मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|दत्त संप्रदायातील सत्पुरूष|
श्री योगानंद सरस्वती

श्री योगानंद सरस्वती

दत्त संप्रदायातील सत्पुरूष


जन्म: तालनगुर (सुरत जवळ, गुजरात) १८६९ मध्ये अंविल ब्राम्हण कुळात
कार्यकाळ: सन १८६९-१९३८
वडील: डाह्याभाई  
गुरु: श्री वासुदेवानंद सरस्वती  
शिष्य: श्री समर्थ चिंतामणी महाराज
समाधी: सन १९३८, श्रीक्षेत्र गुंज येथे
श्री योगानंद सरस्वती (गांडा महाराज) श्री योगानंद सरस्वती (गांडा महाराज)

श्री योगानंद सरस्वती स्वामी महाराजांचं जन्म परम पवित्र अंविल ब्राम्हण कुळात सुरत जवळ (गुजरात) तालान्नपूर गावी झाला. त्यांच्या पिताश्रींचे नाव  डाह्याभाई. बालपणी त्यांचे जीवन अत्यंत सामान्य असेच होते पण  प. पु. वासुदेवानंद सरस्वतीचे  संपर्कात आले व जीवन आमूलाग्र बदलले. श्री टेम्बे स्वामींचा अनुग्रह झाला व ते टेम्बे स्वामींचे निष्ठावान शिष्य झाले. प. प. रंगअवधुत स्वामी महाराज तर म्हणत श्री योगानंद सारस्वतींसारखा शिष्य होणे नाही. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे आचरण अत्यंत कठोर व शीस्तबद्ध तरीही योगानंद सरस्वतीच्या निष्ठा, श्रद्धा व आचरण यामुळे ते स्वामींचे एक अत्यंतजवळचे अंतरंग शिष्य म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचे निस्पृह आचरण व श्रीगुरुचे चरणी समर्पण यामुळे अनेक मुमुक्षु भक्त त्यांच्याकडे आकर्षित झाले व ते त्यांचे निस्सीम भक्त झाले. श्री टेम्बे स्वामी महाराजांचाही त्यांना खूप सहवास लाभला.

पवनी  येथील चातुर्मासात ते स्वामीबरोबरच होते. त्यांचे मूळ नाव कल्याण. पण त्यांच्या विदेही अवस्थेतील अध्यात्मिक दशेने लोकांना ते वेडेच वाटत (गुजराथी भाषेत याला गांडा म्हणतात) पण वृत्तीतून ते ब्रह्मनंदी  निमग्न असत. प. प. योगानंद सरस्वतींनी प. पु. टेम्बे स्वामी महाराजांचे "गुरुमुर्ती  चरित्र" या नावाने मराठीत चरित्र लिहिले आहे. काही काळ ते भरुच मध्ये राहिले नंतर भारतात अनेक ठिकाणी भ्रमण केले परंतु अंततः ते गुरु आज्ञेनुसार गोदावरी तटावरील श्री क्षेत्र गुंज येथे स्थिरावले.

श्री क्षेत्र गुंज शिव मंदिर, दत्त मंदिर व इतर निवास व्यवस्था व भोजन प्रसाद व्यवस्था संस्थ।न मार्फत आहे. हे सर्व भव्य दिव्य मंदीर व परिसर विकासाचे कार्य त्यांचे परमशिष्य समर्थ चिंतामणी महाराज यांनी केले. या मंदिर ट्रस्ट मार्फत अनेक सामाजिक व कल्याणकारी प्रकल्प राबवले जातात. हे संस्थान अत्यंत उत्तम पद्धतीने सर्व कार्यक्रम करते. मंदिर परिसर हा अत्यंत पवित्र ठेवलेला आहे.

श्री योगानंद सरस्वती स्वामी महाराजांनी १९३८ मध्ये आपला देह दत्त चरणी विलीन केला. महाराजांची समाधी या मंदीर परिसरातच आहे.

फाल्गुन व्दादशी परमहंस परमपुज्य पारिव्राजकाचार्य सद्गुरू श्री योगानंद सरस्वती स्वामी महाराज तथा श्री गांडा महाराज श्री क्षेत्र गुंज जि. परभणी ह्यांची पुण्यतिथी आहे. गुंज हे गांव पाथरीजवळ गोदावरी तटावर वसलेले छोटेसे गाव पण आज प्रत्येकाच्या तोंडी गुंज चे नांव ऐकावयास येते. अशा थोर महात्म्याचा जन्म तालनगुर (सुरत जवळ) गुजराथ मध्ये १८६९ मध्ये झाला. अध्यात्मात विदेही अवस्थेत ते पोहोचलेले महात्मा होते गुजराथी भाषेत अशा अवस्थेला गांडा म्हणुन संबोधतात. त्यांचे गुरू परमहंस परमपुज्य पारिव्राजकाचार्य सद्गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी होत.  नारेश्वरचे श्री रंगावधूत स्वामी हे त्यांचे गुरुबंधू होत. गांडा महाराजांना टेंबे स्वामींचा भरपूर सहवास लाभला. पवनी येथील चातुर्मासात टेंबे स्वामींसोबत गांडा महाराज असायचे. त्यांनी भरपूर भ्रमण केले तरी पण टेंबे स्वामीच्या आज्ञेनुसार ते श्री क्षेत्र गुंज ला स्थिरावले. १९३८ साली त्यांनी त्यांचा देह दत्तचरणी लिन केला. अशा थोर महात्म्यास कोटी कोटी प्रणाम. एकदम गोदातटेच्या व एकांतात गुंजचे स्वामी समाधी मंदीर आहे. मानवतररोड स्टेशन  हुन ३० कि. मी., व परभणीहुन ६० कि. मी. अंतरावर आहे.
एक थोर उपासक व दत्तावतारी  श्री योगानंदसरस्वती स्वामीमहाराज उर्फ श्रीगांडा महाराज !  

अशा थोर महात्म्याचा जन्म तालनगुर (सुरत जवळ) गुजराथ मध्ये १८६९ मध्ये झाला. अध्यात्मात विदेही अवस्थेत ते पोहोचलेले महात्मा होते गुजराथी भाषेत अशा अवस्थेला गांडा म्हणुन संबोधतात. त्यांचे गुरू परमहंस परमपुज्य पारिव्राजकाचार्य सद्गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी होत. नारेश्वरचे श्री रंगावधूत स्वामी हे त्यांचे गुरुबंधू होत. गांडा महाराजांना टेंबे स्वामींचा भरपूर सहवास लाभला. पवनी येथील चातुर्मासात टेंबे स्वामींसोबत गांडा महाराज असायचे. त्यांनी भरपूर भ्रमण केले तरी पण टेंबे स्वामीच्या आज्ञेनुसार ते श्री क्षेत्र गुंज ला स्थिरावले.
संन्यास व दण्डधारण

गुरुदेवांची आज्ञा संन्यास मार्गाने जाण्याची असल्याने सद्गुरु गांडा महाराजांनी नौ चौकी घाटावर शके १८४१ च्या माघ महिन्याच्या वद्य पक्षात संन्यास घेतला. श्री भालचंद्र शास्त्री शुक्ल यांनी प्राचाश्चित्तादि विधी करावयास लावले. त्यावेळी तेथे केशवानंद नावाचे स्वामी आले. त्यांनी प्रेषोच्चार करवून घेतला. विधिवत् कटिसूत्र, कौपीन व काषाय वस्त्रेही दिली. पुढे नामाभिधान व दंड मिळविण्याविषयी तळमळ सद्गुरूंना लागली. अशा अवस्थेतच गुरुदेवांनी, तुझे दंडगुरु श्री कृष्णानंद सरस्वती आहेत, असा दृष्टांत दिला. गुरुआज्ञेनुसार सद्गुरु त्यांच्या शोधासाठी निघाले. डाकोर येथे गोमती नदीच्या तीरावर प. पू. श्री कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराजांची भेट झाली. त्यांनी सद्गुरूंना दंड दिला व योगानंद सरस्वती हे नामाभिधान ठेवले.    
गुंज गुंजले नामनिनादे

सद्गुरु श्री प. प. स. योगानंद सरस्वती स्वामी महाराजांचे पाय या स्थानास लागताच त्याचा पांग फिटला. ती जागा स्वच्छ करण्यात आली. सद्गुरूंचे दर्शन घेण्याकरता दररोज अनेक गावांहून लोक येऊ लागले. सावलीसाठी मंडप टाकण्यात आला. अन्नदान होऊ लागले. भजन, किर्तन, पंचपदीच्या गजराने गोदामातेचा पवित्र तीर दुमदुमूनि जाऊ लागला. हे वातावरण भक्तिमय होऊन गेले. शके १९४४ चा दशहरा व चातुर्मास सद्गुरूंनी गुंज येथेच केला.
काय भक्तिचिया वाटा

चातुर्मासानंतर सद्गुरु पाथरी व रेणापूरला गेले व तेथून श्री बाबा कल्हे यांच्या विनंतीनुसार ते मानवतला आले. मानवत येथे श्रीदत्त मंदिर नव्हते. तेथे दत्त मंदिर व दत्त पादुका असाव्यात अशी भक्तांची इच्छा होती. त्यानुसार श्री बाबा कल्हे यांनी पुढाकार घेतला. व श्री प. प. स. योगानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या सानिध्यात शके १८४४ मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशीस श्रीदत्तप्रभुंच्या मुर्तिची व पादुकांची प्रतिष्ठापना मानवत येथील राममंदिरात करण्यात आली. सुरुवातीची अकरा आवर्तने होईपर्यंत सद्गुरूंनी कमंडलुतील पाण्याने स्वतः दत्तप्रभुंच्या मूर्तिस अभिषेक केला. मानवतला सद्गुरुंचे वास्तव्य असतांना तेथे पाण्याची तीव्र टंचाई होती. श्रीरंगनाथ जोशी यांच्याकडे आड होता. पण त्यात पाणी नव्हते. सद्गुरूंना हे कळाले तेव्हा त्यांच्या कमंडलुतील पाणी त्या आडात टाकले आणि त्या आडास पुरेपुर पाणी आले.

मानवतहून सद्गुरु जिंतूर येथील येथे आले. तेथे श्रीदत्त मंदिरात त्यांनी मुक्काम केला. हे दत्तमंदिर पावसाळ्यात गळत असल्यामुळे खराब झाले होते. त्यामुळे सद्गुरूंनी नाराजी व्यक्त केली व भक्तमंडळीच्या हाताने या मंदिराचा जीर्णोद्धार करून घेतला.
तुझा अभ्यास कसा चालू आहे

सद्गुरूंचा मुक्काम जिंतूरला होता. त्यावेळी प. पू. श्री. चिंतामणी महाराज ७-८ वर्षांचे होते व जिंतूर येथे श्री शंकरशास्त्री पुराणिकांचे घरी शिकण्यासाठी राहात असत. तेही नित्यनियमाने पंचपदीला येत. तेव्हा सद्गुरु त्यांना तुझा अभ्यास कसा काय चालू आहे असे विचारीत ‘ठीक चालू आहे’एवढेच बोलून प. पू. श्री. चिंतामणी महाराज पंचपदीत तल्लीन होऊन जात. उभयतांमधील या संवादाचे इतरांना काही वाटत नसे. आता त्यात किती गुढार्थ भरलेला होता याची प्रचिती येते.

शके १८४५ चा दशहरा गोपेगांव येथे झाला तर चातुर्मास गुंज येथे झाला. याच काळात श्री गुरुमूर्तिचरित्र या ग्रंथाच्या लिखाणास प्रारंभ झाला. सिद्धेश्वराच्या देवालयात बसून सद्गुरु सांगत व गुंज येथील श्री कृष्णाबुवा रामदासी लिहून घेत. श्रीगुरुमूर्ति चारित्राचे पंधरा अध्याय या काळात लिहून पूर्ण झाले.

शके १८४६ चा दशहरा सद्‌गुरूंनी दाजीमहाराजांच्या टाकळीस केला व तेथून ते श्री प. प. स. योगानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीसाठी मानवतला गेले. तेथे पाउस नव्हता व पाण्याची खूप टंचाई होती. मानवतकर अक्षरश: हैराण झाले होते. सद्गुरूंनी परमतत्त्वाची आराधना केली व तीन दिवस मानवतला पाऊस पडला. सद्गुरूंनी शके १८४६ चा चातुर्मास गुंज येथेच केला. शके १८४७ चा दशहरा मोरेगांव येथे तर चातुर्मास कानडखेड येथे संपन्न झाला. याच वास्तव्यात श्री गुरुमूर्ति चारित्राच्या लेखनास पुन्हा सुरूवात झाली. श्री हनुमंतराव वाकडीकर हे लिखानाचे कार्य करीत होते. शके १८४८ चा दशहरा जोडसावंगी येथे १८४९ व १८५० या संवत्सरातील दशहरापर्व सद्गुरूंनी मोरेगांव येथेच साजरे केले. तर या दोन्ही संवत्सरातील चातुर्मास वाकडी येथे झाले. वाकडी येथील या चातुर्मासांच्या काळात श्री गुरुमूर्तिचरित्राचे लेखन पूर्ण झाले. सद्गुरु श्री प. प. स. योगानंद सरस्वती स्वामी महाराज सांगत व वाकडी येथील श्री हनुमंतराव देशपांडे हे उतरून घेत तर श्री बापूराव मोरेगांवकर ग्रंथ लिखानासाठी दररोज ताजी शाई तयार करून वाकडीस पाठवित. अशा पद्धतीने १४,८८३ ओव्यांचा व १३५ अध्यायांचा हा भव्यदिव्य ग्रंथ सर्वांच्या कल्याणासाठी सद्गुरूंनी मराठीत तयार केला. ग्रंथ तर तयार झाला पण आता त्यांच्या शुद्धिकरणाची तळमळ सद्गुरूंना लागून राहिली. इकडे नारेश्वर येथे श्रीरंगअवधूत महाराजांना गुरुदेव श्री प. प. स. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा दृष्टांत झाला की, ब्रह्मचारी, गांडा तुझी वाट पहात आहे. त्यानुसारे श्रीरंगावधूत महाराज वाकडी येथे आले. त्यांनी शुध्दीकरणाचे कार्य पूर्ण केले व नर्मदेस परिक्रमा केल्यानंतर त्यांनी भडोच येथे सहा महिने मुक्काम केला व ग्रंथाची मुद्रीते स्वत: तपासून त्याचे पारायणही स्वत: केले. या कार्यास प. प. श्री. योगानंद महाराजांचे पुर्वाश्रमातील मेहुणे श्री कल्याणजी भाई यांनी खूप मदत केली.
आपणासारिखे करिती तात्काळ

शके १८५० च्या वाकडी येथील चातुर्मासानंतर सद्‌गुरूंचे वास्तव्य गुंज येथे होते. माघ शु. १८ शके, १८५० चा दिवस होता. त्या दिवशी प. पू. श्री चिंतामणी महाराज सद्गुरूंच्या दर्शनाला आले. त्यांनी श्री प. प. स. योगानंद महाराजांचे दर्शन घेतले आणि धीरपणे प्रश्न विचारले की, मी सातवीची परीक्षा पास होईल का? मला वकील व्हायचे आहे! त्यावेळी सद्गुरुंनी क्षणभर स्मित केले व भस्माची चिमुट त्यांना देऊन सांगितले की, ‘हे जपून ठेव’ सद्गुरूंनी दिलेले भस्म क्षणाचाही विचार न करता त्यांनी खाऊन टाकले. सद्गुरूंनी त्यांना आपल्या कमंडलूतले तीर्थही दिले. तेही त्यांनी चटकन पिऊन टाकले. ओला हात सर्वांगाला पुसला. सद्गुरूंनी आपली दिव्य दृष्टी प. प. श्री चिंतामणी महाराजांवर फिरवली व ते म्हणाले की ‘जा तू देवाच्या दरबाराचा वकील होशील’ अशा प्रकारे श्रीमत् प. प. स. योगानंद सरस्वती स्वामी महाराजांनी आपला अध्यात्मवारसा परमपूज्य समर्थ सद्गुरु चिंतामणी महाराजांना जणु सोपवून दिला.
श्री दत्तसंस्थानाची मुहूर्तमेढ

पुढे सद्गुरु योगानंद महाराजांची प्रकृती अस्वस्थ झाली. गुजरातमध्ये ही वार्ता पसरली. सद्गुरूंचे पुर्वाश्रमातील कनिष्ठ बंधू श्री रघुजीभाई, श्री प्रभाशंकर ब्रह्मचारी, प. पू. श्री रंगवधूत महाराज सद्गुरूंच्या सेवेसाठी गुंजेस आले. एक दिवस सद्गुरूंनी भक्तांना बोलावले व सर्वांना आपले मनोगत सांगितले की दत्त संप्रदायाचे कार्य, धर्मजागृती व अन्नदान या गोष्टी गुंज येथे अव्याहतपणे चालू राहाव्यात. या दृष्टिने येथे दत्त मंदिर बांधून संस्थानच्या दृष्टिने आखणी व्हावी. दत्त प्रभुंची कृपा व गुरुदेवांचे आशीर्वाद पाठीशी राहतीलच. कोणतीही शंका मनात आणू नये. एकदा कामाला लागलात म्हणजे कशाचीही कमतरता पडणार नाही. देवांचे नित्यपूजन, करूणात्रिपदी, पालखी, शंकराची अव्याहतपणे बिल्वपत्रांनी पूजा व अभिेषेक यात खंड पडू देऊ नये. पंच नेमून कमिटीद्वारा सर्व हिशेब व्यवस्थित ठेवावा. होणारी मालमत्ता संस्थानच्या नावावर करावी. एवढे सांगून सद्गुरूंनी संन्यासाश्रमात अंत्यविधी कसा करावा लागतो याची कल्पना भक्तांना दिली.
ब्रह्मलीन

पुढे सद्गुरूंच्या अंगावरची सूज खूप वाढली. शरीराला पडून राहणेही कष्टदायक वाटू लागले. प. पू. श्री रंगावधूत महाराजांनी एका पोत्यात साळीचा भुसा भरून मऊ मऊ गादीसारखा बिछाना तयार केला ते रात्रंदिवस सद्गुरूंच्या सेवेत राहू लागले. पण त्यांचा भाऊ मुंबई येथे आजारी असल्याचा दृष्टांत झाल्याने प. पू. श्री. रंगावधूत महाराज मुंबईकडे रवाना झाले.

अवतार त्यागाचा समय आलेला जाणून श्री प. प. स. योगानंद सरस्वती स्वामी महाराजांनी शके १८५० च्या फाल्गुन वद्य द्वादशीस पहाटे ४ वाजता पद्मासन घालून बैठक स्थित केली. प्राणायाम केला. ध्यान लावले. गुरुदेवांचे दर्शन घडल्यानंतर श्रीदत्तप्रभू दिसू लागले आणि त्यांची प्रणवउच्चार करून भौतिक देहास सोडून ते स्वस्वरूपात विलीन झाले.

तलंगपुरच्या नीळकंठेश्वराच्या सान्निध्यात उमललेले हे जीवन, श्री प. प. स. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या सहवासात बहरले, धर्मजागृतीच्या कार्यासाठी सिद्ध झाले आणि मनामनात धर्मजागृतीचे व दत्तभक्तीचे स्फुल्लिंग चेतवून गुंज येथील श्री सिद्धेश्वराच्या सान्निध्यात गोदामातेच्या कुशीत स्वस्वरूपात विलीन झाले.

मुखी दत्तनामस्मरण।
चित्ती असावे हेचि ध्यान।
अंती पावावे निर्वाण।
सच्चिद्घन नमू भावे ॥

॥ श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु योगानंद सरस्वती स्वामी महाराज की जय ॥
गुंज येथील दत्त मूर्ती गुंज येथील दत्त मूर्ती
पू. श्री गांडा महाराज (श्री योगानंद सरस्वती)

पू. श्री की जन्म गुजरात के सुरत जिले में बसे तलंगपुर गाँव में वि. सं. १९२५ मार्गशीर्ष माह में पूर्णिमा की रात्रि को हुआ। बचपन में शरारतभरी प्रवृति ज्यादा होनेके कारण लोग उन्हे 'गांडा' नाम से बुलाते। मूल नाम कल्याणभाई । आठ वर्ष की वय में उनका विवाह हुआ किन्तु बचपन से वैराग्य वृत्ति के कारन वे योगीजनों व साधु की शोध करते। सद्गुरु प्राप्ति हेतु पू. श्रीने धरमपुरी के घाट पर, ॐकारजी, कीटीघाट, नीमावर में अनुष्ठान किये। करुणामूर्ति टेंबे स्वामी महाराज के शरण मे जाने की प्रेरणा उनको सुब्रहम्ण्म स्वामी, केशव भट्ट व शाम भट्ट से मिली. बापुरावमुनि के साथ वो मंडलेश्वर गये वहां से चिखलदा गये किंन्तु सद्गुरु के दर्शन उनको सिनोर में मार्कंडेश्वर महादेव मे हुए। निकोरा में गांडा महाराज की श्रद्धा-भक्ति व शरणागत भाव से प्रसन्न होकर टेंबे स्वामी महाराजने प्राणायाम की शिक्षा दी और योगाभ्यास में अग्रेसर कीया । शुक्लतीर्थ में अपने मात-पिता की आज्ञा व पत्नी की अनुमति लेने हेतु समझाते हुए चातुर्मास्य मे द्वारिका आनेका कहा। यहां उनको स्वामी महाराज कृष्णावतार ही है व गुरु-वचन अनुसार चलने पर असंभव कार्य भी संभव व सरल बनते है उसका प्रमाण दिया। भरूच में भागलकोट के तट पर रह कर उन्होने अपने गुरु परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) स्वामी महाराज की आज्ञा अनुसार योग साधना की । भरूच में ही गुरु आज्ञा का पालन करते हुए उन्होने चातुर्मास्य किया व सवा लक्ष गायत्री जप-अनुष्ठान भी ।

उनके जिवन में भगवत कृपा के अनेकों प्रसंग बने जिस के मूल मैं उनकी प.प.स्वामी महाराज पर अनन्य निष्ठा ही है । गांडा महाराज ने गालव श्रीक्षेत्र में {टेंबे स्वामी ने बताया की पुत्र प्राप्ति हेतु उनकी माताजी ने शिवरात्रि का व्रत एवं महादेव की उपासना की थी और उसके फल स्वरुप उनमें सत्त्वगुण प्राधान्य होकर यह (सद्गुरु कृपा) लाभ मिला है किन्तु व्रत उद्यापन शेष है।}द्वी दिन लघुरुद्र स्वाहाकार ( यजुर्वेद व ऋग्वेद ) महाशिवरात्रि पर उद्यापन और दूसरे दिन यथाशक्ति महाभोजन-प्रसाद कर गुरुकृपा से अपनी माताजी को ऋणमुक्त कराया। गुरुआज्ञानुसार श्रीक्षेत्र गरुडेश्वर में न रह कर उन्होंने अपने पिताजी की अन्त समय में सेवा की एवं सभी उत्तरक्रिया भी। डाकोर में कृष्णानंदसरस्वती से दंड ग्रहण कर संन्यास दीक्षा ली पश्चात उनका नाम " पू. योगानंद सरस्वती " रखा। वि.सं. १९७८ में उन्होंने अनावल स्थित शुक्लेश्वर महादेव मंदिर का जीर्णोद्धार करवाया जो गुजरात में उनका आखरी मुकाम भी था। तत्पश्चात पू.श्री ने अपना सेवाकार्य क्षेत्र श्रीक्षेत्र गुंज (ता. पाथरी, महाराष्ट्र) में किया। चातुर्मास्य भी गुंज में किया। माणवत गाँव में अकाल की परिस्थिति आने पर दत्तनाम संकीर्तन पाठ करवाने पर इतनी बारिश हुई की सभी नदी-तालाब छलक गये। एक सुखे कुएँ मे अपने कमंडल जल को अभिमंत्रित कर छिडकाव करने पर नवीन जल से न केवल भर गया किन्तु तत्पश्चात वो कभी नही सुखा।

श्रीक्षेत्र गुंज में लिखे गये १५ अध्याय से आगे का लेखन कार्य शंकर कुलकर्णी (दादा साहेब) करते जैसे जैसे पू.श्री कहते। खुद गुजराती और मराठी में प्रभुत्व ठीक न होने पर अशुद्धियों को दूर करने की बात से चिंतत थे तब प.प.स्वामी महाराज का आदेश हुआ " मैं ब्रह्मचारी भेज रहा हुं चिंता मत कर ।" श्रीदत्तपुराण के १०८ पारायण  करने के बाद उद्यापन निमित्त १०८ दिन में श्रीनर्मदा परिक्रमा कर आये पू. श्री रंग अवधूत (ब्रह्मचारी) के साथ में शुद्धि कार्य पूर्ण किया।

पू. श्री रंग अवधूत महाराज ने भरूच श्री कल्याणजीभाई की मदद से भूतनाथ महादेव में रहकर ग्रंथ छपवाया। पारायण कर " श्रीगुरुमूर्ति चरित्र " से प्रेरित होकर प.प.स्वामी महाराज का संक्षिप्त चरित्र " श्रीवासुदेवनामसुधा " स्तोत्र की रचना की जिसका पू. श्री रंग अवधूत महाराज नित्य पठन करते।

प.प.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज के अन्य शिष्यों में पू.श्री सीताराम महाराज, पू.श्री दीक्षित स्वामी, पू.श्री गुळवणी महाराज, पू.श्री नाना महाराज, पू.श्री रंग अवधूत महाराज के नाम अत्यंत आदर से लिये जाते है। पू. श्री गांडा महाराज ने श्री गुरुमूर्तिचरित्र उपरांत ईशावास्योपनिषद पर विवेचन भी लिखा व गुजराती मे 'पुरुष धर्म निरूपण' एवं 'स्त्री धर्म निरूपण' की रचना की। 'अज्ञान तिमिर दीपक' नामक विवेचन ग्रंथ की रचना भी उन्होंने की। उनका अपने गुरुबंधु पू.श्री रंग अवधूत के प्रति अत्यंत आदर व प्रेम था। उस बात को प्रमाणित करते कई प्रसंग है। गुंज में वि. सं. १९८६ फाल्गुन कृष्ण द्वादशी के दिन समाधिस्थ हुए। त्रयोदशी के दिन विधिवत असंख्य भक्तों के बीच उनको गोदावरी नदी में जल-समाधि दी गई।

६० वर्ष की आयु में उन्होंने दत्तभक्ति व परंपराओं के कई अनूठे कार्य किये। समाधि पूर्व गुंज में दत्त मंदिर का निर्माण करने व पालखी, नित्य-नियम  त्रिपदी करने का आदेश देते हुए आशिर्वाद भी दिया की पैसों की कभी नही होगी। उनके शिष्यों में चिंतामणी महाराज का नाम अति प्रिय है। आज गुंज में पू.श्री की समाधि तिथि व दत्त परंपरा के कई उत्सव मनाये जाते है। पू.श्री के बताएं नियमोंनुसार भजन, पालखी यात्रा की जाती है।

(पू. श्री योगानंद सरस्वती स्वामी महाराज जिवन चरित्र में से अति संक्षिप्त में।)

N/A

References : N/A
Last Updated : June 29, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP