श्रीमद् ब्रह्मानंद स्वामी महाराज
दत्त संप्रदायातील सत्पुरूष
श्रीमद् ब्रह्मानंद स्वामी महाराज श्रीमद् ब्रह्मानंद स्वामी महाराज
श्रीमद् ब्रह्मानंदस्वामी हे नरसोबावाडीतील श्रेष्ठ अशा संत परंपरेतील महापुरूष होते. हे आदर्श सदाचारसंपन्न संन्यासी होते. नेहमी ब्रह्मानंदी निमग्न राहून त्या पवित्र क्षेत्री कित्येक वर्षे वास्तव्य केले होते. ब्रह्मानंद या मठात त्यांचे स्थान आहे. महादेवाची एक पिंडी व नंदी असे त्यांच्या स्थानाचे स्वरूप आहे.
ब्रह्मनंद स्वामींची समाधी मौनिस्वामींच्या समाधीस लागून आहे. ब्रह्मनंद स्वामी हे सन्यासानंतर ब्रह्मनंद सरस्वती या नावाने वाडीत प्रसिद्धीस आले. हे दंडी संन्यासी अनेक वर्षे वाडीत वास्तव्यास होते. सदाचार संपन्न, कर्मठ व आदर्श संन्यासी म्हणून त्यांचे वर्णन करता येईल. सध्या ब्रह्मनंद म्हणून वाडीत प्रसिद्ध ठीकाण आहे तेथेच स्वामींचे वास्तव्य होते. नित्य श्रीसेवा, श्रीदत्तचारणावर पाणी घालणें, भजन, पूजन व गुरुचरित्र वाचन इ. सेवा करून काळ घालवीत असत. नांवाप्रमाणे त्यांची श्रीसेवेत ब्रह्मनंदी टाळी लागली होती. ईश्वर चिंतनाने व सगुणमूर्ती पूजनाने जे साध्य करायचे ते खऱ्या अर्थानी श्री ब्रह्मनंदानी मिळवले होते. इतकेच नव्हे तर त्याचा त्यांच्या सहवासात आलेल्या सर्व भक्तगणाना त्यांच्या ज्ञानाचा लाभ झाला.
‘ब्रह्मानंद’ दायक मठात अनेक सत्पुरूषांनी साधना केलेली आहे. आजही अनेक भक्तजन मठात बसून परमेश्वराची भक्ती श्रद्धेने करतात.
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
N/A
References : N/A
Last Updated : May 15, 2024
TOP