Dictionaries | References

गुढी

   
Script: Devanagari

गुढी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; and डावी गुढी देणें To reject or refuse it. गुढी उभारणें g. of s. or यशाची To become famous; to acquire celebrity, esp. in bad sense.

गुढी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A pole erected on the New Year's Day before the house-door.

गुढी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  वर्षप्रतिपदेस आंब्याचा मोहोर, लिंबाची डहाळी, उंची वस्त्र, गाठी आणि भांडे यांसह काठीला बांधून उभारतात तो ध्वज   Ex. गुढीपाडव्याला घरोघरी गुढी उभारतात
SYNONYM:
ध्वज

गुढी     

 स्त्री. १ देशांतराहून आलेली मृत्यूची बातमी . गोमाजीपंत मेल्याची कालच लष्करांतून गुढी आली . २ ( सामा . ) बातमी ; वर्तमान ; निरोप . विजयाची सागे गुढी । - ज्ञा १४ . ४१० .
 स्त्री. ( खा .) भगत घुमूं लागला म्हणजे त्याच्यापुढें गहूं , सुपारी , पैसे वगैरे ठेवतात ती मांड .
 स्त्री. खोपटी ; झोंपडी ; पाल ; गुढर , गुढार पहा . गुढया घालुनया वनीं राहूं , म्हणा त्यातें । - प्रला १९ .
 स्त्री. १ अढी ; दुमड ; फांसा ( पिळतांना दोरीस पडणारा ). ( क्रि० पडणें ). २ सुरकुती ; घडी ( वस्त्राला पडणारी ). [ सं . ग्रंथि ; प्रा . गंठी , गुत्थ ; हिं . गूंथ ? ]
 स्त्री. १ वर्षप्रतिपदेस उभारावयाचा ध्वज ( आंब्याचा मोहोर , लिंबाचा टाहाळा , उंची वस्त्र , गाठी व एक भांडें यांसह काठीला बांधून उभारतात तो ). ( त्यावरून ) आनंदप्रदर्शनार्थ उभारलेली ध्वजा , पताका . तंवं आत्मा उभिताइ गुढी । रोमांचमिषें । - शिशु ६० . - एरुस्व . ५ . ७९ . २ देवास कांहीं प्रश्नादि विचारणें झाल्यास गोटी , फूल , तांदूळ वगैरे चिकटवितात व प्रसाद किंवा कौल मागतात ती . देवानें त्याविषयीं डावी गुढी दिली कीं उजवी ?
०उजवी   विनंति मान्य करणें .
०कारु  पु. निरोप्या ; जासूद . गुढीकारु पुढें पाठविला । कालिका १७ . २१ .
देणें   विनंति मान्य करणें .
०डावी   विनंति अमान्य करणें . ( यशाची )
देणें   विनंति अमान्य करणें . ( यशाची )
०उभारणें   ( ल . ) प्रसिध्दि पावणें . कीर्तिवंत होणें .
०पाडवा  पु. वर्षप्रतिपदा ; चैत्र शु॥ १ . यादिवशी गुढी उभारतात . [ का . गुडि = काठी , निशाण ]

गुढी     

गुढी उंच उभवणें
गुढी उभारणें पहा. पतिप्रेमाची हे प्रकटच गुढी उंच उभवी ।।’ -सारुह ७.४७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP