|
न. ( गो .) शिकार स्त्री. गाय . म्हैस वगैरे पशुंची दुधाची ओटी . ' सुरभीच्या कासेंसीं सुज्ञें होऊनि वत्स लागावें । ' - मो . पु. खोकला . ( सं . कास ) स्त्री. १ धोतर , लुगडें यांचा कांसोटा , लंगोटी ; काचा ; ( क्रि०घालणें ; खोचणें ; फेडणें ). तैसीच ते कास गुरुराज याची । ; - दावि ४२० ' तुळशीहार गळां । कांसे पितांबर । ' - तुगा २ . ' बलवंतासि बांधणें कांस । मग अनर्थासी काय उणें । ' पांप्र ३९ . ३४ . २ ( ल .) आश्रय , आधार . ' कामक्रोधालोभांची कास । न सोडीच पाळीली भाष । ' - ज्ञा १६ . ४४८ . ( सं . कच्छ ) न. १ ( कों .) कुरळ ( गवताचें ) . ( सं . काश = गवत ) स्त्री. हलकी किंवा भारी जमीन . ही बागाईंत किंवा जिराईत करण्यासाठीं रयतेस दिलेली असते . या जमिनीचे लहान लहान भाग पाडून ते लागवडीस आणतात , तथापि सरकारसारा मात्र त्या भागांवर किंवा त्यांत उप्तन्न होणार्या सरसनिरस पिकांवर न बसवितां संबंध जमिनीवर बसविलेला असतो . केव्हा केव्हां निव्वळ बागाईत किंवा जिराईत जमिनीलाहि कास म्हणतात . ' कासबंदी व कासजमीन पहा . २ ( कों .) खाचराचा एक लहान भाग . खत वगैरे सांठविण्यासाठी राखलेला खाचराचाच भाग . ३ ( माण .) दुसरीकडे पुरवणीसाठी किंवा भरीसाठीं बक्षीस दिलेली जमीन . - पु . १ ( कु .) डोंगरावरील वसकस भागांत मशागत केलेली म्हणजे धान्य पेरण्यास योग्य केलेली जमीन . २ ( कु .) रेताड जमिनीचें मोठें खाचर . ( सं . कृष् = कसणें ) विक्रिवि . १ ( शिंपी ) सरळ . २ सरळ कापलेलें काप्ड ; याच्या उलत इराब , इरेफ = तिरकस . स्त्री. वर्ग , प्रत ; वळ . ' लोहार , सुतार , महार व मांग यांस पहिली किंवा थोरली कास असें नांव आहे .' - ज्ञाको अ ५२७ . ( सं . कक्षा ) ०कसणे घालणें बांधणें - १ कसोटा घालणें . ' हा सीते ! जरि नत मी कशितोंचि तथापि कास हां - सीते ' २ ( ल .) काम करण्याला तयार असणें ; कंबर बांधुन काम करण्यास तया असणें , संकल्प करणें . ' आणि होय येवढी कास । कासिली जेणें । ' - अमृ७ . १२९ . ' तो पवन म्हणे हूं घाल खलांतिका शिशो कास । ' - मोभीष्म ५ . ३६ . - कासेस लागणें , कास धरणें - एखाद्या बलिष्ठ माणसाच्या आश्रयार्थ जाणें . ' तरी आम्हीं तुझी धरियेली कास । - तुगा १६०७ ' भगवंतांची कास धरावी आणिक आस कशास रे । ' - सेस लावणें - आश्रय देणें ; आधार देणें . ' आमचें चाळकपण कृष्णासि आलें । कांसें लाविलें जनार्दनीं ' - एरुस्व १६ . १६५ . ०घालणें गाय , म्हैस वगैरे ओटी घालावयाल लागणेम ; गाभण असतां जसजसें दिवस भरत येतात व ती विण्याची वेळ जवळ येतें तसतशी तिची ओटी मोठी होत असते त्याला कास घालणें म्हणतात .
|