|
न. अमंगलपणा ; अनिष्ट ; दुर्भाग्यता ; दुर्दैव ; अकल्याण म्ह० अशुभस्य कालहरणं । शुभस्य शीघ्रम . अनिष्ट कार्य ; अमंगल कार्य . पातक . आमुच्या अशुभाशयाचा घातु । करिता चरणधूमकेतु । - एभा ६ . १११ . [ सं . ] - वि . अमंगल ; अभद्र ; अनिष्ट ; प्रतिकूळ ( देखावा , सूचना , मतलब , अर्थ , योग , क्रिया , शब्द , खुणा , चिन्हें , लक्षणें वगैरे ). ०कर्म न. अमंगल किंवा तिरस्करणीय विधि . ०आचार पु. ज्यांत उत्सव - सुखसोहळा नाहीं अशा तर्हेचें कार्य किंवा समारंभ ; विशेषत : औध्वदैहिक क्रिया - उत्तर क्रिया . पापाचरण ; अनाचार ; दुष्कर्म . [ सं . ] ०चिन्ह ०लक्षण न. अमंगल , अनिष्ट , चिन्ह - लक्षण , छाया , व्यंजन ; दुश्चिन्ह ; अनिष्ट सूचक गोष्ट . अशुभचिन्हें अत्यंत । लंकेमाजि होति बहुत । घोड्याचीं कांहीं अशुभलक्षणें - अंसुढाळ किंवा अंसुपात , शृंगी , अंजनी ( चांदणी ). द्वयखुरी , कुखावर्त , एकांगुळ , त्रिकर्णी , थनी , हीनदंती , अंडावर्त , अधिकदंत , काळवदन , विक्राळ , पंचनखी , कराळ , अहीमुख , तुटपट्टा , वाणिया , वाशिंग , आसनखऊ , सर्पिण , कृष्णांजनी , खानखऊ , गोमीपांच , हरिणांग , पितअंजनी , काखावर्त , सारभूकण ( सारभाजन ), एकांडी , काळांजनी , अंगावर्त , दाढशृंखळ , पुसावर्त , श्वेतांजनी , लेंडावर्त , शून्यमस्तक , ह्रदावर्त , नासावर्त , पोटावर्त , तळावर्त , शिळावर्त , नेत्रावर्त , भाळलोचन , व्याघ्रकांत , कृष्णटाळू , कपिमुख , जानूवर्त , आर्जळ , कर्णमूळ , शिंपला , पंचनखी , मेंढसुख , खरमुख , रावामुख , कौस्तुकी , हयभंग , केरसुण्या , मध्यदंती , खुंटीउपाड , अश्रुपात , सेनाभंजन , ढाशी , पोटसूळ , खळतो , रातांधळ , लीदखातो , माथेशूळ , पडमुत , रक्तमुततो , पाण्यांत बसतो , चर्हाटें खातो , डसतो , बुजतो . याशिवाय इतर खोडी - उतरड , चिमटा , डंकी , बोंबल्या , एका अंगावर झुलणें , बसला असतां उठतांना गुडघे टेकून उठणें , मगरुरी करणें , फार हिंसणें , भित्रे पणा , उड्या मारणारा , पळण्याची खोड , लाथ मारणें व भांडखोर , पुढें आलेल्या जिनसावरुन उडून जाणें , चावणें , दोन पायावर उभें राहणें , नालबंदी करुं न देणें , पंचवाख , बांधरीनाख ( हरिनाख ), उपानयन , जीनपाठक , तंगावर्त , मांडवर्त , चित्री , शाखी , दोसीना , रुईकांती , जंबावर्त , पंचपर्व गुदक , पापवर्ण . घोड्याचे कांही अशुभ भोंवरे - असलि , यकूब , सार्फान , सिपलक , सिंगन , कनहसलि , च्छपरखट ( जनाजा ). इतलसार , डंखउजाड , संगिनमान , कुलुंज , सफादारा , गातदार , मुरापा , चवडाशुंभ , मुतलककूलफेदान , मुत्लकूललर्जेन , मुलकूलयेसार , मुलकूलयोजान , मुलारत , चारगुल , खालदार , चवदस्त , सिकल , गोवस्तान , कच्छि , तबरंगु , तस्मागर्दन , औसिकम , मर्दजान , मोथेवाला , चपरहडी , पोतेअलग , पोपेला , पेरसोन , अक्रबपेसानी , माहिरु , ढपल , सिलारपेसानी , सिकाल , खुंटेउखाड , चांदसुरज , गजदंत , चक्रावळ , उंटाच्या दांतासारखे दांत असणारा , उंच कपाळाचा , चालतांना बाहेर जीभ काढणारा , पाणी पितानां पाण्यांत फार तोंड बुडविणारा , दाणा खाऊन शिल्लक कांहीं न ठेवणारा , अंडावर गाईसारखें थान , सड व त्यावर केंस असणारा , एकांड्या , अंडांत कोय नसणारा , काळ्या जिभेचा , एका अंगास झुलणारा , छातीवर भोंवरा ( वेड फोड ) असलेला , कुसगोम , किरकावदाल , अदमचसव , खांडकुहा , ह्रदावळ , विषानैनी , पितानी वगैरे . - अश्वूप ९३ - १०६ . या शब्दांच्या अर्थासाठीं ते ते शब्द पाहणें . ०वर्तमान न. वाईट बातमी ; अमंगल , अनिष्ट बातमी . ( बिशपसाहेबांच्या ) अशुभवर्तमानानें फसून जाण्यइतकें मूर्ख आतां आम्ही राहिलों नाही . - टिले २ . ५६२ . [ सं . ]
|