|
वि. ओला पहा . स्त्री. ( वस्त्राचा ) कांठ ; शेवट ; पदर . ' वालिपेचिआं ओली । ' - शिशु १७५ . ( जु . का . ओळि = रेघ , रांग ; दे . ओली = ओळ ; सं . आलि , आवलि ) ०आग स्त्री. पुष्कळ पाऊस पडल्यानें आलेली आपत्ति ; ओला दुकाळ . म्ह० कोरडी आग पुरवेल , ओली आग पुरवणार नाही . ०कांडी स्त्री. हिरवें पीक , शेत , गवत ; धान्याची हिरवीं रोपें . ०कूस स्त्री हिरवें पीक , नंतरचा स्त्रियेचा गर्भाशय ( अशा वेळीं पुन्हां लवकर गर्भ राहण्याचा संभव असतो ). ०कोरडी स्त्री. अल्पस्वल्प , जोडेंभरणें अन्न . ' प्रामाणिकपणाचे मिळविलेल्या ओल्याकोरड्या भाकरीला जी रुचि असते ती दुसर्याचें मिधें होऊन मिळविलेल्या पक्कान्नाला नसते .' निबंधेचंद्रिका . भाकर स्त्री. अल्पस्वल्प , जोडेंभरणें अन्न . ' प्रामाणिकपणाचे मिळविलेल्या ओल्याकोरड्या भाकरीला जी रुचि असते ती दुसर्याचें मिधें होऊन मिळविलेल्या पक्कान्नाला नसते .' निबंधेचंद्रिका . ०खरुज पू - स्त्री . १ वाहणारी खरूज . २ ( ल .) सतत त्रास देणारा इसब , व्याध्रि , जंजाळ . ०भांग स्त्री. ही कोरडीपेक्षां जास्त अमली असते ह्मावरून ( ल .) स्वच्छंदी , तामसी मनुष्य . ०भिक्षा स्त्री. शिजविलेल्या अन्नाची भिक्षा ; मधुकरी ; याच्या उलट कोरडी भिक्षा म्हणजे धान्य दाणे वगैरे . ०ममता स्त्री खुरेंखुरे , सात्विक प्रेम ; ज्यापासून कांही लाभ होतो अशी प्रीति . ०सवाशीण स्त्री. न्हाती - धुती सवाशीण ( कोरी म्हणजे नहाण न आलेली ). - मसाप १ . १ . १ .
|