Dictionaries | References

ओली सुकी करणें

   
Script: Devanagari

ओली सुकी करणें     

अ.क्रि.  चीतपट ; खेळावयास सुरुवात करतांना प्रथम कोणीं खेळावयाचें हें ठरविणें . एक खापरी घेऊन तीवर एका बाजूस थुंकी लवून ती वर फेकावयाची असतें , व ' ओली कीं सुकी बाजू ' असें एका पक्षानें मागावयाचें असतें . त्याच्या मागणीप्रमाणें बाजू वर पडल्यास त्याचा डाव ठरतो . ' उन्हाळी पावसाळी ' असेंहि म्हणतात . ' ओली सुकी करुन डाव कोनी ध्यावा तें ठरवावें ' - व्याज्ञा १ . १३६ . ( ओला + सुका )

ओली सुकी करणें     

चितपट करणें
लहान मुले खेळावयास आरंभ करतांना पहिला डाव कोणाचा हे ठरविण्याकरितां एक चपटा दगड अथवा खापरी घेऊन तीवर एका बाजूस थूंकी लावून ती वर फेकतात व एक बाजू ओली व एक बाजू सुकी मागून घेऊन जी बाजू वर पडेल त्या बाजूचा डाव पहिला असे ठरवितात. त्यावरून खेळाची पहिली पाळी ठरवणें
उन्हाळी पावसाळी पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP