो त्वां वांचविलें , घेतलें विकत मातें । - मोवन ११ . १३० . २ ( एखादा अनर्थ ) मुद्दाम आपणांवर ओढून आणणें . सावध रे काम घेसी मंदा खळनायका विकत मरण । - मोविराट ४ . ४४ . ( वाप्र . ) विकताआळ - विकत खरूज पहा .
०कज्जा   विकता कज्जा कलागत कुरापत - पुस्त्री . आपल्या हट्टानें , मूर्खपणानें आपणावर ओढून घेतलेलें भांडण , लचांड ; नसता उपदव्याप .
०खरूज   खोकला विकता खोकला - पु . स्वत : च्या पैशानीं , कृतीनीं , ओढून घेतलेला त्रास , लचांड . घोर पाप पीडा फजिती मौत रोग लचांड विघ्न श्राध्द - पुनस्त्री . ( सामान्य अर्थानें ) विकत खोकला ; आपणच स्वतःवर ओढवून घेतलेलें संकट , त्रांस इ० . हें पाहून शेटजी भिऊन जाऊन आपल्या अंगावर घेतलेलें विकत श्राध्द टाकून देतील असें पुष्कळांस वाटलें . - टि ४ . ९० . विकतश्राध्द घेऊन सव्यापसव्य करणें - ( मृताची उत्तरक्रिया , श्राध्द करण्यास वारस नसल्यास कोणी तरी उपद्याप , लचांड लावून घेऊन त्रास भोगीत बसणें .
०तंटा  पु. विकत कज्जा पहा . विकता - १ विकत पहा . २ विकणारा . - पाटण शिलालेख , शके ११२८ . ३ विकाऊ . कीं संभोगसुखाचिये हाटधारणें । विकते देखौनि सुखाचें केणें । - शिशु ४७ . विकताईचा - वि . विकत घेतलेला . गुरें विकताईच्या पेंढयांवर पाळावीं लागतात . - बदलापूर २२ . विकतेकरी - पु . रोजच्या खाण्याचे , खर्चाचे जिन्नस विकत घेणारा मनुष्य ; स्वतः शेतीभाती इ० न करणारा , खाद्यादि पदार्थ उत्पन्न न करणारा केवळ विकत घेऊन निर्वाह करणारा मनुष्य . [ विकणें ] विकाऊ - वि . विक्रीस ठेवलेला ; विकणाऊ पहा . विक्या - वि . विकणारा ; विक्रेता . ( समासांत ) ताक - तूप - दूध - पान - विक्या .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP