मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|दत्त संप्रदायातील सत्पुरूष|
सद्गुरू देवेंद्रनाथ महाराज

सद्गुरू देवेंद्रनाथ महाराज

दत्त संप्रदायातील सत्पुरूष


सद्गुरू देवेंद्रनाथ महाराज, कानिफनाथ मंदिर मढीचे शिल्पकार !
परमपूज्य सद्गुरु श्री देवेन्द्र नाथ महाराज परमपूज्य सद्गुरु श्री देवेन्द्र नाथ महाराज

परमपूज्य सद्गुरु श्री देवेन्द्र नाथ महाराज उर्फ श्री विजय कुमार सखाराम सुळे हे या कलियुगातील एक महान सिद्ध योगी होते. त्यांचा जन्म आषाढ शुद्ध नवमी शके १८५९ (६ जून १९३७) रोजी रायगड जिल्ह्यात पाली येथे झाला. साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेले श्री देवेंद्र नाथ महाराज हे व्यवसायाने आर्किटेक्ट होते त्यामुळे शिस्तप्रियता व्यवस्थितपणा त्यांना प्रिय होता उच्चशिक्षित असले तरीसुद्धा स्वभावात शालीनता होती मुंबईला नोकरीला असताना पोंडीचेरी येथील महान योगी श्री अरविंद घोष यांचे भक्त श्री मुखर्जी यांच्याशी त्यांचा संपर्क आला श्री मुखर्जीनी महाराजांना अनेक चमत्कार करून दाखवले. त्यामुळे महाराज प्रभावित झाले त्यांनी मुखर्जींना आपल्याला गुरुमंत्र देण्याची विनंती केली पण मुखर्जींनी मी तुझा गुरु नसून लवकरच तुला एक महान सद्गुरु लाभणार आहेत व माझ्यापेक्षाही अनेक मोठे चमत्कार तू स्वतःच करून दाखवशील असे सांगितले. काही दिवसांनी त्यांना आंध्र प्रदेशातील मंत्रालयम येथील समाधी स्थळ श्री राघवेंद्र स्वामींनी दृष्टांत देऊन गुरुमंत्र दिला आणि दीक्षांत नाव देवेंद्र असे ठेवले.

महाराजांच्या घरात पूर्वापार नाथ पूजा आणि पोथी पारायण होत असल्याने त्यांच्यावर नाथ पंथाचा प्रभाव होता एकदा ते मढी येथे चैतन्य कानिफनाथ यांच्या दर्शनाला गेले असताना कानिफनाथांनी प्रत्यक्ष दर्शन दिले मी तुझी बऱ्याच वर्षापासून वाट पाहत आहे असे सांगून या मंदिराला आलेली अवकळा व पूजेतील उणिवा सांगितल्या. तसेच तू येथे जीव ब्रह्म सेवा कर असे सांगितले महाराजांनी मढी हीच आपली कर्मभूमी आहे हे जाणले व येथेच आपले कार्य केले.

चैतन्य कानिफनाथ यांच्या आदेशानुसार श्री नाथपंथी द्वैताद्वैत पिठाची स्थापना गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिनांक ६.७.१९७४ रोजी केली, व सांसारिक असलेल्या आपल्या भक्तजनांना शिष्यांना साधकांना हटयोगी शिबिरे अलख निरंजन या माध्यमातून जीव ब्रह्म सेवा व जीव ब्रह्म सेवेतून अध्यात्मिक उन्नती प्राप्त कशी करावी याचे मार्गदर्शन केले. दर अमावस्येला मयूर टेकडीवर बसून भस्म समाधी घेत असत विश्वशांतीसाठी ८ मे ते १२ मे १९७९ शिवयाग महान यज्ञ त्यांनी केला.

श्री नवनाथांच्या सर्व विद्या शक्ती किमया सामर्थ्य आणि हठयोग उच्च योगसाधना प्राप्त झालेली अलौकिक असामान्य व्यक्ती म्हणजे परम पूज्य श्री देवेन्द्रनाथ. विजय कुमार सुळे यांची म्हणजे नाथांची अलौकिक तेज ज्ञान साधना प्राप्त झालेली सजीव मूर्ती होय. श्री देवेन्द्रनाथ यांच्या घराण्यांमध्ये पूर्वापार ७० वर्षांपासून नाथ भक्ती होती. त्यांची आई मच्छिंद्रनाथांची उपासक होते. त्यामुळे नाथपंथाचे आकर्षण त्यांना लहानपणापासून होते.

अहमदनगरच्या परिसरात अनेक नाथपंथी स्थानी आहेत. पाथर्डी, शेवगाव, गर्भगिरीच्या परिसरात मायंबा, चेतन्य मच्छिंद्रनाथ, मढी कानिफनाथ, खोकर्मोहा येथे जालिंदरनाथ, जामखेड नजीक चिंचोली गहिनीनाथ, डोंगरगण येथे गोरक्षनाथ मंदिर असल्यामुळे श्री देवेन्द्रनाथ परिसराकडे आकर्षित झाले.

सद्गुरु श्री देवेंद्रनाथ व्यवसायानिमित्त अहमदनगर येथे गेले असता तेथे मढी मुक्कामी त्यांना कानिफनाथांचा साक्षात्कार झाला. ते म्हणाले, "बेटे कितने दिनों से मैं तुम्हारी राह देख रहा था l यह वैदिक पाठ, होम हवन होता नहीं l जीव ब्रह्म सेवा नहीं होती l यह काम तुम करो". यानंतर परम पूज्य श्री देवेंद्र नाथांनी मढी येथे तर अमावस्येला जीव ब्रह्म सेवा, भस्म समाधी वगैरे विधी सुरू केले. तेथील गोरगरिबांची सेवा सुरू झाली. बघता बघता प्रवचने, शिबिराच्या माध्यमातून शेकडो शिष्य साधक सेवाभावी लोकांचा एक संप्रदाय निर्माण झाला.

देवेन्द्रनाथ यांची जीव ब्रह्म सेवा हे नाथपंथाचे मोठे आकर्षण. त्यामुळे मढी ची जत्रा वाढली. "मुकम करोति वाचालम् । पंगुं लंघयते गिरिम ।" या उक्तीची सार्थता त्यांनी पटवली. त्याही पुढे जाऊन त्यांनी देवळाचा जीर्णोद्धार, गडावर पाणी, पेपर मेल, आयुर्वेदिक वृक्षांची लागवड कितीतरी अफाट कल्पना सत्यात उतरवल्या. राजस्थान धुळे नेपाळ अशा कित्येक ठिकाणी लांबच्या पल्ल्याचे कितीतरी प्रवास करून त्यांनी नाथपंथासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती मिळवली.
नवनाथापैकी एक नाथ म्हणजेच सद्गुरू देवेंद्रनाथ महाराज

सकल संत सज्जन मायबाप हो महाराष्ट्र हि संताच्या पद स्पर्शाने पावन झालेली पवित्र पावन भुमी आहे या पवित्र भूमीवर चैतन्य कानिफनाथ महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र मढी येथे आहे. नवनाथापैकी एक नाथ म्हणजेच सद्गुरू परम पूज्य विजयकुमार सखाराम सुळे म्हणजेच परम पूज्य सद्गुरू देवेंद्रनाथ महाराज हे अहमदनगर येथे सर्व प्रथम आले ते व्यवसाया निमित्ताने. ते उत्कृष्ट आर्किटेक्ट होते. त्याच्या बरोबर पुण्यातील व्यवसायिक मित्र होते. दोघांनी मिळून एकत्रित पणे एक काम नगरला घेतले होते. श्री देवेंद्रनाथ महाराजांच्या घरी कित्येक दशके नाथ सेवेचा वारसा लाभलेला असल्यामुळेच नगरला आल्यावर स्थानिक लोकांकडून माहिती घेत घेत ते जवळच चैतन्य कानिफनाथ महाराज याच्या मढीला गेले. त्यावेळी त्या मंदिराची आणि नाथाच्या समाधिची दुरावस्था पाहून मंदिरात दिवा बत्ती नाही मंदिरात सर्वत्र जाळी जळमटे पाणी आणि विजेची सोय नाही हि (परिस्थिती १९७२-७३ पुर्वी होती). हि सर्व परिस्थिती पाहून महाराजांना खूप वाईट वाटले. समाधी गाभाऱ्या जवळील शेजघर कित्येक वर्ष बंदच होते. प्रत्यक्ष प्रबुध्द नारायण म्हणजेच नवनाथापैकी चैतन्य कानिफनाथ महाराजांचे संजीवन समाधीची हि दुरावस्था पाहून परम पूज्य देवेंद्रनाथ महाराज यांनी या समाधी मंदिराला गतवैभव प्राप्त करून दिले. कारण सद्गुरू सारीखा असता पाठीराखा इतरांची लेखा कोण करी, सद्गुरूच तारील बिकट वाट, सद्गुरू मुळेच आपल्या जीवनात कायापालट झाल्याशिवाय राहणार नाहीत. माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,

"रामकृष्ण नामे ऐ दोन्ही साजिरी हदय मंदिरी स्मरा आधी आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी"

संसारावरील आवड प्रेम माया संकल्प विकल्प नाहीसा करून समर्थ अशा सद्गुरूशी शरण जावे म्हणून देवेंद्रनाथ महाराज यांनी अवतार धारण करून भक्तीपंथ वाढवण्यासाठी कानिफनाथ महाराज संजीवन समाधी मंदिराचे जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला. त्यासाठी त्यांनी चैतन्य कानिफनाथ महाराज यांना आदेश मागितला. आणि नाथाने आपल्या या भक्तास आदेश दिला. म्हणून तर मढी येथील चैतन्य कानिफनाथ महाराज संजीवन समाधी मंदिराचा जीर्णोद्धार करण्या पुर्वी परम पूज्य देवेंद्रनाथ महाराजांनी तीर्थक्षेत्र मढी येथे ७५ दिवसांनी कडक  अनुष्ठान केले होते. सिद्धाग्नि साक्ष त्याची हि अनुष्ठान सेवा चालत असे. माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, "हदया हदयी एक झाले ऐ हदयी ते हदयी घातले" म्हणून तर त्यांच्या परमार्थ साध्य झाला. या अनुष्ठान मध्ये फक्त एक मुठभर तांदुळाचा भात ते करत होते. त्याचे तीन भाग करून एक भाग गाईला एक भाग कुत्र्याला आणि उरलेला एक भाग ते स्वतः सेवन करायला. त्या अनुष्ठाना मध्ये गर्भगिरीचे नाथभुमीत त्यांना विलक्षण आध्यात्मिक आधी दैविक आधी भौतिक दिव्य आध्यात्माचा अनुभव प्राप्त झाला. या अनुष्ठानाने त्याची प्रकृती खुपच क्षीण झाली होती. असे असले तरी चेहर्‍यावर प्रसन्नता डोळ्यात विलक्षण दैवी तेज आले होते. असे हे महान अवतारी पुरूष सद्गुरू देवेंद्रनाथ महाराज आहेत. तुकोबाराय म्हणतात "तुका म्हणे कैसे अंधळे हे जन गेले विसरून खर्या देवा". सद्गुरूच आपल्या जीवनात कायापालट घडवून आणण्यात मोलाचे योगदान सद्गुरूच करतात. म्हणूनीया शरण जावे सर्व भावे सद्गुरूशीच भजावे. करुणानिधी हे परमात्म्याचे नाम संकीर्तन नाम चिंतन नाम साधना हदयातून घ्यावेत. कारण त्यानेच निर्माण केलेल्या या विश्वाविषयी अपार करूणा आहे, म्हणून हे जग परमात्म्या विश्वासावर निर्भय होऊन जगत आहे. या करूणाकराचे वर्णन करताना एक भक्त म्हणतो "करूणाकर करूणा तुझी असता मला भय कोठले! जे का रंजले व्हा गांजले पुसतोस त्यांची आसवे". जसे भगवान परमात्मा प्रत्येक जीवावर प्रेम भाव अर्पण करतो तसेच सद्गुरू सुध्दा साधकाला प्रेम भाव अर्पण करतात !

सकल संत सज्जन मायबाप हो पवित्र तो देश पावन ते कुल जेथे हरिचे दास जन्म घेऊन संत ज्ञान भक्ती कर्मयोग साधून सर्व  सामान्यांपर्यंत भक्तीचा महिमा किती अगाध आहे हे सद्गुरूने दाखवून दिले. प्रत्येक शब्दातून वेदातीत अर्थ अभिप्रेत करून भक्तीपंथ वाढवण्यात परम पूज्य देवेंद्रनाथ महाराज यांचे मोलाचे योगदान आहे. केले उपकार सांगू मी काय बाप न करी ऐसी माय. नवनाथ यांनी जीवनभर अहोरात्र धडपड करून भक्तीपंथ किती श्रेष्ठ आहे हे जगाला दाखवून दिले. भगवान चैतन्य मच्छिंद्रनाथ यांच्यापासून नाथ संप्रदायाला सुरूवात झाली नवनाथ यांच्या अद्भुत कार्याचे काय मी पामर किर्ती वर्णन करू? तुमच्यामुळेच आम्हाला आत्मसुख प्राप्त झाले.

समाजात नाथपंथा विषयी अनेक मत मतांतर आहेत. एक प्रकारची भिती देखील आहे. हि भीती अनाठायी कशी आहे व जीवनात नाथपंथाचे तत्व प्रणालीचा लाभ कसा घेता येईल. स्वतः भगवंत या सृष्टीचे निर्माते ब्रम्हा विष्णू व महेश, यांनीच या पंथाची योजना केली आहेत. म्हणजेच विधात्यानेच हा पंथ निर्माण केला आहे.

सध्याच्या कलीयुगात हा पंथ परम पूज्य देवेंद्रनाथ महाराज याच्या कृपा आशिर्वादाने भक्ती मार्गावर वाटचाल करीत आहे. दैनंदिन जीवनात होणारा विपरीत परिणाम कसा कमी करता येईल यासाठीच नवनाथ बोधामृत ग्रंथ लिहून आपल्यासमोर ठेवले आहेत. देवेंद्रनाथ महाराज म्हणजेच साक्षात ईश्वरीय अवतार परम पूज्य देवेंद्रनाथ महाराज जेव्हा अनुष्ठान बसले असता ते केवळ मंत्रानेच सिद्धाग्नि प्रज्वलित करायचे असे हे महान अवतारी पुरूष परम पूज्य देवेंद्रनाथ महाराज हि आश्चर्य चकीत करणारी गोष्ट त्या ठिकाणी उपस्थित अनेक भाविकांनी पाहिली अनुभवली.

अनुष्ठान पुजन संपल्यावर नाथाची आरती झाली महाराजांनी सर्वांना प्रसाद दिले, त्यावेळची त्याची ती प्रसन्न मुद्रा, चेहर्‍यावरील ते दिव्य तेज पाहून उपस्थित नाथ भक्तांना एक आगळ्यावेगळ्या आध्यात्मिक वातावरणात नाथाचे सानिध्यात असल्याची अनुभूती आली. चैतन्य कानिफनाथ महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र मढी येथील मंदिराचे जीर्णोद्धार कार्य करतांना परम पूज्य देवेंद्रनाथ महाराज यांनी सर्व प्रथम मंदिर व परिसर स्वच्छ धुवून घेतले. कित्येक वर्ष मंदिरात साठलेली जळमटे काढून टाकून दिले नाथाचे शेजघर स्वच्छ केले आणि संपूर्ण मंदिरास रंगकाम केले माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात "तैसे येणेचि शरीरे शरीरा येणेचि सरे किंबहुना येरझारे चिरा पडे" माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या शरीराने आपण जन्माला येतो पण याच देहातून मधुर अमृत शब्द बोधामृत गीत अभंग चिंतन नामस्मरण नाम संकीर्तन नाम साधना हदयातून घ्यावेत कारण नामस्मरणानेसर्व मनोरथ पुर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत!

सद्गुरू श्री चैतन्य देवेंद्रनाथ महाराज शिष्य प्रफुल्ल सुरपुरिया
शिंगणापूर जि अहमदनगर.
 
मधुर ध्वनी: ९८२२२५४१९०  
सद्गुरु श्री देवेन्द्र नाथ महाराज

सद्गुरु श्री देवेंद्रनाथ अमावस्येच्या दिवशी अनेकांना अनुग्रह देत असत. गुरुमंत्र देत असत. अनेकांना नाथांच्या सेवेला लावले. महाराज वर्षातून दोनदा डोंगरगण येथे हठयोग शिबिरे घेत असत. त्यामध्ये नाथ परंपरेचे होमहवन, पूजेची विधी,  त्यामागची तत्त्वे इत्यादी गोष्टी सहजसुंदर भाषेत समजावीत. त्यांच्या शिबिराला जाणे ही त्यांच्या शिष्यांना पर्वणीच असे व शिबिरांची ते चातकासारखी वाट पाहत असत.

नाथ संप्रदाय हा गुरू अधिष्ठान प्रधान संप्रदाय आहे. कोणताही मंत्रतंत्र, पूजा गुरुमुखातून श्रवणी पडल्याखेरीज त्याची केवळ माहिती घेऊन काही उपयोग नसतो. त्या दृष्टीने या शिबिराला फारच महत्व असते.
ध्यानधारणा, समाधी, मानसपूजा, षट्चक्रभेदन, गायत्री मंत्र असे कोणासही माहीत नसलेले ज्ञान मुक्तकंठाने शिष्यांना वाटत.

ते म्हणत की मी आहे तोपर्यंत शिकून घ्या. माझ्या एवढे ज्ञान कोणताही नाथपंथी योगी कितीही त्याची सेवा केली तरी तो देणे कधीच शक्य नाही. जे ज्ञान मिळेल त्याचा सदुपयोग करा. नाथपंथ वाढवा गुरु आज्ञा पाळत जा पण महाराज बनण्याचा प्रयत्न करू नका.साधकच रहा असे ते सांगत असत.                                              

सद्गुरु श्री देवेन्द्रनाथ आपल्या शिष्यांना साधनेविषयी योग्य मार्गदर्शन व्हावे यासाठी हठयोगी शिबिराचे आयोजन करीत असत. या शिबिरांमधून श्री देवेन्द्रनाथ हठयोग साधनेविषयी माहिती देत असत. त्यामध्ये प्रामुख्याने नवध्यानयोग, गुप्त गायत्री, त्राटक साधना, मानसपूजा इत्यादी अनेक गोष्टी सविस्तर स्पष्ट करून सांगत असत. काही साधक महाराजांना नाथपंथातील तांत्रिक साधने विषयी माहिती देण्याचा आग्रह करीत असत. तांत्रिक साधना याविषयी माहिती दिली जात असे. असे असले तरी शिष्यांची किंवा साधकाची साधनेत प्रगती पाहूनच सद्गुरु आपल्या शिष्यांना तंत्र मंत्र यंत्र याविषयी ज्ञान देत असत. त्यांच्या ठिकाणी संयम असल्याशिवाय आणि त्यांची साधनेतिल योग्य बैठक असल्याशिवाय सद्गुरु त्या शिष्याला पूर्ण ज्ञान देत नाहीत. या नाथपंथामध्ये कापालिक साधना हा एक महत्त्वाचा भाग आहे.

चैतन्य जालंदरनाथ व चैतन्य कानिफनाथ हे कापालिक शाखेतील प्रमुख नाथजी समजले जातात. देवेंद्रनाथ महाराजांनी याविषयी असे सांगितले की भूत पिशाच्च भानामती, करणी, इत्यादि कापालिकांच्या निशिध्द साधना नष्ट करण्यासाठी नाथांना कापालिक व्हावे लागले.
कापालिक साधकांच्यामध्ये बसून त्यांच्या निषिद्ध साधना नाथांनी नष्ट केल्या आणि जीवात्म्याला होणारे मानसिक व शारीरिक क्लेश दूर केले. हे नाथांचे जीव ब्रह्म सेवाकर्म होते.

N/A

References : N/A
Last Updated : May 15, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP