Dictionaries | References

माती

   
Script: Devanagari

माती     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  पृथ्वीच्या पृश्ठभागाचेर वा चड करून हेर भागांनी लेगीत चड करून सगल्या सुवातांनी मेळटा असो पदार्थ   Ex. हांगाची माती खूब पिकाळ
HOLO STUFF OBJECT:
विटो मडकी दुदकें नळो बुडकुलो चकेडी फातुल्ली पार्थीव हंडी बुयांव भट्टुली खापर कोळसुली भुडकुली
HYPONYMY:
रेबो रेंव खडू शेड मुल्तानी चिकण माती चीनी माती काव जमीन कोफी गोपीचंदन खारी माती चिकणमाती गाळ लोटासज्जी दोमट माती
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmমাটি
benমাটি.মৃত্তিকা
gujમાટી
hinमिट्टी
kanಹೊಲ
kasمیٚژ
malമണ്ണു
marमाती
mniꯂꯩꯕꯥꯛ
nepजमिन
oriମାଟି
panਮਿੱਟੀ
sanमृदा
tamமண்
telమట్టి
urdمٹی , خاک , دھول , زمین

माती     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

माती     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The earth. Utter destruction.
मातीच्या मोलानें विकणें-देणें   Sell dirt-cheap.
माती देणें   Inter (a corpse).

माती     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  दगडावाचून पृथ्वीचा सर्वात वरचा भाग   Ex. शेताच्या जमीनीला सुपीक बनवण्यासाठी मातीत खत घालणे आवश्यक आहे
HOLO STUFF OBJECT:
वीट हंडी कौल मडके पणती मातीचे वाडगे पार्थिव कुल्हडा माठ खापर चपटी कोठार घडा कुंडी जाळे गेळा घागर घृतपात्र
HYPONYMY:
खारवट गेरू गोपीचंदन चिखल चिकणमाती मुलतानी माती चिनीमाती लाल माती वाळू शाडू गाळाची माती रेताड माती पिवळी माती
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मृत्तिका मृदा
Wordnet:
asmমাটি
benমাটি.মৃত্তিকা
gujમાટી
hinमिट्टी
kanಹೊಲ
kasمیٚژ
kokमाती
malമണ്ണു
mniꯂꯩꯕꯥꯛ
nepजमिन
oriମାଟି
panਮਿੱਟੀ
sanमृदा
tamமண்
telమట్టి
urdمٹی , خاک , دھول , زمین

माती     

 स्त्री. 
पृथ्वी ; दगडावाचून पृथ्वीचा अंश ; मृत्तिका , धूळ .
( ल . ) स्थूल शरीर . कीर्तनासी जाता तुझी जड झाली माती । - तुगा २९८७ .
( ल . ) नाश ; नासाडी ; दुर्दशा . पोरानें संसाराची माती करुन टाकली .
अगदीं काहीं नाहीं याअर्थी . तुला काय कळतें माती ?
निरुपयोगी ; बिनकिमतीचा पदार्थ .
( ल . ) मृत शरीर .
निसर्गानें मेलेल्या जनावराचें मांस ; मढें .
शाडू ( मातीचा गणपति , चित्रें इ० कां करितां ). [ सं . मृत्तिका , मृद = कुस्करणें ; प्रा . मत्ति ( ट्टि ) आ ; हिं . मट्टी - माटी ] म्ह
अति तेथें माती = कोणत्याहि गोष्टीचा अतिरेक झाल्यानें नुकसान होतें
जित्या रोटी आणि मेल्या माती .
दरीची माती दरींत आटते . ( वाप्र . )
०आडकरणें   घालणें ठेवणें टाकणें -
( शब्दशः व ल . ) मातीखालीं ठेवणें ; पुरणें ; आच्छादणें ; झाकणें ( प्रेत , धन , ठेवा ).
विसरुन जाणें ; पुनःपुनः त्याच गोष्टीचा उल्लेख न करणें .
०मातेरा   मातेरा करणें - ( एखाद्या वस्तूची ) नासाडी करणें ; तिचा सुखावहपणा हिरावून घेणें .
०मोत   मोत करणें - ( व . ) प्रेत दहन करणें , मूठमाती देणें ; पुरणें . अन्नात
०अन्नात   - एखाद्याच्या उपजीविकेचें साधन नाहीसें करणें ; पोटावर पाय आणणें .
कालवणें   - एखाद्याच्या उपजीविकेचें साधन नाहीसें करणें ; पोटावर पाय आणणें .
०खाणें   पराभव पावणें .
०च्या   विकणें , देणें - हलक्या दरानें , कमी किंमतीनें विकणें . पैशाची फार जरुरी होती , म्हणून मला आपलें सामान मातीच्या मोलानें विकावें लागलें .
मोलानें   विकणें , देणें - हलक्या दरानें , कमी किंमतीनें विकणें . पैशाची फार जरुरी होती , म्हणून मला आपलें सामान मातीच्या मोलानें विकावें लागलें .
०जड   - मरणोन्मुख मनुष्याचें शरीर जड होणें .
होणें   - मरणोन्मुख मनुष्याचें शरीर जड होणें .
०टाकणें   घालणें लोटणें - बुझविणें ; ( कलह , अपराध इ० कांवर ) पांघरुण घालणें ; विसरण्याचा प्रयत्न करणें . ह्या वादावर आतां माती लोटली पाहिजे . मातीला देणें जाणें येणें - ( कर . ) प्रेत पुरणें ; मढें पुरणें ; प्रेतयात्रेला जाणें . मातीला गेलों होतों - काल माती दिली - मातीला चला . तोंडांत
०तोंडांत   - प्राप्ती बुडणें . मातींत , मातींत मिसळणें - प्रेत पुरणें ; और्ध्वदेहिक , उत्तरक्रिया करणें .
पडणें   - प्राप्ती बुडणें . मातींत , मातींत मिसळणें - प्रेत पुरणें ; और्ध्वदेहिक , उत्तरक्रिया करणें .
०होणें   
नाश होणें . जें अनया कारण , त्याची पळांत हो माती । - मोआदि ३३ ६० .
खराबी होणें . यालागी श्रवणाची होय माती । परमार्थप्राप्ति त्यां कैची । - भाराबाल ११ . १३० .
बेकार होणें . सामाशब्द -( माती शब्द समासांत पूर्वपदीं आला असतां त्याचें मात असें रुप होतें )
०कट वि.  माती असलेला ( पदार्थ )
०कण  न. माती मिसळल्यामुळें नासलेलें धान्य . [ माती + कण ] मात्कर पु . ( व . ) मातीच्या भिंती घालणारा ; मातकाम करणारा . मातकरी पु . ( राजा . ) शेतजमीन भाजण्यासाठीं पसरलेल्या राबावर माती घालण्याकरितां लावलेला मजूर ; परैगडी . [ माती + करी ]
०कापड  न. 
( अग्निपुटें देण्याकरितां कुपीस्थ रसायनें इ० ची ) ज्यांत भट्टी लावावयाची त्या भांड्यास मातीचा लेप दिलेल्या कापडाच्या पट्टीनें लेपटणें .
असला लपेटा ; आवरण . [ माती + कापड ]
०काम  न. मातीचें काम ; मडकीं घडणें , विटा घालणें , चित्रें करणें चिखलानें भिंत रचणें इ० काम .
०खण   खाण - स्त्री .
मातीची खाण .
भाजावळीकरितां दाढीवर पसरण्यासाठीं दाढीच्या नजीकच्या जमीनींतील जी माती खणतात ती जागा .
०गाळणें  न. चाळणीवजा चिकणमाती गाळण्याचें मडकें मातट , , , मातमळ वि . माती मिसळल्यामुळें खराब झालेला ( गूळ , धान्य इ० पदार्थ ); मातीमिश्रित .
०सामान  न. मातीचीं चित्रें , भांडीं इ० जिनसा . मातियेडें न . मातकाम करणारा . - शर . [ प्रा . ] मातिरा पु . मातेरें ; नाश . चरमतनू परमलाभ , न करि मातिरा । - भज ५७ . मातीचा मैराळ वि . जंगी व स्थूल ; गलेलठ्ठ ( मनुष्य ). मातीचें अत्तर न . उत्तम मातीपासून तयार केलेलें अत्तर . मातीचे कुल्ले पुअव . खरें प्रेम नसतां प्रेमाचा आणलेला नुसता आविर्भाव ; दृड बंधन , एकोपा नसल्यामुळें संकटाच्या वेळीं उपयोगी न पडणारें नातेवाईक , संबंधीं ; बळें लावलेलें नातें किंवा संबंध ; उसनें प्रेम , अवसान . म्ह० मातीचे कुल्ले लावल्यानें लागत नाहींत . मातीचें तेल न . खडकतेल ; घासलेट . मातीमीठ न . खारट मातीपासून तयार केलेलें मीठ . माती वडार पु . वडारांतील एक पोट जात .

माती     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
माती  f. f. in वा॑न् माती, [TS.] (मात्या॑, [VS.] ; [MaitrS.] ; cf.[Pāṇ. 4-1, 85] , Vārtt. 1, [Pat.] )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP