मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
डवरी.

भारूड - डवरी.

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


९४६.
( पद; राग-बिहारी; ताल-धुमाळी )
भैरी जागे बोलती । जागे बोलती ॥ध्रु०॥
काळ भैरी ससाणा । बंधु तुळजेचा जाणा ।
काळ पिळियला घाणा । भैरी हुर्मुजी दाणा ॥१॥
निळ्या घोड्याचा राउत । हाती त्रिशूळ संगत ।
कावे घेतो लखलखीत । उंचकासा तखतखीत ॥२॥
नाग डोंब डसती । तेथे भैरीची प्रचीति ।
नाग शंखपाळ डसती । तेथे भैरीची प्रचीति ॥३॥

९४७.
( अभंग )
बाळ भैरी क्षेत्रपाळ । भैरी काळाचाही काळ ।
उदंड संहारिले व्याळ । जोगेश्वरी आणितां ॥१॥
नाना सर्पे उगवले । काळ कर्कोट चालले ।
कित्येक दडोनी राहिले । मारावया भैरीला ॥२॥
मोठे जुनाट विखार । नानारुपी भारेंभार ।
केला तितुक्यांचा संहार । चिरड चिरडूं सांडिले ॥३॥
कित्येक पायाने मर्दिले । कितेक हस्ते कुस्त केले ।
कितेक आपटोनि मारिले । लाथा बुक्या चपराक ॥४॥
कितेक कोल्हाळ मांडिला । शेषराजा हडबडिला ।
मोठा हलकल्लोळ केला । धाके धाके कांपती ॥५॥
केला गर्व तो चालेना । धीट जांवई हालेना ।
सबळपणाचि कल्पना । व्यर्थ होवोनि गेली ॥६॥
गर्व शेषाचा भंगिला । बळेचि लग्न करुनि आला ।
भैरी यशवंत जाला । बंधु तुळजामातेचा ॥७॥
आतां प्रत्यय रोकडे । सर्प न मरे भैरीपुढे ।
थोर सामर्थ्य निवाडे । ठायी ठायी चालते ॥८॥
भक्ति मस्तक वाइले । परि ते मरोनि नाही दिले ।
सामर्थ्याने उठविले । तेंचि मस्तक लावोनी ॥९॥
जिव्हा बहुतांच्या कापिल्या । पुन्हां वाढल्या आल्या ।
साक्षी उदंडचि जाल्या । किती म्हणोनि सांगाव्या ॥१०॥
नाना कल्पना योजना । पुरती मनकामना ।
नाना प्रकारी भावना । नाना नवसे फेडिती ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP