Dictionaries | References

खालें

   
Script: Devanagari
See also:  खालीं

खालें     

शअक्रिवि . खालती ; अधोभागीं ; तळाशीं ; बुडाशीं . ' ते माडीवर राहतात आम्हीं खालीं राहतों .' २ ( ल .) खालच्या कर्जात पदवींत , ताबेदारींत , हुकमतींत .' सर्व भाषा संस्कृत भाषेच्या खालीं .' ३ आटोक्यांत ; टप्प्यांत ; पोहोंचेंत . ' सुरतेखाली अठ्ठावीस गांव आहेत .' ( समासांत ) कामा - खेळा - कष्टा - मेहनती - मस्करी खालीं = काम इ० कईत असतां . ' कामा खाली दिसत जातो .' विचाराखालीं - अभ्यासाखाली - प्रघाताखाली नित्याखालीं पडणें = विचाराखालीं येणें . ४ कांहीं एका प्रतिष्ठित किंवा अप्रतिष्ठित नांवाखाली . ( क्रि० विकणें ; मोडणें ). ' श्रावर्धनी सुपारीचे खालीं मुरुडची सुपारी विकते .' ( सं . खात - खाल - खालीं . सप्तमी सं . भूतकालवाचक ?)
शाक्रिवि . खाली . ' उतरे स्वरथाखालें करुन असें तुमल युद्ध राया तें । ' - मोकर्ण ४८ . ५५ . ( खाली )
०पडणें   संयव लागणें ; वहिवाटींत . राबत्यांत पडणें . २ रद्द होणें ; निरुपयोगी होणे . ३ शांत होणेम . ' कर्ज फेडल्याशिवाज माझा जीव खाली पडणार नाही .'
०येणें   कमी होणें .' ' चांदीचा भाव खाली आला .' - के १० . ६ . ३० .
०राहणें   बाकी , शिल्लक राहणें . ' वीस आंबे होते पैकीं पांच खाल्ले , खालीं राहिले पंधरा .' वर होणे - अतिशय काळजी लागणे . म्ह० खाली मुंडी पाताळ धुंडी = गोगलगाय पोटांत पाय या अर्थी . ( वाप्र .) एकाखालीं एक - एक खालती दुसरें ; खालोखाल . एक बरोबर दुसरें ( चांगल्या बरोबर वाईट या अर्थी ). ' ही दहा ठाणें एकाखालींएक सगळीं देऊन टाकिली .' नांवाखालीं - नांवाच्या जोरावर . ' मोठ्या नांवाखाली सरे पचुन जाते . ' हाताखाली - १ कबज्यांत ( घेणें अन्यायानें ). त्यानें पुतण्याचें पैसे हाताखाली घातलें .' ९ हुकमातींत असणे . ; त्याच्या हाताखाली दहाशिपाई आहेत .' घाराखालीं - घरालगत जवळ पलीकडे .' आमच्या घराखाली वाग आहे ' ( जीव )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP