|
पु. १ शरीरांतील त्रिदोषांपैकी एक . कफामुळें तोंड गुळमट चिकट होणें , तोंडाला पाणी खुटणें , झोंप फार येणें , घशांत घुरघुरणें , तिखट पदार्थ खाण्याची इच्छा होणें , उष्ण उपचारांची इच्छा होणें , अग्निमांद्य , मलमुत्रांचें आधिक्य वगैरे लक्षणें होतात . २ खाकलें असतां घशांतून बाहेर येणारा पातळ बुळबुळीत पदार्थ ; श्लेष्मा ; खाकरा ; बेडका . ३ फेंस ; फेन . ( सं . कफ . तुल०फा . कफ् = फेस , थुंका ) पु. सुरमाडाचा कापूस ; भूस ; रुई वगैरेच्या फळांतील म्हातारी , इ० कप पहा . ' लोह कफ गारा अग्निचिया काजें । येर्हवीं तें ओझें कोण वाहे । ' - तुगा २१७४ . ( सं . कार्पास ) पु. ( कों .) कप्पीचें घर , सांचा ( कप्पीसह किंवा कप्पीशिवाय ) ०घ्न नाशक निःसारक भेदक सारक हर हारक कफारी - वि . कफ नाहींसा करणारें ( औषध वगैरे ). ०ज्वर पु. कफ जास्त झाल्यानें किंवा शरीरस्थ कफंत दोष उप्तन्न झाल्यामुळें येणारा ताप ; कफप्रधान ज्वर . ( सं .) ०पित्त पु. कफ आणि पित्त यांचें आधिक्य होऊन येणारा ज्वर . ( सं .) ज्वर पु. कफ आणि पित्त यांचें आधिक्य होऊन येणारा ज्वर . ( सं .) ०प्रकृति स्त्री. कफ किंवा कफजन्य दोष जींत अधिक आहेत अशी प्रकृतिं . ( सं .) ०रक्त पु. कफाबरोबर रक्त पडणें ; एक रोग .' आम्लपित्त , रक्तपित्त । वातरक्त , कफरक्त । खोकलें खरूज अत्यंत । विसर्प एकां । ' - गीता १३ . २४९७ . ( सं .) ०वात ज्वर - पु . कफ , वात व पित्त हे तीन वाढल्यामुळें येणारा ताप , त्रिदोषजन्यताप . ( सं .) पित्त ज्वर - पु . कफ , वात व पित्त हे तीन वाढल्यामुळें येणारा ताप , त्रिदोषजन्यताप . ( सं .)
|