मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
व्यंकटेश

देवताविषयक पदे - व्यंकटेश

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


११४७.
( राग-श्रीराग; ताल-सुरफाक्ता )
श्रीरंग सुंदर कासे पीतांबर । चरणी ब्रीदाचा तोडर पूर्वापर ॥१॥
देव देवाधिदेव अगाध वैभव । जाणो न शकती देव बापुडे जीव ॥२॥
वाहे कावेरी गंगा भोवती श्रीरंगा । पातके जाती भंगा उद्धरी जगा ॥३॥
दक्षिणमानस तेथ तुझा वास । भव्य महिमा उदास सांगतो दास ॥४॥

११४८.
( राग-हमीर; ताल-त्रिताल )
गिरिवरी महाराज अवतारी ॥ध्रु०॥
गरुड सेवा करी । मारुति महाद्वारी ॥१॥
शंखचक्रपीतांबरधारी । पुष्करणी पाप निवारी ॥२॥
कर्पूर आरत्या करी । पाहती नरनारी ॥३॥
रीसवानरांच्या हारी । रामदासाचा कैवारी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP