मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
पिंगळा

भारूड - पिंगळा

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


९६२.
भाकणूक ॥ वीर हनुमंतासी दुवा । महंमायासी दुवा ।
संतांचे सभेसी दुवा । धर्माचे सभेसी दुवा । राजमुद्रा देवमुद्रा ।
ज्ञानमुद्रा ते धुरेसी दुवा हो । वेदांत सिद्धांत दुवा ।
धादांत ते मज पिंगळ्याचे बोलणे गायरायन हो ॥१॥
ऐसे सर्वही सरेल । परि अविनाशी वस्तु एक उरेल ।
ते सज्ञान जाणतील । गायरायनहो ॥२॥
या पृथ्वीस प्रळय होईल । महाकाळ पडेल ।
सकळ जीवन आटेल । हा मी पिंगळा बोलोनि जाते ॥३॥
शत वरुषे पाऊस जाईल । तेणे जीवसृष्टी मरेल ।
सूर्यो बाराकळी तपेल । तेणे पर्वतासहित पृथ्वी जळेल । गाय० ॥४॥
पोळती शेषाचिया फडा तो विष वमी भडभडां ।
पाताळ जळत धडधडां । ऐशी ब्रह्मांडाची राखोंडी होईल । गाय० ॥५॥
पाऊस पडेल शुंडाधारी । तेणे बुडेल धरित्री । अग्नि प्रगटेल अंबरी ।
तो करिल बोहरी । तया पाणियाची । तेथे सुटेल वावधान ।
तेणे विझेल तो आग्न । वारियासी गिळतां गगन ।
गगनासी राहे खावुन । तो तामस अहंकार । गायरानहो० ॥६॥
राजस बुडवील तामस अहंकारास सात्विक बुडवील ।
राजस गिळील तामस सात्विक गिळील अहंकारास ।
गुणमाया गिळील गुणास महंमाया करील गाय० ॥७॥
गुणक्षोभिणी मायेपोटी । माया मूळमाया पोटी ।
मूळमाया स्वरुपापोटी । लीन हो गायराय० ॥८॥
विघ्न मोठे गायरायनहो । कांही शांति करा हो ।
कांही त्याग करा हो । उत्तम पहा राजा गायरायनहो० ॥९॥
धुरेची रासी कोण । बापाची राशी कोण ।
म्यां खबर खोब मिथुन कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक धन मकर कुंभ मीन ॥१०॥
मीनाचा मी रोग बरा लाभ आहे गायरायनहो ।
थोरल्या पुस्तकाचा शकून पाहे । मज पिंगळ्याचे हातेन गाय० ॥११॥
बुद्धि कांडि खोंविला वरी । निघाली रंकासी राज्यपदवी ।
तुझी हरपली सांपडेल ठेवी । तरी मज पिंगळ्याला विसरो नको ।
रामीरामदास सरोदा । भाकून गेला निजपदा । त्याचिया नेमाचे शब्दा ।
जतन करा गायरायनहो० ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP