श्री रामानंद बिडकर महाराज
दत्त संप्रदायातील सत्पुरूष
जन्म: २२ नोव्हें, १८३८, माघ शु. ८ शके १७६०, पार्थ गोत्री देशस्थ ब्राह्माण
आईवडील: गंगुताई / बळवंतराय बिडकर
गुरू: स्वामी समर्थ अक्कलकोट
कार्यकाळ: १८३८-१९१२
शिष्य: श्रीरावसाहेब ऊर्फ बाबा सहस्त्रबुद्धे
विवाह: २१व्या वर्षी, राणूबाईंशी विवाह (रामजी आप्पाजी पाटील केडगाव यांची कन्या)
पुण्याचे श्री रामानंद बिडकर हे स्वामींचे एकनिष्ठ शिष्य, लहानपणापासून त्यांना देवभक्तीची ओढ, व्यवसाय सुगंध्याचा, त्यांचे वडील ब्रिटीशांकडे नोकरीस होते. रामानंदांच्या वयाच्या सातव्या वर्षी त्यांचे निधन झाले. इंग्रजांनी त्यांच्या आईला २०० रू. ची पेन्शन मंजूर केली. पण परदेशी मदत मी घेणार नाही म्हणून आईने ती नाकारली.
पार्थ गोत्री देशस्थ ब्राम्हण. त्यांचा जन्म माघ शु. ८ शके १७६० या दिवशी झाला. त्यांना पितृसुख फारकाळ लाभले नाही. त्यांची वृत्ती लहानपणापासूनच जिज्ञासू होती. देवभक्तीचे वेड बालवयापासूनच होते. विद्यार्थि वयातच ते पायी पंढरपूरला गेले. सप्तशृगीची यात्राही बाल वयातच केली. विवाहा नंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरच पडली. व्यवसाय सुगंध्याचा व्यवसायासाठी खूप भ्रमण केले. याच काळात मिळालेल्या धनाने व्यसनाधीन झाले. परंतु मूळची विरक्त वृत्ती त्यांना अंकुश लावू लागली. विचार मंथन सुरु झाले व त्यातूनच अक्कलकोटी स्वामींचे दर्शनास जाण्याची प्रेरणा झाली. स्वामींचे पहिल्याच भेटीत वृत्तीत आमूलाग्र बदल झाले व तीसऱ्या भेटीत स्वामींचा अनुग्रह झाला आणि त्यांचे कडून नर्मदा परिक्रमेची आज्ञा झाली. पण म।हेश्वर मुक्कामी असताना श्री स्वामी समर्थांच्या समाधीची वार्ता समजली. स्वामी समर्थांना स्वरूप संप्रदायाच्या उत्थापन व प्रसाराची गरज भासली व त्यांनी ती जबाबदारी एकनिष्ठ शिष्य पुण्याचे रामानंद बिडकर यांचे खांद्यावर टाकली. अगदी लहान वयातच त्यांनी पंढरीची वारी पायी केली. अनेक अडीअडचणी व गर्दीतून ते पंढरपूरला पोहोचले व तेथील पूजाऱ्यांनी त्यांना मदत करून सरळ पांडुरंगाच्या गाभाऱ्यात पोहोचवले. ते सप्तश्रुंगी मातेच्या दर्शनास वणीला गेले आणि मातेने तोंडातला विडा रामानंदांच्या हातात पडला. हा मातेचा कृपाशिर्वादच !
पहिल्याच भेटीत स्वामी समर्थांनी त्यांना जाणले, परिक्षा घेतली आणि रामानंद त्यांचे आवडते भक्त झाले. रामानंदांनी शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी व्यापार सुरू केला. त्यांनी जोहरी म्हणून पुण्यात नावलौकिक मिळवला. त्यांनी एका साधूकडून समृद्धीसाठी सोने बदलाची किमया शिकून घेतली. त्यांनी अपार धनदौलत पैसा मिळविला. त्यामुळे व्यसनाधिनताही आली. त्यांनी हनुमंताची उपासना अध्यात्मिक विकासासाठी सुरू केली. हनुमंतानेच रामानंदांना श्रीस्वामी समर्थांकडे अक्कलकोटला जाण्यास सांगितले.
स्वामी पहिल्या भेटीतच त्यांच्यावर रागावले. संतापले. पण रामानंदांनी सेवा सोडली नाही. हीच नर परीक्षा होती. तिसऱ्या अक्कलकोटच्या भेटीत रामानंद स्वामींचे पाय दाबण्याची सेवा करीत होते. एक विषारी नाग त्यांच्यामध्ये फुत्कार करू लागला. रामानंदांनी स्वामींची सेवा सोडली नाही. क्षणार्धात स्वामी उठले आणि त्यांनी ताडकन मुस्काटात मारली आणि रामानंद समाधीत गेले. ही समाधी १२ तास चालली. पण त्याप्रसंगानंतर त्यांचे जीवन बदलले. भौतिक जीवनाबाबत ते पूर्णतया उदासीन झाले. स्वामी समर्थांच्या प्रेरणेतून मूळची सत्प्रवृत्ती पल्लवीत झाली.
स्वामींच्या सांगण्यानुसार केवळ दोन पंचानी त्यानी नर्मदा परिक्रमा केली. प्रखर सूर्य, काही भागात कडक थंडी ४५ दिवसाचे लागोपाठ उपास असे करत जवळजवळ २ १/२ वर्षांनी ते पुण्यात पोहोचले व उर्वरीत आयुष्य पुण्यातच घालवले.
त्यांनी शिष्यांच्या अध्यात्मिक व भौतिक पुनरुत्थानाचे कार्य केले. भुकेलेल्यांना अन्न द्यावे अशी त्यांची शिकवण होती. एकदा जंगलातून जात असता एका ठिकाणी एक टेंभा लावून ध्यानास बसणार तर त्यांनी समोर काळस्वरूप वाघाला त्यांनी पाहिले व त्यांनी समर्थांचा धावा केला. आश्र्चर्य वाघ दुसरीकडे निघून गेला. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर कोसळला. केवळ आपल्या स्वामींच्या कृपादृष्टीच्या विचाराने ते आनंदीत झाले.
एक गुजराथी ब्राह्मण नर्मदा परिक्रमेदरम्यान त्यांना भेटला. जो मूळव्याधीच्या त्रासाने नर्मदेत प्राण अर्पण करण्यास जात होता. श्री बिडकर महाराजांना शरण आला. स्वामींनी त्याची व्याधी स्वत: घेऊन त्याला रोगमूक्त केले. स्वामींच्या सांगण्यानुसार त्यांनी नर्मदा परिक्रमा, काशी, गया, प्रयाग, औदुंबर, नरसोबावाडी अशा तिर्थयात्रा केल्या. प्रपंच व परमार्थ या दोन्हीही अंगाचे अनुभव घेऊन इ. स. १९१२मध्ये समाधीस्थ झाले. पुण्यात शनिवार पेठेत नदीकाठी त्यांची समाधी आहे. त्यांचे शिष्योत्तम श्री रावसाहेब उर्फ बाबा सहस्त्रबुद्धे हे नाव महत्त्वाचे असून परमार्थवृत्तीत रंगून जाणारे त्यांचे व्यक्तीमत्त्व होते. त्यांचाही आश्रम पुण्यात मॉडेल कॉलनीत आहे. पुण्यात शनिवार पेठेत नेने घाटाजवळ त्यांचा मठ आहे. त्या मठात काष्ठमय विठ्ठल-रुख्मिणीच्या मूर्ती, गणपती, महादेव असे देव आहेत. मारुती त्यांचे पाहिल्यापासूनचे उपास्य दैवत. त्यांचा शिष्य परिवार फार मोठा, पण त्यांच्या या शिष्य मांदियाळीत रावसाहेब सहस्रबुद्धे हे एक अधिकारी सत्पुरूष होऊन गेले त्यांची समाधी सुद्धा पुणे येथे शिवाजीनगर भागात आहे. रामानंद बिडकर महाराजांचा इ. स. १९११ मध्ये त्यांना अनुग्रह झाला. "आमचा उपदेश वेड लावून घेण्याचा आहे, पण वेडा होण्याला आज कोणीही तयार नाही ही बिडकर महाराजांची खंत रावसाहेबांनी दूर केली. आणि ते परमार्थाचे वेडे झाले.
गुरुपरंपरा
श्री स्वामी समर्थ
।
श्री रामानंद बिडकर महाराज
।
श्री वासुदेवानंत सरस्वती (सद्गुरू बाबा महाराज सहस्रबुद्धे)
स्वर्ण विद्येच्या शिल्पकाराचा स्वामी समर्थकडून उद्धार
बीडकर नावचे एक गृहस्थ अत्तराचे व्यापारी होते. त्यांचा व्यापार तर चांगलाच चालायचा पण त्यात त्यांना जडीबुटीनी धातूचे स्वर्णकरण्याची विद्या पण हस्तगत झाली होती. त्यांचे एका नर्तकी वर प्रेम होते आणी तिला लग्नाचे वचन पण दिले होते. नर्ताकिनी पण दुसऱ्या लोकासाठी नाचणे बंद केले होते. ती बीडकरांच्या मागे लग्ना साठी लागली होती. पण बीडकर यांचे आधीच लग्न झालेले होते म्हणून त्यांना प्रश्न पडला होता. आपल्या मित्राला आपली चिंता सांगताना त्यंना खबर येते की त्या नर्तकीचा सर्प दंशानी मृत्यू झाला.
मित्र त्यांना म्हणतो की ईश्वरानीच तुमची या प्रश्ना पासून सुटका केली. पण त्या नर्तकी वर जीव असल्यानी त्यांना जगा-प्रती थोडा वीतराग आला होता. संसार दु:ख प्राप्त झाल्यावरच मनुष्याला अध्यात्माची आठवण येते. मनाच्या शांतीसाठी बीडकर आध्यात्मात उपाय शोधात्तात. तितक्यात एक रामदासी उयुन त्यांना म्हणतो की आध्यात्म-मार्ग इतका सोपा नसतो आणी त्यात तुझ्या सारखा ऐश्वर्यात लोळणारा माणूस काय आध्यात्मा कडे वळणार? त्या रामदासाचा टोमणा बीडकर च्या हृदयात लागतो. ते आपल्या आराध्य देव मारुतीचा मंदिरात जातात. तिथे ते मारुतीचा धावा करतात. तितक्यात त्यांना देववाणी ऐकू येते की अक्कलकोटला स्वामी समर्था कडे जा. बीडकर अक्कलकोटला येतात. तिथे ते स्वामी सेवेत राहतात. एकदा स्वामींचे पाय चेपताना त्यांचा डोळा लागतो. डोळे उघडतात तेव्हा पाहतात तर काय स्वामी जवळ एक मोठ्ठ्या फणेचा नाग बसला आहे. बीडकर स्वामींवर विश्वास ठेऊन मुखांनी नामस्मरण करत पाय चेपत राहत्तात. स्वामी लगेच उठतात. आणी उठल्या बरोबर बीडकरांच्या श्रीमुखात एक जोरदार ठेवतात. बीडकरचा चेहरा आनंदानी खिळून उठतो. ते आनंदात डोलू लागतात.
स्वामी रामानंद बीडकर स्वामी रामानंद बीडकर आणि स्वामी समर्थ महाराज
स्वामी मग त्या नागाला हातात धरून तिथून निघतात. गुरु आपल्या निवडक शिष्यावर शक्तिपात करतो तेव्हा त्याचे प्रकार वेग-वेगळे असतात. चापटी मारणे हा ही एक शक्तीपाताचा प्रकार होता. या मुळे बीडकर यांच्या मनातला द्वंद संपून त्यांना होणाऱ्या उद्वेगाचे निरसन होते. खर ज्ञान मिळाल्यानी त्यांचा चेहरा प्रफुल्लित होतो. ते स्वामी शरणी येतात. स्वामी त्यांना सहस्त्र भोजन घाल असे सांगतात. बीडकर आपल्याकडे असलेल्या अत्तराच्या बाटल्या विकायला निघात्ता पण त्यांना ठेच लागून बाटल्या चकनाचूर होतात. हुशार बाळप्पा त्यांना मार्ग सांगतात. त्या राहिली-सुध्लेल्या अत्तराचं अष्टगंध करून ते राजाला विकून येतात. आणी त्या पैशानी बीडकर सहस्त्र भोजनपार पाडतात. स्वामी भोजन ग्रहण करून म्हणतात: " भोजन तो दिया अब दक्षिणा देणने का वक्त आ गया है." पण बिद्कारांकडे पैशे नसतात. सर्व पैशे तर सहस्त्र भोजनात खर्च झालेले असतात. मग स्वामी म्हणतत अरे दक्षिणा नसेल तर एक वचन दे- "जडी बुटी चे कार्य सोडून दे" जडी-बुटीचे कार्य म्हणजे धातूचे सोने बनवण्याचे कार्य. बीडकरांना प्रश्न पडतो पण ते सद्गुरू आज्ञेला सर्वोपरी मानून सोनं बनवणार नाही अशे वचन देतात. स्वामी मग त्यांना नर्मदा प्रदिक्षणा घालायला सांगतात. माया ही ब्रह्मा आणी मोक्ष प्राप्तीत सर्वात मोठी बाधा असते. बीडकर यांची आध्यात्म मार्गावर उन्नती व्हावी म्हणू स्वामींनी केलेली ही उपाय योजना होती. नुसते धातूचे स्वर्ण करत बसल्या पेक्ष्या आता बीडकर स्वताच्या जीवनाचे सुवर्ण करण्याच्या मार्गावर चालायला लागले होते.
रामानंद बीडकर l होते सतेज सुंदर l
भक्ती मार्गाची ओढ फार l स्वामींकडे ते गेले होते l
पारखून घेति स्वामी l त्यांना ओळखून अंतर्यामी l
सत्व परीक्षा घेवुनी त्यांची l स्वरूप लीन त्यांना केले ll
N/A
References : N/A
Last Updated : June 29, 2024
TOP