Dictionaries | References

अढी

   
Script: Devanagari

अढी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

अढी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A layer of fruits on a bed of straw. A prejudice. A twist or turn as of a rope.
अढी बाळगणें-धरणें   To bear a grudge against one.

अढी

 ना.  गुंता , तिढा , दोरीचा वेढा , विळखा ;
 ना.  दुमड , मुरड ;
 ना.  आकस , तेढ , पूर्वग्रह , मनातली गांठ , रुसवा , विपरीत ग्रह , शंका ;
 ना.  ढीग , रास , ( फळे पिकवण्यासाठी )

अढी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  नकारात्मक भावना   Ex. त्या दोघींमधील भांडण संपले पण अढी मात्र राहिली.
ONTOLOGY:
मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
   see : कडवटपणा, आढी

अढी

  स्त्री. दूध तापविण्याची आगटी . ( म . आढी )
  स्त्री. फळें पिकविण्यासाठीं गवतांत घालून ठेवण्याची केलेली योजना . अढींत उतरणें - अशा रीतीनें पिकणें . [ का . अडि = पक्वदशा ]
  स्त्री. पूजेचा एक विचित्र प्रकार ( बार्शी सोलापूरकडे ब्राह्मणांत ढुंगणाची पूजा करण्याची चाल आहे ; तसेंच खंडोबाच्या ढुंगणाची पूजा करण्याची चाल अजून कांहीं ठिकाणीं आहे असें सांगतात ). [ सं . आधि ? ]
  स्त्री. 
  स्त्री. रास ; ढीग . [ का . अडकु = ढीग करणें . ते . अड = ढीग ; सं . आढ्य ? ]
   पायावर पाय ठेवून , तिडा देऊन बसण्याची रीत .
   फाल्गुन अमावास्येच्या दिवशीं शकून पाहून भविष्य सांगण्याची एक रीति ( ग्रामजोशी त्या दिवशीं देवळांत अठरा धान्यें निरनिराळ्या भोंकांत घालून त्यावर पानें झांकण घालतो . दुसर्‍या दिवशीं जें पान ओलसर झालें असेल त्या धान्याची पुढील सालीं सुबत्ता होणार असें भाकित करतो ).
   धान्याच्या राशीवर कडब्याच्या पेंढ्या घालून केलेलें छप्पर .
   ( कों . ) गाई , म्हशी यांचें दूध काढतांना त्यांना घालण्यांत येणारा भाला .
   ( गो . ) चिरकामासाठीं केलेली योजना .
   दोरीचा वेढा , विळखा , दुमड ; मुरड ; गुंता ; अढा पहा . ( ल . ) अडचण ; वांधा , नड . ऐशिया निरुपण घडमोडी । तुझेनि बोलें पडे अढी । - एभा २० . ५६ . ( क्रि० उलगडणें , पडणें ).
   तेढ ; मनांतील गांठ ; विपरीत ग्रह ; अनिष्ठ शंका - विचार ; रुसवा . ( क्रि० धरणें , पडणें ). कां मनिं धरलि अढी ।
   कपाळावरील सुरकुती - वळी . भृकुटिये आढी घालोन । - रावि १० . ३९ .
   रहाट गाडग्यामधील रव्यांच्या वरील आडवें लांकूड ( यावर माळ टाकलेली असते ).
   मिठी . चरणीं घालूनियां अढी । कांसव गजातें पैं ओढी ॥ - मुआ ५ . १०८ .
   ( व . ) स्वयंपाकासाठीं खणलेला चर . [ का . अड्ड = आडवें ; अडें = धीरा , टेंका ].
०खोर वि.  मनांत तेढ बाळगणारा ; खुनशी .
०मारुन   - अक्रि . डोक्याखालीं व पायाखालून पांघरुण दुमडून घेऊन निजणें ; पांघरुण गुरफटून घेऊन निजणें .
निजणें   - अक्रि . डोक्याखालीं व पायाखालून पांघरुण दुमडून घेऊन निजणें ; पांघरुण गुरफटून घेऊन निजणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP