|
स्त्री. ( बायकी ) दुहेरी दोरा पिवळा करून घेऊन , त्यांत दोन सोन्याचे मणी आणि हळकुंड व वेखंड यांचे तुकडे बांधून मुलाचें नांव ठेवण्याच्या वेळीं बाळंतिणीच्या गळयांत बांधतात तो दोरा . राखांदुळी - स्त्री . ( कों . ) बाळंतीण झाल्यापासून तिसर्या किंवा पांचव्या दिवशीं भूतादि बाधा निरसनार्थ बाळंतिणीच्या खोलीच्या दाराशीं राखेनें भरून ठेवलेलें भांडें . राखावळ - स्त्री . राखणावळ ; राखणार्या मनुष्याची मजुरी . राखी - स्त्री . पिशाचापासून रक्षण व्हावें म्हणून श्रावण शुध्द पौर्णिमेस हातांत रेशमाचा , कलाबतूचा अथवा कापसाचा दोरा बांधतात तो ; रक्षासूत्र . [ राखणें ] राखीपाडवा , राखीप्रतिपदा - पुस्त्री . राखीपुनवेच्या पुढील दिवस . ब्राह्मणांच्या तीन मोठया भिक्षा मागण्याच्या दिवसांपैकीं हा एक आहे . बाकीचे दोन गुढी पाडवा व दिपवाळीचा पाडवा हे होत . राखीपुनव , राखीपूर्णिमा , राखीपौर्णिमा - स्त्री . श्रावण शुध्द पौर्णिमा ; या दिवशीं राखी बांधतात . राखील - स्त्री . ( कों . ) १ गुरें , शेत इ० राखण्याचें काम . ( क्रि० घालणें ). २ गुराख्यास गुरें राखण्याबद्दल द्यावयाचें वेतन . - वि . राखलेला ; बाळगलेला ( रखेली , माकड , कुत्रा , राघू , लढणारा एढका ). राखीव - वि . राखलेला ; राखून ठेवलेला . [ राखणें ] राखीव खातें - न . मध्यवर्ती सरकारानें प्रांतिक सरकाराकडे न सोंपवितां आपल्याकडेच ठेविलेलें खातें ; ( इं . ) रिझर्व्हड डिपार्टमेंट . तिसरें राखीव खातें म्हणजे परराष्ट्रीय राजकारण होय . - वस्व ६६ . राखूळ - स्त्री . १ गुरें राखणें , वळणें . ( क्रि० घालणें ). २ गुरें राखण्याची मजूरी . राखोळ , राखोळी - स्त्री . १ राखूळ पहा . २ राखणावळ . राखोळा - वि . पाठराखणा पहा . [ राखणें ] राखोळी - स्त्री . गुरचराई ; गुरें राखण्याची मजूरी . राखोळी द्यावया नाहीं । - दावि ७६७ . [ राखणें ] राख्या - वि . स्त्रीनें ठेविलेला ( यार ). [ राखणें ]
|