Dictionaries | References

वळसणे

   
Script: Devanagari

वळसणे     

अ.क्रि.  ( प्रां . ) वळसा घेणे ; भोंवती फिरणे . वळसा - पु .
वेढा ; भोंवती , मागेपुढे फेरा । ( क्रि० घेणे ; घालणे ; पडणे ). हरि म्हणे गा अविनाशा । जरासंधे घातला वळसा । - कथा २ . २ . ८९ .
वळण ; प्रदक्षिणा . - ज्ञा ७ . ७२ . पदार्थास वळसा घालून किरणांस पलीकडे जाववत नाही .
बंधन . उडाला देहबुद्धीचा वळसा । तुटला फांसा कर्माचा । - एभा १८ . ७७ .
भोंवरा . - ज्ञा १३ . १८६ . संता ठाया ठाव पूजनाची इच्छा । जीवनीच वळसा सांपडला । - तुगा ३४४३ .
संकट ; त्रास ; अनर्थ . निद्राकाळी ढेकूणपिसा । नाना प्रकारी वळसा । - दा १७ . ६ . ११ .
गांठ ; अढी . अंतरी पीळपेच वळसा । तोचि वाढवी वहुवसा । - दा १५ . ६ . १४ .
सहाणेवर एक वेळ मागेपुढे घासणे ( मात्रा ). ( क्रि० घेणे ; घालणे ; उगाळणे ).
गोंधळ ; गलबला ; बाहेर फुटली मात । वळसा होत नगरांत । लोक दुःखे वक्षस्थळ पिटीत । राजकिशोर आठवुनि । - शिली १४ . १७१ . [ वळणे ] म्ह० काखेस कळसा आणि गांवास वळसा . वळसे वेलांट्या - स्त्री . अव . फाटे ; फिरवाफिरव . आतां या वेळेस वळसे वेलांट्या नकोत . - भा ३७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP