मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
कुत्रे

भारुड - कुत्रे

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


९०३.
ये रे कुत्तु ये । भाकर आपुली ने । विटाळ करुं नको आम्हांला ।
विटाळ तुझ्या शिरला । दे रे धण्या दे । आंवरुन आपले घे ।
आतां हे कुतरे मातले । देह मी म्हणतां गुंतले । उपाशी मारितो पहा बरे ।
अमृताचे आंग सारे । फार गड्या मोठी केली । जिव्हा तुझी थोटी झाली ।
जिव्हेवरी म्हणती आहे वोघ । त्यानेंचि भरती परी योग । तुला हे ज्ञान जाले कोठे ।
संतगुरुचे देणे मोठे । तुला गुरु आहे काय रे । सर्वां घटी तो चिं कीं रे ।
आम्ही तरि कुतरे म्हणतो तुला । अविद्येने धतुरा दिल्हा । ब्राह्मणांस तूं अविद्या म्हणसी ।
देह ब्राह्मण कैसा होसी । श्रेष्ठ जन्म वेद बोले । येवढे भले तर कां मेले ।
ब्रह्मादिक मरोनि जाती । हरिभक्त अमर होती । अमर तो जाला कोणी नाही ।
व्यासादिक नारद मुनि । जाले ऐसे कळे कैसे । आपण व्हावे तगे तैसे ।
तर कां आतां जाईनास । जातो राहतो पाहीनास । आतां विचार कैसा करावा ।
श्रीरामराम म्हणत जावा । निजबोधाचे कुतरे दास । उत्तम अधम एकचि ग्रास ॥१॥

९०४.
( राग छायालगत्व खमाज; ताल-धुमाळी )
विपत्ती मांडल्या चुकऊं या रे अवघे जण ।
सर्वहि देहेबुद्धि टाकुनी जाऊ रामी शरण ॥ध्रु०॥
तुम्ही आम्ही सर्व एकचि देहेबुद्धीच्या अंती ।
शब्दज्ञाने शीण वाउगा वायां अवघ्या विपत्ती ॥१॥
नका तुम्ही दुरी धरुं रे एक ठाव सकळां ।
जेथुनी आलेती तेथे चि जाऊं आपुल्या स्थळा ॥२॥
परदेशी आम्ही एकट रामदास सकळ ।
प्रपंचसंगतीवेगळे गांव ठाव ना मूळ ॥३॥
पाठी देहबुद्धी लागली या रे पळोनी जाऊं ।
तंवरी हे सोडीना जंव स्वरुप पाहो ॥४॥
स्वरुप पावल्या कुतरे हे काय करील ।
परी फिरोनी पाहातं नासीक तोडील ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP