मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
हंडिबाग

भारूड - हंडिबाग

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


१००४.
मज ऐसा बळकट नाही म्हणतो लंडी ।
पिटुनि गायी पुढारे म्यां धरिल्या उदंडी ।
चौ महिन्यांचा आहार मज पाहिजे खंडी ।
एका घाये हाणोन फोडूं काय उतरंडी ॥ध्रु०॥
माझ्या भेणे लंडी वाघ पळोनियां गेले ।
मग म्यां धांऊन जाउनि मेले खोंकड मारिले ।
मोठ्या बळे सरड बेडूक पिटुन घातले ।
एकांगी करुनि किरवे धरुनि आणिले ॥१॥
माझ्या भेणे अवघे भुजंग पळोनियां गेले ।
मग म्यां दाणिवे पुसी धरुनि आपटिले ।
रागे रागे पुंगुळ भोंगे अवघे मारिले ।
एकल्या मर्दाने अवघे वैरी संहारिले ॥२॥
ढेकूण माशा गोमाशांचे कटके बुडविली ।
गोचिडांची पिल्ली खाकेमध्ये धरिली ।
मुंग्या आणि मुंगळे किडे अवघी बुडविली ।
रांडा पोरे अवघी पोटासाठी रडविली ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP