|
न. आलें ; ओली सुंठ ; अलें हें पाचक , सारक , अग्निदीपक , रुचिप्रद व कंठास हितकर आहे . सूज , कफ , वायु , कंठरोग , खोकला , दमा , मलबध्दता , वांति , शूळ यांचा नाश करतें . अलें हिंदुस्थानांत सर्व प्रदेशांत होतें . याच्या झाडाच्या मुळ्यांस शेंगाप्रमाणें अल्याचीं कुडीं येतात . अल्याचा चटका - पु . अलें धुवून बारीक किसून तुपांत परतून त्यांत सैंधव , मिरीं किंवा मिरची , जिरें , शहाजिरें यांची पूड घालून हरबर्याचें पीठ लावून तूप - हिंगाची फोडणी देतात . ०पाक पु. अल्याचा तयार केलेला एक औषधी पाक . हा श्वास , कास , अग्निमांद्य , अरुचि , यावर प्रशस्त आहे . [ सं . आर्द्रक ; प्रा . अल्लय ; अद्दय ; द्रा . अल्ल ; हिं . अदरख - क ; बं . आदा ; गुज . आदुं ]
|